भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 126, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 126

या पंढरीपुढे वैकुंठालासुद्धा जाण्याचे भय करणार नाही ५ तुकाराम महाराज म्हणतात, मलाही हे सुख पाहण्याची पुष्कळ दिवसाची इच्छा होती ती आज मोठ्या प्रयत्नाने सत हो, तुमच्या पुण्याईने सफल होत आहे त्याच्या पायाची भेट आज होत आहे ६ विवरण - या एका उत्कृष्ट अभंगात तुकारामबुवा पंढरपूर क्षेत्राचे मोठ्या डौलाने रूपकात्मक अस वर्णन करीत आहेत भीमेच्या तीरावरचे हे गाव पंढरपूर तेथील मालक श्रीविठ्ठल व त्याचा कुळवाडी किंवा पाटील पुंडलीक आहे संत सज्जनांनी येथे भगवद्भक्तीच्या पेठा बसविल्या असून आषाढीकार्तिकीस येथे मोठेच बाजार भरतात अशा डौलदार भाषेत तुकारामबुवानी पंढरीचे माहात्म्य या अभंगात चटमदार पद्धतीने रंगविले आहे अभंग क्र ११३ वरील विवरणात पंढरपूरच्या ऐतिहासिक व पौराणिक महत्त्वाचे विवेचन विस्ताराने केले असून पंढरपूरच्या चंद्रभागा नदीस भीमा, भिवरा अशीही नावे असून यथेच पुंडलीकाने भक्तांसाठी विठ्ठलास स्थिर केले अशी कथा आहे या भीमा नदीचेही माहात्म्य पुराणातून सांगितले आहे त्रिपुरासुराच्या नाशाच्या वेळी जे धम झाले त्यातून शंकराच्या कृपेने ही भीमा नदी निर्माण झाली ही भीमा फारच भयंकर स्वरूपाची होती, पण क्षेत्रस्थ लोकांनी भैरवाची प्रार्थना करून या भीमा नदीस शांत केल पांडुरंगकृपेने ही भीमा येथे शांत झाली भीमा नदी ही वारकऱ्याना गंगेपक्षाही श्रेष्ठ व पवित्र वाटत हिलाच पुढे चंद्रभागा असे नाव असून पापनाशन अशी सर्व तीर्थे तिच्यात आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे या भीमातीरावरच आईबापाच्या सेवेत रमलेल्या पुंडलिकाने श्रीविठ्ठल देवास विटेवर उभ केल्याची कथा प्रसिद्धच आहे १९५ पंढरी चोहटा मांडियेला खेळ । वैष्णव मिळोनि सकळ रे । टाळ टिपरी मादळे एक नाद रे । जाला बसवंत देवकीचा बाळ रे ॥ १ ॥ चला ते कवतुक भाई रे । पाहो डोळा कामी गुंतलेति काई रे । भाग्यवंत कोणी गेले सांगाति । ऐसे सुख त्रिभुवनी नाहीं रें ॥ २ ॥ आनंदाचे वाद सुखाचे संवाद । एक एका दाखविती छंद रे । साहो अठरा चारी घालुनियां घाई । नाचती फेरी टाळशुद्ध रे ॥ ३ ॥ भवतांचीं भूषणे मुद्रा आभरणे । शोभती चंदनाच्या उट्या रे । सत्य सुंदर कास घालूनी फुसरी । गर्जती नाम बोभाटीं रे ॥ ४ ॥ हरि हर ब्रह्मा तीर्थासहित भीमा । देव कोटी तेहतीस रे । विस्मित होऊनि ठाकले सकळ जन । अमरावती केली ओस रे ॥ ५ ॥ वाणितील थोरी वैकुंठीची परी । न पवे पंढरीची सरी रे । तुकयाचा दास म्हणे नका आळस करूं । सांगतो नरनारींस¹ रे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - चोहटा-बाजार चव्हाटा, आभरणे-अलंकार अमरावती-इंद्राची नगरी अर्थ - या पंढरपूरच्या चव्हटाच्या बाजारपेठेत भक्त वैष्णवानी हा भक्तीचा खेळ मांडलेला आहे आणि याचे उपास्य दैवत देवकीचा बाळ श्रीकृष्ण झाला आहे रे १ बंधूनो, चला त्या वाळवंटात जाऊ य डोळ्यानी ते कौतुक पाहू दुसऱ्या कामात तर गुंतलेले नाहीस ना तुम्ही ? जे त्याच्या संगतीत गेले ते खरोखरच भाग्यवान ठरले त्यांना मिळालेले सुख त्रिभुवनात दिसणार नाही २ या ठिकाणी वादविवादही मोठ्या आनंदाचे व सवाद सुखाचे होतात एकमेव एकमेकांना आपापले छंद दाखवितात सहा शास्त्रे, चार वेद, अठरा पुराण घाईत यातूनही याचा बोध होणार नाही तो एका टाळाच्या व नाचाच्या फेरीत शुद्धत्वाने होईल ३ कपाळावर मुद्रा हीच भक्तांची भूषणे व अलंकार होत त्याच्या अंगावरील चंदनाची उटी त्यांना शोभून दिसते या भक्तॉनी सत्याची सुंदर कास १ नारीबाळास