सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 127, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ९९ मोठ्या कौशल्याने घातलेली असते, आणि मोठघाने नामाची गर्जना ते करीत असतात. ४ या क्षेत्रात हरी, हर, व ब्रह्मदेव यांच्या बरोबर सर्व तीर्थासह भीमा नदी असून तेहतीस कोटी देवाची वस्तीही येथेच आहे या क्षेत्रातील सर्व थाट पाहून सर्वजण विस्मित होतात व त्यांना देवाची नगरी अमरावतीही ओस पडली असे मनापासून वाटते. ५ लोक वैकुंठाची थोरवी वर्णन करीतात, पण त्याची बरोबरी पंढरपुराशी कधीच होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, स्त्रीपुरुपानो, कसलाही आळस न करता या पंढरपूरच्या विठ्ठलावर चित्त ठेवा. ६ १९६ ब्रह्मादिकां न कळे खोळ । ते हे आकळ धरिली ॥ १ ॥ मोहरी पांवा वाहे काठी । धांवे पाठीं गाईंचे ॥ २ ॥ उच्छिष्ट न लभे देवा । तें हे सदेवां गोवळ्यां ॥ ३ ॥ तुका म्हणे जोड झाली । ते हे माउली आमुची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- खोळ-पांघरुण, आकळ-न कळण्यासारखा. अर्थ :- या श्रीकृष्णाच्या रूपाची ओळख ब्रह्मादिकांनाही होत नाही. या विठ्ठलाने न कळण्यासारखे पांघरुण जणू घेतले आहे. १ याच्या हातात पावा, मुरली व काठी असून तो गाईंच्या पाठीमागे धावत असतो. २ याच्या उष्टघासाठी देवादिप प्रयत्न करतात, पण त्यांनाही ते मिळत नाही. पण या गोपाळांना मात्र नेहमीच ते मिळत राहते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मोठ्या भाग्याने याची जोड होऊन ही थोर माऊली आम्हास मिळाशी आहे. ४ १९७ कान्होबा तूं आलगट । नाहीं लाज बहु धीट । पाहिले वाईट । बोलोनिया खोटें ॥ १ ॥ परि तूं न संडिसी खोडी । करिसी केली घडीघडी । पाडिसी रोकडी । तुटो माये आम्हांसी ॥ २ ॥ तूं ठायींचा गोवळ । अविचारी अनर्गळ । चोरटा शिंदळ । ऐसा पिटूं डांगोरा ॥ ३ ॥ जरी तुझी आई । आम्ही घालूं सर्वा ठायीं । तुका म्हणे तेंही । तुज वाटे भूषण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आलगट-दांडगा, खोडकर, अनर्गळ-स्वच्छंदी. अर्थ :- कान्होबा, तू मोठा दांडगा असून तुला काही लाजलज्जा नाही तू फारच धीट आहेस तुला आम्ही वाईट बोलून पुष्कळ पाहिले. १ पण तू आपली खोड काही सोडीत नाहीस. जे आजवर केलेस तेच पुनः पुनः आत्ताही करीत आहेस. अशा या तुझ्या करण्याने तू तुझ्याआमच्यांत अंतर मात्र पाडशील हे ध्यानात धर. २ खरे म्हणजे तू मूळचा गवळीच. अगदी अविचारी व स्वच्छंदी आहेस. तू पक्का चोर आहेस, वाईट चालीचा आहेस असा तुझा लौकिक आम्ही सर्वत्र पसरवू. ३ जरी तुझी आई सर्वांच्या खाली घातली तरी तेही तुला भूषणच वाटेल असे वाटते. ४ १९८ भोजनाच्या काळों । कान्हो माडियेली आळी । फाला करी वनमाळी । अन्न एकवटा । देईं निवडुनी । माते म्हणतो जननी । हात पिटूनि मेदिनी । वरि अंग घाली ॥ १ ॥ कंसा आळी घेसी । नव्हे तेचि करविसी । घेईं दुसरे तयेसी । यारी म्हणे नको ॥ २ ॥