सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 169, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १४१ अर्थ :- भांडे, चुन्या याच्या नुसत्या गोष्टीच तोंडाने म्हटल्याने काय साधते ? तोंडास फक्त पाणी सुटते व हात मात्र रिकामेच राहून एकमेकांवर चोळले जातात १ असे नुसते बोलणाऱ्या माणसाच्या गोष्टी मिठाशिवाय असणाऱ्या अन्नाप्रमाणे फिक्क्याच असतात, त्या अन्नाला व त्या बोलण्याला कसलीच चव नसते. २ तोंडाने खूप बडबड करतो, पण अंगीं शूरपणा मुळींच नाही; त्याच्या तोंडाची बडबड काय जाळायाची ? तिचा काहीच उपयोग नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे अतिशय व वृथा बडबड करणारे पुष्कळजण मोठे वाघाळें असतात पण त्याचे सारे बोलणे सर्व खोटेपणाचेच मूळ असते. त्यात सत्याचा किंवा स्वानुभवाचा अंशही कधी असत नाही. ४ २८९ न लगे चंदना सांगावा' परिमळ । वनस्पतिमेळ हाकारूनी ॥ १ ॥ अंतरींचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ २ ॥ सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरण कर म्हून ॥ ३ ॥ तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- परिमळ-सुवास, अंतरीचे-मनातील, म्हून-म्हणून, मयूरें-मोर. अर्थ :- रानावनातील इतर झाडाझुडपांना आपल्या अंगच्या सुवासाबद्दल चंदनास सांगावे लागत नाही तो आपोआपच प्रकट होत असतो १ जे अंतरगात म्हणजे मनात आहे ते स्वभावतःच बाहेर धावत असते, व्यक्त होत असते. त्याला आवरून धरले तरी ते आवरत नाही. २ आपले प्रकाशकिरण तेजस्वी आहेत असे म्हणून लोकांना सूर्य स्वतः होऊन काही सांगायला जात नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मेघ दिसताच मयूर आपोआप नाचू लागतात, त्यांनाही सांगावे लागत नाही. जे खरे आहे ते लपविता येत नाही. ४ २९० चंदनाचे हात पायही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥ १ ॥ दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साखर अवघी गोड ॥ २ ॥ तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळेचि ना ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- हीन-कमी प्रतीचे, साखर-साखर. अर्थ :- चंदनाचे हातपाय, खोडमूळ सर्व अंगच चंदनमय असते. परिसाची कोणतीही बाजू कधी हीन नसते. तो अंतर्बाह्य परीसच असतो. १ दिव्याास मागेपुढे अंधार कसा दिसणार ? साखर सर्वांगाने गोडच असणार. २ तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणेच सज्जन सर्व बाजूंनी सज्जनच असायचा अवगुण पाहता कुठेही दिसणार नाही. ३ २९१ मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥ १ ॥ मने प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मने इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ २ ॥ मन गुरु आणि शिष्य । करी आपुलेंचि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥ ३ ॥ साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सिद्धी-जे साधायाचे ते, मात-गोष्ट, आनु-दुसरे. अर्थ :- तुम्ही आपले मन आधी प्रसन्न ठेवा. कारण जे साधायाचे आहे त्या सिद्धीचे सर्व कारण मन हेच आहे. मोक्ष अथवा बंधन, सुख, समाधान, इच्छा वगैरे जे काही आहे ते सर्व मनापासूनच मिळते. १ दगडाची १ पुसावा