भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 128, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 128

१०० | सार्थ तुकारामगाथा आता काय करू । नये यासि हाणू मारूं । नव्हे बुझाविता स्थिरु । काहीं करीना हा । त्याचि केले एके ठायी । आता निवडूनि खाईं । आम्हा जाचितोसी काई । हरिसि म्हणे माता ॥ ३ ॥ त्याचे तयाकुन । करविता तुटे भान । तब जाले समाधान । उठोनिया बैसे । माते बरें जाणविले । अग चोरूनि आपुलें । तोडियले एका बोले । कैंसे सुखदुःख ॥ ४ ॥ ताट पालवे झाकिले । होतें तैसे तेथें केले । भिन्नाभिन्न निवडिले । अन्नें वेगळालीं । विस्मित जननी । भाव देखोनिपा मनीं । म्हणे नाहीं ऐसा कोणी । तुज सारिखा रे ॥ ५ ॥ हरुषली माये । सुख अगीं न समाये । कवळूनि बाहे । देती आलिंगन । आनद भोजनीं । तेथें फिटलीसे धणी । तुका म्हणे कोणी । साडा शेष मज ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आळी-हट्ट, मेदिनी-पृथ्वी, पालवें-पदरानें अर्थ - एकदा भोजन करीत असतांना श्रीकृष्णानें विचित्र हट्ट धरला वाढलेले अन्न त्याने एकत्र केले व आईस म्हणू लागला की हे आता फिरून मला वेगळे करून दे श्रीकृष्णाने रागाने पृथ्वीवर लोळण घेतली १ मग त्याची आई यशोदा त्याला म्हणाली, कृष्णा, कसला रे हा हट्ट तुझा, नसल्या गोष्टी करतोस मी तुला दुसरे पदार्थ वाढते पण तो तिला ढुंकोच म्हणाला २ मग यशोदा मनाशीच म्हणाली, आता काय करू तरी काय ? याला तर हाणमार करता येत नाही याची समजूत कशीही केली तरी पटत नाही ती म्हणाली, कृष्णा, तूच तुझ्या हाताने पदार्थ एकत्र केलेस, आता तूच ते निवडून खा आम्हाला का विनाकारण त्रास देतोस ? ३ त्या कृष्णाचे समाधान त्याच्याच शब्दात केल्यानंतर मात्र त्याची समजूत पडली, त्याचा हट्टही थामला मग तो जमिनीवर उठून बसला तेव्हा आईसही बरे वाटले मग तो श्रीकृष्ण स्वत चे अग चोरून आईस म्हणाला, आई, एकाच शब्दात माझे सुखदुःख जाणून तू माझा हट्ट कसा ग दूर केलास ? ४ त्यावर श्रीकृष्णाने पदराने झाकलेले ताट पाहिले व सर्व पदार्थ पहिले होते तसे वेगवेगळ निवडून ठेवले कृष्णाचे ते सामर्थ्य पाहून त्याची आई मनात चकित झाली त्याची भावना पाहून ती त्यास म्हणाली, तुझ्या सारखा या त्रिभुवनात कुणी नाही ५ यशोदा माता आनदून गेली तिच्या अंगात पुत्रप्रेमाचे सुख मायेनासे झाले आपले दोन्ही हात पसरून तिने श्रीकृष्णास पोटाशी धरले दोघांनीही मोठ्या आनंदाने भोजन केले दोघांच्याही मनाची तृप्ती झाली तुकाराम महाराज म्हणतात, या भोजनातील काही शिल्लक राहिलेला भाग आपणास मिळावा ६ १९९ चला वळू गाई । बैसों जेऊ एके ठायीं ॥ १ ॥ बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ २ ॥ सादीं मार पोटीं भुक । काय खेळायाचे सुख ॥ ३ ॥ तुका म्हणे धावे । मग अवघें बरवे ॥ ४ ॥