सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 129, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १०१ शब्दार्थ व टीपा :- बरवें-उत्तम. अर्थ :- चला आपण सर्व गाई वळून आणू व एका ठिकाणीं बसू. १ आज पुष्कळ पायी चालणे झाल्या- मुळे व पळपळ फार झाल्यामुळे फारच त्रास वाटत आहे. २ खांद्यावर शिदोरीचे ओझें व पोटांत कडाडून लागलेली भूक या अवस्थेंत खेळण्याचे सुख कसले ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा वेळीं श्रीहरीकडे धावून जावे, मग सर्व उत्तमच होईल. ४ २०० नेणों वेळा काळ । धांलों तुस्यानें सफळ ॥ १ ॥ नाहीं नाहीं रे कान्होबा भय आम्हापाशीं । वळूनि पुरविसी गाई पोटा खावया ॥ २ ॥ तुजपाशीं भये । हें तों बोलों परी नये ॥ ३ ॥ तुका म्हणे बोल । आम्हा अनुभवें फोल ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- फोल-व्यर्थ. अर्थ :- श्रीकृष्णा, आम्हांस काळवेळ कांही समजत नाही. केवळ तुझ्या संगतीत आम्ही संतुष्ट झालो आहोत. १ अरे कृष्णा, आता आम्हांस कसलेही भय नाही. कारण तू आमच्याच गाई रक्षण करून वर आम्हास खायलाही देतोस. २ तुझ्या भीतीने इतके शब्दही आम्ही खरे म्हणजे बोलू नयेत; ३ कारण तुकाराम महाराज म्हणतात, असे बोलणेही व्यर्थ आहे असा आमचा अनुभव आहे. ४ विटीदांडू अभंग १ २०१ सारा विटूडांडू । आणीक कांहीं खेळ मांडूं ॥ १ ॥ बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥ २ ॥ कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥ ३ ॥ एकमेकां हाफा मारी । सेल जाळी एक घरी ॥ ४ ॥ राजी आलें नांव । फेरा न चुकेचि घांव ॥ ५ ॥ पुढें एक पाटी । एक एकें दोघां आटी ॥ ६ ॥ एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥ ७ ॥ तुका म्हणे आतां । खेळ मोडावा परता ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा - पाव-पाय, गोविला-गुंतून राहिला, सेल-उत्तम घाटा. अर्थ :- विटीदांडूचा हा खेळ आता मोडू या. दुसरा काही तरी खेळ खेळू आता आपण. १ सारे डाव अंगावर आले. पाय कुठेच स्थिर नाही. २ विटी एकदा कोलल्यानंतर व एकदा टोला मारल्यावर ती जो झेलतो तो गुंतून राहतो. ३ गडी एकमेकांस हाका मारतात व खेळका घाटा हातात धरतात ४ ज्यांच्यावर राज्य आले किंवा जे खेळण्यास तयार झाले त्यांची धावपळ काही चुकत नाही. ५ एक पुढे धावतो, दुसरा मागे धावतो, दोघांनाही धावांवे लागतेच ६ कित्येकांना धावण्याची हौस असते तर कित्येकांना धावताना हात पिटावा लागतो. त्यांना त्याचा शीण होतो. ७ तुकाराम महाराज म्हणतात, हा खेळ आता मोडून टाकावा हे बरे. ८ २०२ पाहातां गोवळी । लाय त्यांची उपटावळी ॥ १ ॥ करिती नामाचें चिंतन । गडी कान्होवाचें ध्यान ॥ २ ॥ आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥ ३ ॥ एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥ ४ ॥