सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 155, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १२७ होती. व्यास हा पराशर व सत्यवती यांचा मुलगा. सत्यवती ही वसुराजाची कन्या. हिला कौमारदशेत पराशर ऋषीपासून कृष्णद्वैपायन नावाचा विख्यात मुलगा झाला. हाच प्रसिद्ध ग्रंथकर्ता भगवान व्यास होय. गणिका म्हणजे वेश्या. हिंचे नाव पिंगला असून ही अवंती नगरातील एक प्रसिद्ध गणिका होती मिथिला नगरीच्या वेश्येचे नावही पिंगला होते. परपुरुषाची मार्गप्रतीक्षा करताना मध्यरात्रीपर्यंतही कुणीही आले नाही तेव्हा तिला उपरती झाली व तिने ईश्वराकडे आपले चित्त वळविले अजामीळ हा कान्यकुब्ज देशातील एक ब्राह्मण एका वेश्येच्या नादी लागलेला होता. या वेश्येस याच्यापासून दहा मुलेही झाली. धाकट्या नारायण नावाच्या मुलावर याचा फार लोभ होता. अंतकाळी या मुलास त्याने हाक मारली ती ईश्वरास पोचली व त्यामुळे याचा उद्धार झाला अशी कथा आहे. शेवटी यांची परमेश्वरावर भक्ती जडली कुब्जा ही अत्यंत कुरूप व आठ ठिकाणी वाकडी असणारी कंसदासी श्रीकृष्ण व बलराम हे मथुरेस आले तेव्हा कृष्णकृपेने ही सुरूप झाली वाल्मीकी पूर्वा- युष्यात प्रसिद्ध दरोडेखोर वाल्या कोळी या नावाने होते हे प्रसिद्ध आहेच हा खरे म्हणजे एक ब्रह्मर्षी सुमती नावाच्या एका ब्राह्मणाचा हा पुत्र लहानपणी किराताच्या सहवासात वाढल्यामुळे यास चोऱ्या करण्याची सवय लागली पुढे याने तपश्चर्या करून वाल्मीकी या नावाने आपले नाव वाढविले रामचरित्राची कथा यांनीच छंदोबद्ध करून अमर केली आहे. वसिष्ठ- हाही एक प्रसिद्ध ऋषी असून हा मित्रावरुणाच्या रेताने कुंभात या कमलात निर्माण झाला पण पुढे याची प्रसिद्ध तत्त्वज्ञ म्हणून कीर्ती वाढली नारद हा प्रसिद्ध ऋषी असून संगीतकीर्तनादी भक्तीचा प्रवर्तक मानला जातो पण हा पूर्वी एका ऋषीचा दासीपुत्र होता
२५८ सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥ १ ॥ मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ २ ॥ वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ॥ ३ ॥ तुका म्हणे ज्याचें तोचि एक जाणे । भक्तीचें महिमान साधु जाणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा श्वान-कुत्रे, खर-गाढव, सूकर-डुक्कर, चोजविली-माखविली. अर्थ :- सोन्याचे ताट क्षीरीने भरून ते कुत्र्यापुढे ठेविले तर त्याचा त्याला काय उपयोग ? त्याला त्याची काही चव नाही. १ गाढवाला मोत्यांचा हार घातला किंवा डुकराला कस्तुरीने माखले तर काही उपयोग आहे काय ? २ एखादा वेदपरायण पंडित बहिऱ्या माणसांस ज्ञान सांगू लागला तर काय उपयोग ? त्याचे ज्ञान त्यास समजणारच नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला ज्या विषयाचे महत्त्व तोच विषय त्याला रुचणार, समजणार. भक्तीचे माहात्म्य साधुसंतच समजतील इतरांना त्याची काय किंमत ? ४
२५९ ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥ १ ॥ संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ २ ॥ आचार करितां म्हणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥ ३ ॥ संतसंग करितां म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥ ४ ॥ धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा । समर्थासि ताठा लाविताती ॥ ५ ॥ बहु बोलो जातां म्हणति हा वाचाळ । न बोलां सकळ म्हणती गर्वा ॥ ६ ॥ भेटिसि न यजातां म्हणती हा निष्ठूर । येतां जातां घर बुडविलें ॥ ७ ॥ लग्न करूं जातां म्हणती हा मातला । न करितां जाला नपुंसक ॥ ८ ॥ निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकांचें मूळ पोरवडा ॥ ९ ॥ लोक जैसा ओक धरितां धरवे ना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥ १० ॥ तुका म्हणे आतां ऐकावें वचन । त्यजुनियां जन भक्ति करा ॥ ११ ॥