भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 125, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 125

सार्थ तुकारामगाथा १७ हिंडती रानोरान भुजंगांत कांटेघावन । सुख तपांहून आम्हां गातां नाचतां रे ॥ ३ ॥ तुका म्हणे ब्रह्मादिकां सांवळें दुर्लभ सुखा । आजि येथें आलें फुका नाम १मुखा कीर्तनीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- भुजंग-सर्प अर्थ :- गडयांनो, कळो, न कळो, पण हरिनामाची ओढ धरू व आपलेच हित साधण्यासाठी टाळी वाजवू. १ आज जो लाभ होत आहे तो पदरात पाडून घ्या भक्तिप्रेमाचा दाता पांडुरंग कृपा करायला तत्पर आहे. आज मोठा सोन्याचा दिवस उगवला असून भक्तिप्रेमाला रग चढला आहे. २ या रानावनात कित्येक ठिकाणी काट्यां- कुट्यांतून, सर्पांच्या स्थानातून हिंडणे झाले तरी त्यातही या प्रभुप्रेमाचे सुख काही वेगळेच व अद्वितीय असे आहे अशा अवघड ठिकाणी जाण्यापेक्षा हरिनामात दंग होणे अधिक चांगले नाही का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, या सावळ्या श्रीकृष्णाचे सुख ब्रह्मादिकांनासुद्धा दुर्लभ आहे. पण आज येथे कीर्तनात व नामस्मरणात सहजासहजी फुकट हे सुख मिळत आहे ते का नाही घेत ? ४ १९४ भीमातीरीं एक वसलें नगर । त्याचे नाव पंढरपुर रे । तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥ १ ॥ नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसावा रे । पुढें गेले ते निधाई जाले । वाणितील त्याची सीमा रे ॥ २ ॥ वळियां आगळा पाळी लोकपाळां । रीघ नाहीं कळीकाळा रे । पुंडलीक पाटील केली फुळवाडी । तो जाला भवदुःखा वेगळा रे ॥ ३ ॥ संतसज्जनों माडिलीं दुकानें । जया जें पाहिजे तें आहे रे । भुक्तिमुक्ति२ फुकाच साठीं । कोणी तयाकडे न पाहे रे ॥ ४ ॥ दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे । न वजो म्हणती आम्ही वैकुंठा । जिहीं देखिली पंढरी रे ॥ ५ ॥ बहुत दिस होती मज आस । आजि घडले सायासों रे । तुका म्हणे होय तुमचेनी पुण्यें । भेटी तया पायांसीं रे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- मोकासी-मालक, इनामदार, निधाई-संतुष्ट, हाट-बाजार अर्थ - भीमा नदीच्या काठावर एक नगर वसले आहे रे. त्याचे नाव पंढरपूर असून तेथील मालक जो श्रीकृष्ण किंवा विठ्ठल आहे त्यास चार हात असून सोळा हजार स्त्रिया आहेत १ गड्यांनो, आपण हसत, नाचत त्याच्या गावी जाऊ तो आपणास सुखाचा विसावा देईल या मार्गाने जे आधी गेले त्याची चांगलीच तृप्ती झाली. त्याचे वर्णनही करता येणे शक्य नाही २ या ठिकाणचा मालक अतिशय बलाढ्य असून लोकांचे रक्षण करणारा आहे येथे यमाच्या दूताना शिरकाव करण्यास वावच नाही येथील पाटील पुंडलीक असून त्याने देवाच्या शेतवाडीची फुलवाडी केली आहे. त्याने भक्तांना संसाराच्या दुःखातून मोकळे केले आहे ३ या क्षेत्रात साधुसंतानी व सज्जनानी आपापली भक्तीची दुकाने मांडली आहेत ज्याला जे हवे ते इथे आहे भोग व मोक्ष हे येथे गुलाममुखी व फुकटात मिळतात. पण त्यांच्याकडे कुणीच कसे पाहात नाही रे ? ४ वर्षातून दोनदा आषाढी व कार्तिकी एकादशीस या ठिकाणी फार मोठे बाजार भरतात व या निमित्ताने अनेक वारकरी जमा होतात. हे वारकरी म्हणतात की, आम्ही १ सुखा, २ मुक्ति भुक्ति तेथें तु गाथा १३