सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 168, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१४० सार्थ तुकारामगाथा रामलक्ष्मणास सोडवून आणले. ४ हा हनुमंत रामचंद्रजवळ दोन्ही हात जोडून नेहमीच उभा असतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, या वायुपुत्राच्या जपाने सर्व पापाचा नाश होत असतो. ६ २८५ काम घातला बांदोडी । काळ' केला देशधडी ॥ १ ॥ तया माझें दंडवत । कपिकुळीं हनुमंत ॥ २ ॥ शरीर वज्रा ऐसे । कवळी ब्रह्मांड जो पुच्छे ॥ ३ ॥ रामाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - बांदोडी-दंडीत अर्थ :- या हनुमंताने कामास जिंकून त्याला बंदिवासातच टाकले व यमास किंवा काळास देशोधडीस लाविले. हा चिरंजीव राहिला. १ वानरवंशातील या हनुमंतास माझे नमस्कार असोत. २ या हनुमंताचे शरीर वज्रासारखे कठिण असून याचे शेपूट एवढे आहे की त्याचा वेढा सर्व ब्रह्मांडालाही बसेल. ३ अरे रामाच्या सेवका, हनुमंता, मी तुकाराम तुम्हास शरण आलो आहे. ४ २८६ हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥ १ ॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ २ ॥ करोनी उड्डाण । केले लंकेचे शोधन' ॥ ३ ॥ जाळियेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- महाबळी-मोठा पराक्रमी, शोधन-शोध, शुद्ध अर्थ :- हा हनुमंत मोठाच बलवंत आहे, कारण याने त्या दुर्लाड्य व मदोन्मत्त रावणाची दाढीच जाळून टाकली. १ त्या श्रेष्ठ व बलवान हनुमंतास माझा नमस्कार पुनः पुनः असो २ समुद्रावर उड्डाण करून याने सर्व लंकेचा शोध लावला, लंका जाळून शुद्ध केली ३ याने सारी लंका जाळून रावणाच्या मदमत्त अशा वैभवाचा नाश केला मारुतीचा हा पराक्रम फार मोठा असून तुकाराम महाराज धन्य धन्य म्हणून त्याचा गौरव करतात ४ २८७ कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकाँ गू फेडावा ॥ १ ॥ ऐसे भिन्न भिन्न सांटे । केले प्रारब्धाने वांटे ॥ २ ॥ हिरे दगड एक खाणी । कंचे विजातीसी पाणी ॥ ३ ॥ तुका म्हणे शिरीं । एक एकाची पायरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कुंभ-मडके, पाकी-स्वयंपाकात, फेडावा-काढण्यासाठी, सांटे-प्रकार, पाणी-तेज अर्थ .- सर्व मडकी ही कुंभाराच्या एकाच आव्यात तयार होतात, परंतु एक स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाते व दुसरे गू काढण्यास उपयोगात येते १ याच न्यायाने प्रारब्धाने माणसांचे निरनिराळे प्रकार केले आहेत. २ हिरे व दगड एकाच खाणीतून जन्मास येतात, पण हिऱ्यास चमकदार पाणी असल्याने ते वेगळ्या जातीचे ठरतात व दगड दगडच राहातात ३ तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे एकेकाचे नशीब पाहा कसे बनते, एक हिरा राज्याच्या डोक्यावरील मुकुटात जाऊन बसतो व दुसरा दगड म्हणून कुठेतरी पायरीला बसतो ४ २८८ मांडे पुऱ्या मुखे सागो जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥ १ ॥ ऐशियाच्या गोष्टी फिक्या मिठेविण । रुचि नेदी अन्न चवी नाही ॥ २ ॥ बोलों जाणे अगी नाहीं शूरपण । काय तें वचन जाळावें ते ॥ ३ ॥ तुका म्हणे बहुतोडे जे वाचाळ । तेग तेच मूळ लटिक्याचें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मात-गोष्ट, रिते-रिकामे, बहुतोंडे-फार बोलणारे, तेंग-तेच, लटिक्याचे-खोट्याचे. १ काळ घातला तोरडी, २ दहन