सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 171, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १४३ लागते. भावार्थ रामायणात एकनाथांनी मनोजयाचा एक उपाय सुचविला आहे. ते म्हणतात, 'मनें मनातें आवरावें । मनें मनातें निग्रहावें । मनें मनातें धरावें । मनें मारावें मनातें ॥' या मार्गाने जर मन स्वाधीन झाले, श्रीहरीकडे वळले तर मग सर्व सुख हाती आलेच म्हणून समजावे. जर असे हे मन हाती येईल तर काय काय सिद्ध होईल, याचे वर्णन करताना नाथांनी म्हटले आहे, 'या मनाची एक उत्तम गती । जरी स्वयें लागलें परमार्था । तरी दासो करी चारी मुक्ती । वे शोधीनि हातीं परब्रह्म ॥' एवढे या मनाचे सामर्थ्य आहे. यासाठीच तुकारामबुवा या मनास प्रमथ करा म्हणून सागतात. या मनास वश करुन घेतल्याने रोज नवीन नवीन जागृती येते राहील असे त्यांनी 'तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दीस जागृतीचा' या शब्दात सांगितले आहे. तुकोबांनी स्वतःच्या आपुल्याचा जो मधून मधून क्म दिला आहे त्यावरून त्यांनाही या मनास ताब्यात ठेवण्यासाठी केवढे सायास पडले असावेत याची कल्पना येते. 'आवरितां मन नायरे दुर्जन । घात करी मन माझें मज,' 'निरोधिते परी न मोडे विकार । बहूं हीं दुस्तर विषय द्वारें', 'एकाचेंही मज न घडे दमन । अवधीं नेमून फंसा राखौं' यासारख्या ओळीतून तुकोबाच्या मनोनिग्रहाच्या प्रयत्नाची थोडीफार कल्पना येते. 'कोण तुम्हांवीण मनाचा चालक । बुजे सांगा एक नारायणा ?' म्हणून एके ठिकाणी प्रश्न विचारून त्यांनी आपल्या अवखळ मनाम काही उपाय सुचविले आहेत. 'मना एक करों । म्हणे मी जाईन पंढरी ।', 'देवाचिये पायीं मना देईं बुडी । नको धांवो घोडी इंद्रियांचे' असा काही ओळीतून त्यांनी मनाम वश करण्याचे मार्गही सुचविले आहेत. या सर्व प्रयत्नाचा अर्थ हाच की सर्व सिद्धीचे वा वधमोक्षाचे खरे कारण मन हे एवच आहे 'मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः' हाच विचार तुकाराम महाराजांच्या समोर असावा या मनामुळेच मोक्ष वा बंधन याची प्राप्ती होते २९२ मायबापें जरी सर्पीण बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥ १ ॥ चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥ २ ॥ तुका म्हणे नरकों घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- संगें-पंगतीत, न पवे-पावत नाही. अर्थ :- आई सर्पीण व बाप बोका असल्यावर त्यांच्या संगतीत मुलाला सुख कसले लागणार ? तो कधीच सुखी होणार नाही कारण सर्पीण अंडो नासणार व बोका पिले खाणार. १ चंदनाचा शूळ असला आणि बेडी सोन्याची असली तरी सुख कसे घाटणार ? चंदनाचा शूळ आपले प्राणघाताचे काम करणारच. त्याच्या सुगंधाचा वा थडपणाचा काय उपयोग ? सोन्याची बेडी नाशच करणार. २ तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे ज्ञानाचा गर्व झाला म्हणजे सुख न होता दुःखाचा नरकच प्राप्त होणार. ३ २९३ शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥ १ ॥ पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मिळती अर्था निजसुखा ॥ २ ॥ तुका म्हणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे नाहीं ठावी वस्तु ॥ ३ ॥