भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 161, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 161

सार्थ तुकारामगाथा १३१ ब्राह्मणांनी आपला धर्म सोडला आणि ते चहाडखोर व चोर बनले आहेत ३ आपले टिळे व पंचांग लपवून, सोडून देऊन ते कातड्याची विजार घालू लागले आहेत ४ न्यायाच्या किंवा राजाच्या सिंहासनावर बसतात व अन्नाशिवाय प्रजेस पीडा देतात ५ स्वयंपाकगृहात राहून साद्या जमाखर्च लिहितात व तेलतुपाचा हिशेब करून कसे तरी जिणे जगतात ६ नीच माणसांचे चाकर होऊन चुकले की वरिष्ठाकडून वारंवार मार खातात ७ राने लोक प्रजेस पीडा फारच देतात जमीनदार गरिबाला फार तोडून बोलतात ८ ब्राह्मण क्षत्रियाची ही दशा, मग वैश्यशूद्राची काय वर्णन करावी ? ते सहजच आणखी नीच अवस्थेस गेले ९ आत-बाहेर सर्वत्र बाह्य रंगाचा देखावा आहे, आतमात्र हिरवेकच्चेच आहेत सर्वजण १० तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही झोपला आहात काय ? समाजाची काय ही अवस्था ! लौकर उद्धारासाठी धावून या ना ११

२६८ साळंकृत कन्यादान । करिता पृथ्वीसमान¹ ॥ १ ॥ परि ते न कळे या मूढा । येईल कळो भोग पुढा ॥ २ ॥ आचरता कर्म । भरे पोट राहे धर्म ॥ ३ ॥ सत्या देव साहे । ऐसे करूनिया पाहे ॥ ४ ॥ अन्न मान धन । हे तो प्रारब्धा आधीन ॥ ५ ॥ तुका म्हणे सोस । दुःख² आता पुढें नास ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा - साळंकृत-अलंकारासहित, सोस-हव्यास, नास-नाश अर्थ - अलंकार वगैरे घालून मुलगीचे दान केले की ते कन्यादान पृथ्वीच्या दानाप्रमाणे होणार आहे १ पण ते या मूर्खास समजत नाही पुढे भोगावयास लागले म्हणजे कळेल मग सर्व २ ज्याचे त्याने आपले विहित कर्म केले की पोट भरून आनंद होईल एवढा धर्म होतो ३ सत्याला देवाचे नेहमी साहाय्य असते सत्याने वागून तर पाहा ४ अन्न, मान, धन या गोष्टी आपल्या प्रारब्धाच्या आधीन आहेत ५ तुकाराम महाराज म्हणतात, पुढल्याहि गोष्टींचा हव्यास धरलास की पुढे खचित नाश आहे असे समजावे किंवा आता सुख वाटले तरी पुढे नाशच असतो ६

२६९ दिवट्या वाद्ये लावूनि खाणे । करूनि मढण दिलो हातीं ॥ १ ॥ नवरा नेई नवरी घरा । पूजन करा पायांचे ॥ २ ॥ गौरविली विहीण व्याही । घडिले कांहीं ठेवू नका ॥ ३ ॥ करू द्यावे व्हावे वरें । ठायींचे का रे न कळोचि ॥ ४ ॥ वहाडियाचे लागे पाठीं । जैसी उटिका तेलीं ॥ ५ ॥ तुका म्हणे जोडिला थुका । पुढें नरका सामग्री ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा - मढण-सुशोभा अर्थ - लग्नाच्या वेळी घरात दिवे लावून, वाद्ये वाजवून, पक्वान्नाचे भोजन करून अलंकारांनी नटलेली नवरी मुलगी नवऱ्या मुलाच्या हातात देतात १ मग नवरा तिला थाटामाटाने घरी नेतो, नवऱ्याच्या पायांचे या वेळी पूजन वगैरे होते २ व्याह्याला व विहिणीला पोशाख वगैरे देऊन त्यांचा गौरव केला जातो व जर काही कमी जास्त समारंभात घडले असेल तर मनात ठेवू नका असे सांगितले जाते ३ नवऱ्याचे म्हणणे वगैरे जे काही असेल ते सर्व यथासांग कर द्यावे, पण या सर्वांच्या मुळाशी असणारी समजुतीची गोष्ट लोकांना फणी फळत नाही ? ४ जशी तेलामध्ये उटिका जिरून जाते त्याप्रमाणे ही विहिण भांडखोरपणे या वऱ्हाड्यांच्या पाठीमागे

१ पृथ्वी दानाच्या समान, २ सुख

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 161, कुल 611 में से · BharatKosha