भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 158, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 158

१३० सार्थ तुकारामगाथा अक्षराची ओळख होण्यासाठी प्रथम खडे मांडून लहान मुलांना दाखवावे लागतात, त्यातलाच हा प्रकार काहींनी सांगितला आहे 'ओनाम्याचे काळे, खडे मांडियले बाळें' असे तुकोबांनीही म्हटले आहे परंतु निर्गुण उपासनेपेक्षा सगुण उपासना कमी असाही त्याचा अर्थ नाही मूर्तीपूजा किंवा सगुणपूजा हे एक निर्गुणनिराकारप्राप्तीचे साधन अशीही भूमिका नाही खरे म्हणजे एक भाव असेल तर मूर्तीमध्येही ईश्वरी तत्त्वाचा अंश का सापडू नये ? 'कासया पाषाण पूजिती पितळ' असे म्हणून पाषाण व पितळ याची पूजा का करता असे तुकोबांनी विचारिले आहे हे खरे असले तरी पुढे लागलीच 'अष्ट धातू खेळ भावेविण । भावचि कारण भावचि कारण' असेही बजावले आहे भाव असला तर प्रतीक कोणतेही चालेल आणि दुसरे असे की परमेश्वरतत्त्व सर्वत्र भरून आहे तर मग ते मूर्तीत अथवा प्रतीकात का नाही? 'अवघें ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ? असा प्रश्न स्वतः तुकारामबुवांनीच विचारला आहे याचाच अर्थ असा की मनाची तीव्र भावना असेल तर कोणतेही प्रतीक चालेल तुकोबांच्यासमोर नाना शंका घेऊन लोक बसलेले असावेत म्हणून कधी ते 'पाषाण नव्हे विष्णू' असे सांगतात, तर कधी प्रतिमा तो देव कैसा नव्हे ? असे विचारतात एक भक्तिभाव असेल तर परमेश्वराच्या पूजनास कोणतीही वस्तू चालेल २६३ ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥ १ ॥ येरा मानी विधि पाळण्यापुरते । देवाचीं तीं भूते म्हणोनिया ॥ २ ॥ सर्वभावे जालो वैष्णवाचा दास । करीन त्याच्या आस उच्छिष्टाची ॥ ३ ॥ तुका म्हणे जैसे मानती हरिदास । तेशी नाही आस आणिकाची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सांगाती-सोबती, विधि पाळण्यापुरते-केवळ उपचारासाठी, मानली-प्रिय वाटतात अर्थ - संतांची महती वर्णन करताना तुकोबा म्हणतात, जे साधुसंत विठ्ठलाचे पाय आठवतात ते माझे सोयरे व सोबती आहेत १ दुसऱ्या लोकांना केवळ ती देवाचीच रूपे आहेत म्हणून उपचारापुरते मी मानतो २ पण सर्व भावनांनी युक्त होऊन मी दास मात्र विष्णुभक्तांचाच झालेलो आहे त्याच्या उष्ट्या घासाची इच्छा मी करीन ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी ज्याप्रमाणे हरीच्या दासांना मानतो, ते जसे मला प्रिय वाटतात, तसे दुसरे कोणीही आवडत नाहीत दुसऱ्याची आशा मला वाटत नाही ४ २६४ दया तिचे नाव भूतांचे पाळण । अणीक निर्दळण कंटकाचे ॥ १ ॥ धर्म नीतीचा तो ऐकुनी वेव्हार । निवडीले सार असार ते ॥ २ ॥ पाप त्याचे नाव न विचारिता नीत । भलतेचि उन्मत्त करी सदा ॥ ३ ॥ तुका म्हणे धर्म रक्षावया साठी । देवास ही आटी जन्म घेणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भूतांचे-प्राण्यांचे निर्दळण-नाश कंटक-दुष्ट लोक, नीत-नीती आटी-त्रास अर्थ - दया तीच की जिच्यामुळे सर्व प्राणिमात्रांचे पालनपोषण होते व दुष्ट लोकांचा नाश होतो १ धर्म व नीती या सबंधीचा सब व्यवहार पाहून आम्ही हेच तात्पर्य काढलेले आहे २ त्याचे नाव पाप की ज्याच्या योगाने मनुष्य उन्मत्त होतो, त्याला नीतीची ओळख उरत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, धर्माचे रक्षण करण्या- साठी प्रत्यक्ष देवालाही फार त्रास घ्यायला लागतो नाना जन्म घ्यावे लागतात ४ विवरण - तुकारामबुवांचा हा एक छोटा, सुटसुटीत, अर्थपूर्ण व सर्वप्रसिद्ध असा अभंग असून यात दया म्हणजे काय याचा स्पष्ट उल्लेख केला आहे सर्व प्राणिमात्रांचे पालन करण्यासाठी दुष्टांचा नाश करणे ओघानेच येते दया म्हणजे कंटकांचे, दुष्ट लोकांचे निर्दळण व मग सज्जनांचे संरक्षण हा अर्थ येथे बुवांनी निश्चयाने सांगितला आहे आणि यास भगवद्गीतेचा सर्वप्रसिद्ध असा आधार आहेच धर्माची ग्लानी होऊन जेव्हा अधर्म फार माजतो तेव्हा मीच स्वतः अवतार घेऊन साधूंचे रक्षण करतो व दुष्टांचा नाश करतो असे चौथ्या अध्यायात भगवंतानी