भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 142, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 142

११४ , सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा :- तमासा-गंमत, लाग-फायदा. अर्थ:- गोपाळांनो, तुमचा या ठिकाणी फायदा होणार नाही तुम्ही या श्रीहरीची गंमत तर पाहा. चोरी करून बाहेर आल्यावर मग तुमचा लाभ तुम्हांस तो देईल. १ गोपाळांनो, तुम्ही आपआपल्या जागी जागेपणाने असा. मजपासून दूर राहण्यास व असावधपणे वागल्यास तुम्हास त्रास होईल. २ आम्ही त्या श्रीहरीच्या ठिकाणी प्रवेश न करताही नुसती पाळत ठेवूनही आम्हांला त्याची सर्व ठिकाणे माहीत आहेत. त्याच्याशिवाय तुम्ही मनात भय बाळगून वागाल तर व्यर्थ इतर जागा चाचपीत बसाल ३ तुकाराम महाराज म्हणतात, जिवावर उदार होऊन तुम्ही त्याच्याकडे जा; मग शेवटी ते नवनीत मिटक्या मारून खाताना तुम्हांस फार गोड वाटेल. ४ २२९ डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥ १ ॥ खेळ खेळता फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ २ ॥ मारिती माया घेती जीव । नाहीं कींव अन्यायें ॥ ३ ॥ तुका कान्होबा मागें । तया अंगें कळों आलें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- डोया-डोकी अर्थ:- या कृष्णाने अनेक प्रकारचे खेळ करून सर्व पोरांना डावात हरविले व त्याची इंद्रियरूपी गुरे चुकविली. १ खेळ खेळता खेळता अनेकांची अभिमानाची डोके फुटली; आणि तो श्रीकृष्ण तर आपण होऊन निराळा राहिला. २ ही वरवरची माया सर्वांना मारून त्याचा जीव घेते. तिला कसलीही दया नसल्याने ती अन्या- यानेच वागते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी या कान्होबाच्या मागे नेहमीच असतो. त्याच्या अंगसंगाने मला हे सर्व कळून चुकले आहे ४ २३० आतां हेचि जेऊं हेचि जेऊं । सवें घेऊं शिदोरी ॥ १ ॥ हरिनामाचा खिचडा केला । प्रेमें मोहिला साधनें ॥ २ ॥ चवों चवों घेऊं घास । ब्रह्मरस आवडी ॥ ३ ॥ तुका म्हणे गोड लागे । तो तों मागे रसना ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- खिचडा-खिचडी, मिश्रण, रसना-जीभ अर्थ-हरिनामाचे व काल्याचे भोजन हेच आमचे मुख्य जेवण होय. ही शिदोरी आम्ही यापुढे नेहमीच बरोबर घेऊ. १ श्रीहरीचे नाम, त्याचे गुणसंकीर्तन, त्याची भक्ती याची खिचडी काल्याच्या रूपाने करून याच प्रेमाने, व भक्तीच्या साधनाने तो मोहित होणारा आहे. २ या ब्रह्मरसाच्या घासाचे मोठ्या आवडीने सेवन करून त्याची चव बारकाईने आम्ही घेत राहू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा काल्याचा घास किती गोड लागतो म्हणून सांगू ? तो जो जो गोड लागतो तो तो ही जीभ त्याची इच्छा अधिक अधिक करीत आहे ४ २३१ अवघेंचि गोड जाले । मागीलये भरी आलें ॥ १ ॥ साह्य जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरी संग ॥ २ ॥ थडिये पावतां तो वाव । मार्गे वाहावतां ठाव ॥ ३ ॥ तुका म्हणे गेले । स्वप्नींचें जागें जाले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भरी आले-भरून आले, थडिये-किनाऱ्यावर, वाव-व्यर्थ अर्थ.- देवा, आम्ही मागे जे जे कर्म केले होते ते ते सर्व तुला वाहून टाकल्यामुळे आता सर्वच गोड होऊन गेले आहे. १ आम्हांस आता पांडुरंगाचे साह्य असल्यामुळे त्याचा निवास आमच्या हृदयातच कायमचा आहे. २ महापुरात बुडणाऱ्यास पैलतीर गाठता आल्यानंतर मग बुडण्याची भीती व्यर्थच असते. ३ तुकाराम महाराज