सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 160, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१३२ सार्थ तुकारामगाथा चुकल्यासारखे होऊन टकमक पाहात असते ना ? ३ किंवा पाण्याबाहेर काढलेला मासा कसा तडफड तडफड करून तळमळतो, तशी माझ्या जिवाची अवस्था झाली आहे मी एकसारखा तळमळत आहे देवा ४ विवरण - भक्त ईश्वरासाठी किती व्याकुळ होतो याचा हा एक नमुना म्हणून उत्कृष्ट अभंग आहे ईश्वराच्या मीलनातील सुख, अद्वैतातील, एकरूपातील सुख अद्वितीय तर आहेच, पण हे प्राप्त करण्यासाठी जी मनाची लगबग होत, जी व्याकुळलेली अवस्था होते, करुणेने हृदय जे भरून येत त्यास तुलना कुठली ? कित्येक वेळा भक्तास याच अवस्थेची गोडी अधिक लागते अद्वैताच्याच भूमिकेवर पण द्वैतावर येऊन मीतूपणाचा थोडा भेद कल्पून माधुर्यतानी करणेचे अनेक अभंग केले आहेत त्याच्या हृदयाची आर्त हाक, त्याची तळमळ, त्याच्या जिवाची कासा- वीस अवस्था, त्याची तडफड, त्याची व्याकुळलेली अवस्था इत्यादींची मोठी हृदयभेदन पण ईश्वरी प्रेमाने भारावलेली अशी अभंग संपदा मराठीत अमोल अशी आहे ईश्वराला, विठ्ठलाला आई कल्पून मराठी संतानी जी करुणेने हाक मारली आहे तिच्यातून कित्येक अभंग स्फुरले आहेत ही केवळ एक माध्व्याची साधनरूप अवस्था असेही नाही, तर केवळ भक्तीसुखासाठीही साधुसंत असा पुकारा करीत असतात नामदेव आणि तुकाराम या दोन संतानी तर या करुण वाणीच्या आर्त उद्गारांनी मराठी वाङ्मयास एक तेजस्वी लेणेच घडविले आहे 'देशीपरदेशी झालो तुजविण, 'तुजविण आम्हा कोण हो पोषिता', 'मज का मोकलिलें । कयणा निरविले ?', धाव गा विठ्ठला, सोडवी आपुला दास', इत्यादी ओळींतून नामदेवानी परमेश्वरापाशी, विठ्ठला पाशी करुणा भाकली आहे 'येग येग विठाबाई', 'गंगा गेली सिंधूपाशी', 'तुजवांचूनि विठ्ठला । कोणी नाही रे मजला', 'पोट भरुनि घालासी । मज सांडूनी कोठे जासी ?', 'का या उशीर लाविला । माझा विसर पडला', 'येरे येरे माझ्या रामा । मनमोहन मेघ श्यामा' यासारख्या ओळींतून जनाबाईने आपली करुण व्यथा व्यक्त केलेली आहे तुकारामबुवांनीही इतरत्र, 'मायें मोकलिले कोठें जावे बाळें ?', 'येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटता आळविता', 'कोण आम्हा पुसे शिणले भागले', 'तुजलागीं माझा जीव झाला पिसा, 'न लगे मायेसीं बाळ निरवावें' इत्यादी ओळींतून आपल्या मनाची तळमळ समर्थपणे उभी केली आहे २६७ हातां होन द्यावी बेना । करिती लेकीच्या धारणा ॥ १ ॥ ऐंसे धर्म जाले कळी । पुण्य रंक पाप बळी ॥ २ ॥ सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥ ३ ॥ टिळे लपविती पातडीं । लेती विज़ारा कातडी ॥ ४ ॥ बैसोनिया तख्ता । अन्नेविण पिडिती लोका ॥ ५ ॥ मुदबख लिहिणे । तेलतुपावरी जिणे ॥ ६ ॥ नीचाचे चाकर । चुक लिया खाती मार ॥ ७ ॥ राजा प्रजा पीडा । क्षेत्रीं दुश्चितासी तोडी ॥ ८ ॥ वैश्यशूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ॥ ९ ॥ अदघे वाहूच रग । आत हिरवे घरी सोंग ॥ १० ॥ तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धावा ॥ ११ ॥ शब्दार्थ व टीपा - होन-नाणे, बेना-स्वत ची मुलगी, धारणा-भाव, कळीं-कलियुगात, रंक-गरीब, द्विज- ब्राह्मण, पातडीं-पंचाचे, मुदबख-स्वयंपाकगृहातील जमाखर्च. अर्थ - समकालीन दु स्थितीचे वर्णन करताना तुकोबा म्हणतात, लग्नाची झालेली मुलगी दुसऱ्यास देताना लोक तिच्याबद्दल हातात सुवर्णाची नाणी घेऊन तिचा भाव ठरवितात १ असे या कलियुगात उलटे धर्म बनले आहेत पुण्यवान आहेत ते गरीब बनले असून पापी बलिष्ठ झाले आहेत २ सर्वांनी आपापले आचार सोडले