सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 124, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१६ सार्थ तुकारामगाथा खेळगडघा, आपण नाचत नाचतच पढरपूरला जाऊ व तेथील विठ्ठलरखुमाईस डोळे भरून पाहू २ हा विठ्ठल सहा शास्त्रे, चार वेद, अठरा पुराणे याच्याहून वेगळाच आहे त्यालाच आपण गाऊ व त्याच्याच रूपाचे स्मरण करू याच्या नादाने पक्षीसुद्धा चारापाणी घेण्याचे विसरतात व तरुण स्त्रीपुरुष आपला देहभावही विसरून जातात ३ येथील आनंद काय वर्णन करावा ? येथे मुक्याला वाचा फुटते, बहिन्याला ऐकू येते, आधळयाना चांगले दिसू लागते व पागळघासही पाय फुटतात तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाच्या नामगजरात म्हातारी माणसेही तारुण्याने बेहोष होऊन जातात ४ १९२ दोन्ही टिपेरीं एकचि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे । कुसरी अंगें मोडितोल परी । मेळविति एका छंदें रे ॥ १ ॥ कांहींच न वजे वाया रे । खेळिया एकचि थसवंत अवघिया रे । सम विषम तेथें होऊंच नेदी । जाणऊनि आगळिया रें ॥ २ ॥ सत महंत सिद्ध खेळतील घाई । तेच सांभाळी माझ्या भाई ये । हात राखून हाणिती टिपन्या । टिपरे मिळोनि जाय त्याची सोई रे ॥ ३ ॥ विताळाचे अवघें जाईल वाया । काय ते शृंगारूनि काया रे । निवडूनि बाहेर काढिती निराळा । जो न मिळे सतांचिया घाई रे ॥ ४ ॥ प्रकाराचे काज नाहीं सोडी लाज । निःशंक होउनिया खेळें रे । नेणतों नेणतोंच एके पावलीं मान । विठ्ठल नामाचिया बळें रे ॥ ५ ॥ रोमाच गुडिया डोलविती अंगें । भावबळें खेळविती सोंगें रे । तुका म्हणे कठ सद्गदित वाटे । या विठोबाच्या अगसगें रे ॥ ६ ॥ शब्दार्थ य टीपा - नाद-ध्वनी, कुसरी-कौशल्यान, विताळ-चुकलेला बसूर टाळ अर्थ - अरे सोंगड्यानो टिपऱ्या दोन असतात पण त्याचा नाद किंवा ध्वनी एकच असतो ना ? त्याप्रमाणेच सगुण व निर्गुण ही दोन रूपे वेगळी दिसत असली तरी त्याच्यात भेद दिसतच नाही नृत्याच्या भरात नाना कौशल्याने अग मोडून विविध भाव दर्शविले तरी त्या सर्वांचे लक्ष एका श्रीहरीकडेच असते १ खेळणाऱ्याचे काहीच वाया जात नाही, सर्व खेळगडघाचे दैवत एकच असते या श्रेष्ठ ईश्वराकडे जेव्हा त्याचे लक्ष असते तेव्हा सम विषम असा फरक उरतच नाही या भेदारोरीज असणाऱ्या परमेश्वरास तू जाण २ भाई, या ईश्वराच्या नादाने अनेक सत, महत सिद्ध खेळ खेळतील, त्याच मार्गाने तूही खेळाचा रग सांभाळ रे स्वरूपरूपाचा हात राखून त्या साधु सतानी टिपरीचा खेळ खेळला, नाही तर टिपरी मिळून त्याचा काय उपयोग ? ३ टिपरीचा किंवा टाळाचा ठेका सुकून सारे वाया जाईल असे करू नकोस बाह्य शरीरशृगाराचा उपयोग काय रे ? साधुसगतीत जो मिसळून जाणार नाही त्यास या मेळ्यातून निपटून बाहेर काढला जाईल ४ वेगवेगळया बाह्य रंगाचे किंवा डोलाचे काय काम ? तू सर्व लज्जा सोडून, शका सोडून या खेळात भाग घ प्रथम न जाणणारी असतात पण पुढे या खेळात विठ्ठलाच्या नामस्मरणामुळे एकात्वास पावतात ५ भावभक्तीच्या सामर्थ्यावर खेळ खेळणाऱ्या व नाना सोंगे धारण करणाऱ्या भक्ताच्या अगावर भक्तिप्रेमाच्या रोमाच्याच्या गुढघा उभ्या राहतात तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाच्या अगसगामुळे भक्तिरसाने कठ भरून येतो ६ १९३ या रे गडे हो धरूं घाई जाणता हीं नेणता । नाम गाऊ टाळी वाहू आपुलिया हिता ॥ १ ॥ फावले तें घ्यारे आता प्रेमदाता पाडुरग । आजि दिवस सोनियाचा बोडवला रग ॥ २ ॥