सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 163, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १३५ नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदीं ॥ १० ॥ नाहीं हालवीत माळा । भोंवतें मेळवुनि गव्हाळा ॥ ११ ॥ आगमींचें कुडें नेणें । स्तंभन¹ मोहन उच्चाटणें ॥ १२ ॥ नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥ १३ ॥ शब्दार्थ व टीपा :- जडीबुटी-त्वरित गुण देणारी यातुर्मातुर औषधे, अयाचित-न विचारता, चाहूर-१२० बिघ्यांची जमीन, वृत्ति-निर्वाहाचे साधन, सांग खूण-गुपिते, करंटा-दुर्दैवी, भणदी-धूप जाळण्याची पात्रे, उदो-उदय असो, उदय असो असे देवीचे भक्त म्हणतात त्याप्रमाणे, गव्हाळा-बावळट लोकांना, आगमीचे-वेदान्ताचे कोडे, स्तंभन- जाग्यावर खिळून टाकण्याची विद्या, मोहनी-मोहिनी विद्या किंवा गौन, उच्चाटन-जारणमारणांपैकी एक विद्या, निरयवासी-नरकलोकांतील. अर्थ:- आपण कोण आहो, कोण नाहीत याचा स्पष्ट उलगडा करताना तुकारामबुवा सविस्तर सांगत आहेत की, लोकांना फसविण्याचे कपट काही मी जाणीत नाही. १ देवा, फक्त तुमचेच कीर्तन करून तुमचे उत्तम गुण मात्र गात असतो. २ लोकांना नादविण्यासाठी मजजवळ काही जडीबुट्टी त्यांना दाखविण्यास नाही; त्यामुळे त्वरित चमत्कारही मला करता येत नाहीत. ३ माझी शिष्यशाखाही मोठी नाही जे कोणी न विचारता किंवा न बोलविता येतात त्यांना काही थोडे सांगतो एवढेच. ४ मी तर देवा, एखाद्या मठाचा अधिपती नव्हे व मला चाहूरभर जमिनीचे निर्वाहाचे एखादे साधनही नाही. ५ देवाची पूजा करताना धूप, दीप, नैवेद्य, आरती यांचा पसारा मांडून मी दुकानही पातले नाही ६ लोकांना काही गुपिते सांगावीत, त्यांच्या मनांतील काही गोष्टी ओळखण्यात यासाठी मला एखादा बेताळही प्रसन्न नाही ७ लोकांना पुराण सांगून नादी लावणारा पुराणीकही मी नाही. सांगावे एक व करावे दुसरे असे मी करीत नाही. ८ मला घटापटादी शब्दाच्या साहाय्याने दुर्बोधी पंडितांप्रमाणे वादविवादही करता येत नाही. ९ किंवा धुपाटण्यात ऊद वगैरे धुपवून, जाळून मी आनंदीचा, अंबाबाईचा उदो उदो करीत नाही. १० चार अडाणी किंवा बावळट लोकांना भोवती जमवून मी नामजपाच्या माळा थोडण्याचे नाटकही करीत नाही. ११ मी वेदान्ताचे कोडे किंवा अथर्ववेदातील स्तंभन, मोहन, उच्चाटण इत्यादी जारणमारणादी क्रियाही आणीत नाही. १२ तुकाराम महाराज म्हणतात, मी वर सांगितलेल्या लोकांसारखा नाही, हे वेडे लोक वरील- सारखे प्रकार करून नरकाची जोड करतात. मी हरिभक्तीखेरीज दुसरे काहीच करीत नाही १३ विवरण :- तुकोबांनी व इतर साधुसंतानी सर्वांना अतिशय सुलभ असा विठ्ठलभक्तीचा मार्ग वारंवार सांगितला आहे. नामस्मरण, भजन, कीर्तन, एकादशी, सोमवार ही व्रते, पंढरीची वारी, गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंदनाचे टिळे, तुळशीची पूजा यासारखे अनेक सोपे उपचार किंवा सहज सुलभ साधने सांगितली आहेत. परंतु बुवांच्या वेळी सामाजिक भ्रष्टाचार सर्व बाजूंनी होत होता, लोकांचे प्रपंच विस्कटले होते, धार्मिक आचारविचार नष्ट झाले होते, देवदैवते याचा मुळमुळाट झाला होता. भोंदू लोक अशा प्रसंगी वरवर दिखाऊ व चमत्कार दाखवून सर्वसामान्य जनतेस फसवीत होते. त्याचा भरपूर समाचार बुवांनी अभंगातून घेतलेला आहे भोंदू व लबाड लोक सामान्य स्त्रीपुरुषांना कसे फसवितात त्याचे मोठे समर्पक व बोलके चित्र या अभंगात बुवानी काढले आहे. कुणी लोकांना फसविण्यासाठी कपट करतात, कुणी जादुटोणा करून, जडीबुट्टी देऊन, चमत्कार दाखवून लोकांना फसवितात कुणी मठाधिपती असतात. कुणी विलासी असतात, बुवांची जमिनीची व मठांची थोरवी असते, कुणी पूजेचे बाह्य अवडंबर माजवून बसलेले असतात कुणाला दुसऱ्याच्या मनातील ओळखणारी वेताळा- सारखी भूतसृष्टी प्रसन्न असते. अंगाराधुपारा देऊन हे लोक जनतेस फसवीत असतात. पुराणात एक सांगणारे व आचरणात दुसरे करणारे कुणी ढोंगी पुराणीक असतात, कुणी घटाकाश, पटाकाशासारख्या शाब्दिक बडबडीने वेदान्ताची व्यर्थ चर्चा करीत असतात कुणी देवीच्या नावे दिवटी पाजळवून आनंदीचा उदो उदो करतात. कुणी १ स्तंभ आणि उच्चाटणे.