सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 123, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा . १५ संप्रदायावर नामदेवाच्या भक्तितत्त्वाची छाप मोठी असून त्याच्या ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथात या नामदेवाची अनेक पदे आहेत. या नामदेवाचा व तुकोबाचा संबंध प्रसिद्धच आहे नामदेवानी स्वप्नात दृष्टान्त देऊन आपली कवित्वाची प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा आदेश दिला असा एक प्रसिद्ध अभंग तुकोबाचा आहे यानंतर तुकारामबुवानी ज्ञानदेव, सोपान-मुक्ताबाई याना थोर खेळगडी म्हणून उल्लेख केला आहे ज्ञानदेव ( १२७५-१२९६ ) हे तर भागवत संप्रदायाचे आद्य संघटक यांनी गीतेवर मराठीत भाष्य लिहून संस्कृता- मधील उच्च तत्त्वज्ञान प्रथम मोठ्या प्रमाणावर मराठी भाषेत आणले. यांच्या भावार्थदीपिकेसारखा तत्त्वज्ञानाचा, भक्तीचा, काव्याचा ग्रंथ अजूनही झालेला नाही असे जाणते सांगतात याच भावार्थदीपिकेस ज्ञानदेवी किंवा ज्ञानेश्वरी अशी लोकप्रिय नावे आहेत अनुभवामृत, चांगदेवपासष्टी अभंगरचना इत्यादी वाङ्मय ज्ञानदेवांचे म्हणून प्रसिद्ध आहे यांनीच समकालीन संताचा मेळावा जमवून भक्तिमार्गाची पुनर्स्थापना केली याची भगिनी मुक्ताबाई ( १२७९-१२९७ ) हीही फार अधिकारसंपन्न अशी गाययित्री असून हिने आपल्या बोधाने प्रसिद्ध योगीपुरुष चांगदेव यानाही आपले शिष्य बनविले आपल्या भावडानाही ही प्रसंगी उपदेश देत असे हिचे 'ताटीचे अभंग' प्रसिद्ध असून त्यात भक्तीचा कळवळा व थोर तत्त्वज्ञान यांचे उत्कृष्ट दर्शन होते सोपानदेव ( १२७७-१२९७ ) हे निवृत्तिज्ञानदेवांचे धाकटे बंधू यांचेही परमार्थ-निरूपणावर काही अभंग प्रसिद्ध असून सोपानदेवी नावाची गीतेवर एक समश्लोकी टीका यांची आहे चांगा वटेश्वर ( समाधी १३२५ ) हेही प्रसिद्ध तापीतीरचे योगीपुरुष वटेश्वर हे स्वतंत्र न मानता चांगा वटेश्वर हे एकच मानून वटेश्वर हे त्यांच्या गुरूचे किंवा दैवताचे नाव मानण्याकडे संशोध- काचा कल आहे या योगीपुरुषाने शेवटी भक्तिमार्गातील मुक्ताबाईंचे शिष्यत्व पत्करले . कबीर ( पंधरावे शतक ) हे एक उत्तर भारतातील प्रसिद्ध सद्पुरुष होत यांच्यावर हिंदू व मुसलमान याचे संमिश्र संस्कार असून नाथ संप्रदाय व सूफी पंथ याचीही थोडी छाप यांच्या विचारांवर दिसते यांचे उपास्य दैवत राम. हा राम सगुण की निर्गुण असा वाद नेहमी उपस्थित होतो कारण दशरथाचा जो मुलगा रामचंद्र त्याहून माझ्या रामाचे मर्म निराळेच आहे असे यांनी म्हटले आहे 'दशरथ सुत तिहूँ लोक बखाना । रामनामका मर्म है आना' अशी यांची ओळ असली व 'निर्गुणं मेरा पीव' असा याचा पुकारा असला तरी सगुण भक्तीसही लाजवील असे प्रेम यांनी निर्गुण रामावर केले आहे एकनाथ ( १५३१-१५९९ ) हे भागवत संप्रदायाचे सजीवन पैठणास राहात असत ज्ञानेश्वरानंतरच्या काळात मुसलमानी राजवटीत जी सांस्कृतिक वाताहत झाली तीन ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ गुप्त होण्याची वेळ आली तेव्हा ज्ञानेश्वरांच्या प्रेरणेने यांनी ज्ञानेश्वरीचे संशोधन केले रामायणभागवतावर ग्रंथरचना केली ज्ञानेश्वरीच्या खालोखाल यांच्या भागवतास वारकरी संप्रदायात मान आहे यांची पदे व अभंग प्रसिद्ध आहेत यांचे गुरू दौलतावाद येथील श्रीजनार्दनस्वामी यांचे भारूडवाङ्मय हे मराठीतील खरोखुरे लोकवाङ्मय असून जनतेतील जनार्दन जागृत करण्यास या वाङ्मयाचा फार मोठा उपयोग होत राहिला आहे १९१ बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे । जतिस पद राखो जेणे टिपरिया घाई । अनुहाते वाद्ये मादळा रे ॥ १ ॥ नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठुल रखुमाई पाहू रे ॥ २ ॥ सा चहूँ वेगळा अठराही निराळा । गाऊ वाजवूं एक चाळा रे । विसरती पक्षी चारा घेणे पाणी । तारुण्य देहभाव वाळा रे ॥ ३ ॥ आनंद तेथिचा मुकियासि वाचा । बहिरे ऐकती कानी रे । आंधळयासि डोळे पांगळासि पाय । तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जतीस-यतीचे, वाद्ये-ध्वनी, मादळ-मृदंग अर्थ :- बारा अथवा सोळा खेळगड्यांचा समुदाय मिळवून सतरावा गडी प्रत्यक्ष श्रीकृष्ण देवच आहे रे या टिपऱ्याच्या घाईगर्दीत यतीचे पद मात्र रक्षण करा येथे मृदंगाचा अनुहाताचा ध्वनी उमटत आहे. १ अरे