सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 164, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१३६ सार्थ तुकारामगाथा ढोंगीपणाने उगाच माळ हालवून, जपाचे नाटक करुन गबाळया लोकांना फसवितात कुणी जारणमारणाच्या आसुरी विद्येच्या पाठीमागे असतात पण हे सब लोक बुवाच्या मते ढोंगी आहेत हे समाजातील भोळयाभाबड्या स्त्रीपुरुषाना लुबाडतात स्वतः तुकारामबुवा मात्र केवळ विठ्ठलाचे कीर्तन व गुणवर्णन करून हरिभक्तीचा प्रसार करतात असा भावार्थ २७३ रडोनिया मान । कोण मागता भूषण ॥ १ ॥ देवे दिले तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ २ ॥ लाविता लावणी । विके भिके केंज्या दानी ॥ ३ ॥ तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कोड-कौतुक, केंजे-धान्य अर्थ - दुसऱ्याजवळ रडून भारून मान मिळविण्यात कोणते भूषण आहे ? देवाने आपण होऊन जे दिले त्यात गोडी आणि कौतुक आहे २ स्वतः शेतात धान्य पेरून नंतर ते विकण्यात वा भिकाऱ्याला दान देण्यात काही अर्थ आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, मोठेपणा न मागता यायला पाहिजे धीर धरल्यासच वीर पुरुषाचे महत्त्व येईल ४ २७४ पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसता गमन मातेशीं तें ॥ १ ॥ सांगतो ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावे तरी ॥ २ ॥ संता ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीच वळसा सापडला ॥ ३ ॥ तुका म्हणे एकाएकीं वरासन । बुजें तेथें भिन्न अशोभ्य तें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - संकेत-सिध्दान्त वळसा-फेरा किंवा रहस्य, अशोभ्य-विशोभित, वरासन-श्रेष्ठ आसन अर्थ - ज्या आसनावर आपणास पूज्य असणारी वस्तू अथवा व्यक्ती आहे त्याच आसनावर आपण बसल्यास आईशी गमन केल्याचे पाप लागेल १ रोज वागण्यातील धर्मनीतीचे संकेत मी नीट सांगत आहे ते तुम्हास तुमचे हित व्हावेसे वाटत असेल तर सावधपणाने ऐका २ संतांची पूजा ज्या ठिकाणी होत असते तेथेच स्वतःच्या पूजनाची इच्छा धरणे हे जन्ममृत्यूपच्या फेऱ्यात सापडण्यासारखेच आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या श्रेष्ठ आसनावर दुसरा एखादा सामान्य मनुष्य जाऊन बसेल तर सारेच दृश्य विशोभित दिसेल ४ २७५ जेणें मुखें स्तवी । तेचि निंदे पाठीं रवी ॥ १ ॥ ऐसी अधमाची याती । लोपी सोने खाय माती ॥ २ ॥ गुदद्वारा वाटे । मिष्टान्नाचा नरक लोटे ॥ ३ ॥ विंचु लाभाविण । तुका म्हणे वाहे शीण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - स्तवी-स्तुती करतो, याती-जाती अर्थ - हा मनुष्य कसा आहे पाहा ज्या मुखाने स्तुती करतो, त्याच मुखाने मागून हा निंदा करतो १ अशी ही या अधमाची जात आहे हा जवळचे सोने पुरून ठेवून माती खात असतो २ मिष्टान्नाचे जेवण करावे व गुदद्वाराच्या वाटेने त्याचीच विष्ठा व्हावी तसे याचे हे करणे असते ३ काही एक फायदा नसताना विंचू आपल्या नांगीत विषाचा साठा वाहत असतो तसे या अधम माणसाचे असते ४ २७६ अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥ १ ॥ विटे न लगतां क्षण । मोल जाय वाया विण ॥ २ ॥ सर्पाचिया परी । विषें भरला कल्हारीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥ ४ ॥