सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 162, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंलागते किंवा उटीची द्रव्ये जशी तेलात मुरत जातात तसे हे लोक एकमेकाच्या ध्यानात बुडून जातात पण मुख्य गोष्ट मुलीचा पैसा घेऊ नये हे मात्र कुणास समजत नाही ५ अशा या तुमच्या कर्मामुळे तुकाराम महाराज म्हणतात, तोंडावर थुकण्याचे व पुढे मिळणाऱ्या नरकाचे मात्र साधन तुम्ही करून ठेविले आहे ६ २७० ब्रह्महत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केले ॥ १ ॥ ऐका जेणे विकिली कन्या । पवाडे त्या सुग्याचे ॥ २ ॥ नरमास खादली भाडी । हाका मारी म्हणोनि ॥ ३ ॥ अवघें पाप केले तेणे । जेणे सोने अभिलाषिले ॥ ४ ॥ उच्चारिता मज तें पाप । जिव्हे काप सुटतसे ॥ ५ ॥ तुका म्हणे कोरान्न राड । बेटा भाड मागे ना का ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - सुग्याचे-कुत्त्याचे भाडी-कुंटणखाना चालवून मिळविलेला पैसा, अभिलाषिले-इच्छिले, भाड-भाडखोर मनुष्य अर्थ - त्याच्या हातून ब्रह्महत्या घडली, त्याने जणु गाई मारल्या आणखी काही पापे त्याने केली १ त्याने म्हणजे कुणी ? ऐका तर ज्याने आपली कन्या विकली त्या कुत्र्याची कीर्ती नीट ऐका २ या अधमाने मुलीच्या लग्नात पैसा घेऊन नरमास खाल्ल्याचे व कुंटणखाना चालवून पैसे मिळविल्याचे पाप याने केले म्हणून तर त्याच्या नावाने हाका मारतो आहे ३ जगातील सर्व पापे त्याने केलेली आहेत असे समजा कारण त्याने मुलीला विकून सोन्याची अभिलाषा धरलेली असते ४ त्याचे पाप उच्चरतानाही माझ्या जिभेचा थरकाप होत आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, मुलीचे द्रव्य घेणार, तिचा बाप हा भाडखोर व आई राड भिक्षा का मागेनात ! ६ २७१ याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥ १ ॥ फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग । पूर्वजासि लाग निरयदंडीं ॥ २ ॥ ऐके राजा न करी दंड । जरि या लड दुष्टासि ॥ ३ ॥ तुका म्हणे त्याचे अन्न । मद्यपाना समान ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पक्ष-बाजू निरयदंडी- नरकाच्या शिक्षेस अर्थ - अशा प्रकारे कन्येची विक्री करून जे पैसे मिळविणारे असतील, त्यांची बाजू घेणारे जे असतील तेही त्याच गुन्हेगारासारखे समजावेत १ त्यांची बाजू घेतल्याने त्याला फुकट दुःख प्राप्त होते आणि तो स्वतःच्या पूर्वजांनाही नरकाच्या शिक्षेस पाठवितो २ जो राजा अशा दुष्टाला दंड करीत नाही, ३ तो अन्न खात असला तरी त्याचे ते सेवन मद्याचे आहे असेच समजावे ४ २७२ कपट नाही एक । नेणे भुलवायाचे लोक ॥ १ ॥ तुमचे करितो कीर्तन । गातो उत्तम ते गुण ॥ २ ॥ दाऊ नेणे जडीवुटी । चमत्कार उठाउठी ॥ ३ ॥ नाहीं शिष्यशाखा । सांगो अयाचित लोका ॥ ४ ॥ नव्हें मठपति । नाहीं चाहूराची वृत्ति ॥ ५ ॥ नाहीं देवाचॅन । असे माडिले दुकान ॥ ६ ॥ नाहीं वेताळ प्रसन्न । काहीं सांगों लाण खुण ॥ ७ ॥ नव्हे पुराणिक । करणे सांगणें आणीक ॥ ८ ॥ नेणें वाद घटा पटा । करिता पंडित करटा ॥ ९ ॥