भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 159, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 159

सार्थ तुकारामगाथा १३१ सांगितले आहे, 'यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे' असा विश्वास श्रीकृष्णाने प्रकट केला आहे. सर्वत्र अधर्म माजला, दुष्टाचे प्राबल्य फार होऊन सज्जनाना त्रास होऊ लागला की, मग मी काय करतो ? ज्ञाने- श्वरानी आणखी रहस्य प्रकट करताना म्हटले आहे, 'अधर्माचि अवधि तोडीं । दोषांची लिहिलों फोडीं । सज्जनां- करवीं गुढी । सुखाची उभवीं ॥ दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा भानु गियशीं । धर्मासीं नीतीशीं । शेंस भरी ॥ भी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं । तें योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥ .... ऐसे या काजालार्थी । अवतरें मी युगींयुगीं ।' स्वतःच्या भक्ताचे रक्षण करण्याचा पतकरच जणू ईश्वराने घेतलेला असतो. 'सेवीं भी तयां । जैसे असतो तंतिया । कळिकाळ नोकोनिया । घेतला पट्टा' असे पुढे बाराव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे सज्जनाचे हित व्हावे म्हणून दुर्जनाचा नाश करावा असे साधुसंत स्पष्टपणे अनेक ठिकाणी सांगतात 'दुर्जनाचा मान । मूर्खे करावा खंडण', 'दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडो माती' इत्यादी ओळींतून खळनिर्दळण किती आवश्यक आहे हेच तुकोबानी सांगितले आहे. 'पाया झाला नाहू' या ओळीने सुरू होणाऱ्या एका अभंगात बुवानी 'अधमासि तो अधम' असाच उपदेश केलेला आहे २६५ करावें गोमटें । बाळा माते तें उमटे ॥ १ ॥ आपुलिया जीवाहूनी । असे व्हाल्हें तें जननी ॥ २ ॥ वियोग तें तीस । त्याच्या उपचारें तें विष ॥ ३ ॥ हरणी चुकली पाडसा । धुंडाळी ती दाही दिशा ॥ ४ ॥ रानीं हिंडो गेली गाय । घरीं वत्स वाट पाहे ॥ ५ ॥ तुका म्हणे पायें । डोळा सुखाये ज्या न्यायें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- उमटें-समजते, पटते, व्हाल्हें-प्रिय अर्थ :- आपल्या लाडक्या मुलाला काही तरी रोज चांगले करावे असे आईस नेहमीच वाटत असते; पटत असते. १ आपल्या स्वतःच्या जियापेक्षा तिला आपले मूल अधिक प्रिय वाटत असते. २ तिच्या उपचारात जे सुख तिला वाटत असते ते त्याचा वियोग झाल्यावर संपते, म्हणून वियोग तिला विषाप्रमाणे वाटतो. ३ हरिणी आपल्या पाडसास चुकली की ती त्याचा शोध संरांवरा धावून दाही दिशांना घेत असते. ४ गाय रानात घाऱ्यासाठी हिंडत असते, पण घरी गोठ्यात वासरू भुकेलेले आहे याची जाणीव तिला सतत असते. घरी वासरू वाट पाहात आहे याचा वेध तिला निरंतर असतो. ५ तुकाराम महाराज म्हणतात, पावास शीतोपचार केल्यावर जसे डोळयांना सुख होते तसे मुलाच्या सुखाने माता संतुष्ट होते. ६ २६६ कन्या सासुऱ्यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥ १ ॥ तैसे जाले माझ्या जीवा । केव्हां भेटसी केशवा ॥ २ ॥ चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥ ३ ॥ जीवना वेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- जीवन-पाणी, मासोळी-मासा. अर्थ:- या एका सर्वप्रसिद्ध व गोड अभंगात आपण परमेश्वरासाठी कसे आतुर आहोत, कसे तळमळतो याचे फार सुदरु व समर्थ असे वर्णन करताना बुवा म्हणतात, लग्न झाल्यावर लहान मुलगी सासरी निघताना, तिला माहेर व माहेरची माणसे सोडताना जसे दुःख होते, ती पुनः पुनः माये घराकडे वळून पाहते. १ त्याचप्रमाणे देवा, माझ्या जिवाची अवस्था झाली आहे. देवा, मला कधी भेट देशील? २ आई चुकली किंवा दृष्ट्टिआड झाली की लहान मूलू