भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 179, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 179

सत्य तुकारामगाथा १५१ आपण न वजे हरिकीर्तना । अणिका वारी जातां कोणा । त्याच्या पापें आणा । ठेंगणा महा मेरु ॥ ५ ॥ तया दंडी यमदूत । जाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - अधम-दुष्ट खळ-दुष्ट, न वजे-जात नाही, वारी-अडथळा आणतो अर्थ - जे लोक एकादशीच्या दिवशी अन्न खातात, सुग्रास अन्नाचे भोजन करतात, त्यांचे खाणे कुत्र्याच्या विष्ठेप्रमाणे समजावे ती माणसेही अधमच म्हणावीत १ या थोर एकादशी व्रताचे माहात्म्य ऐका याचे आचरण लोक नित्यनेमाने करतात या दिवशी लोक परमेश्वराचे कीर्तन करतात, स्वतः त्याचे स्तवन गातात, ऐकतात असे लोक प्रत्यक्ष विष्णूसारखेच होत २ या दिवशी विडा खाल्ला तर ते खाणे विडाळणीच्या विष्ठाळाप्रमाणे अशुद्ध मानावे असा पापी मनुष्य कलिष्ट अशा यमाच्या हातांतच सापडत असतो तो काही त्याच्या हातून सुटणार नाही ३ या दिवशी जो खाली शय्या करून स्त्रीशी विलास भोग करतो त्याला क्षयरोग जडतो त्याला जन्माच्या भयंकर अशा व्याधी जडतात ४ असा हा दुष्ट मनुष्य आपण स्वतः हरिकीर्तनास तर जात नाहीच, पण दुसरे कोणी जात असतील तर तो अडथळा आणतो याची पापे फार मोठी असतात, त्याच्यापुढे मेरुंपर्यंत ठेंगणाच वाटावा ५ त्याला यमदूत नेहमीच शिक्षा देतात, ते त्याचेच अंकित होतात तुकाराम महाराज म्हणतात, एकादशी व्रत न केल्यान असा हा परिणाम होतो ६ विवरण - भागवत संप्रदायात एकादशी महाव्रताचे माहात्म्य फार मोठे सांगितले आहे या दिवशी उपवास करून दिवस व रात्र हरिभजनात, नामसंकीर्तनात, प्रभूचिंतनात घालविण्याचा प्रघात आहे विठ्ठलाच्या भक्तांना या एकादशीचे महत्त्व विशेष वाटते मन व वाणी पवित्र असावी, ध्यानधारणा सुलभ व्हावी आत्मचिंतनास सुकरता यावी म्हणून एकादशीचा उपवास सागितला आहे तुकोबांनी या एकादशी माहात्म्यास वारंवार उचलून धरले आहे न यासाठीच 'जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत याव लोकीं', 'एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्याची गति होईल नेणा' 'पंधरा दिवसा एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार।' इत्यादी ओळींतून त्यांना एकादशीचे महत्त्व सांगितले आहे एकनाथानी एकादशीमाहात्म्य नावाच स्वतंत्र प्रकरणच लिहिले आहे 'अनंत व्रतांचिया राशी । पाया लागतो एकादशी।' अस म्हणून एकादशी व्रत कस आचराव हेही त्यांनी विम्तारान सांगी तले आहे तुकारामबोवाप्रमाणेच त्यांनीही म्हटले आहे, ज्यासी न माने एकादशी । तनू जाणावी ती राक्षसी । त्यासी संपती घडे ज्यासी । नरकयासी तो होय ॥ ज एकादशीस भक्षिती अन्न । ते श्वानविष्ठेसमान । तांबुल तें रुधिरपान । रजस्वले स्त्रियेचें । एकादशीस स्त्रीभोग । क्यासी लागे क्षयरोग । यमयातना दुःखें अनेक । व्यथा जगीं तो पावे ॥ जो विंदो एकादशी । नरका जाणे न लागे त्यासी । तो स्वयेंचि नरपदासी । म्हणो आल्हाळा ॥ उलट जे एकादशी व्रत नियमाने करतात त्याचे भाग्य कसे असते ? एकनाथांनीच वणन कल आह 'जो एकादशी व्रत धरी । तो अतिशय पवित्र हरी । या लागी देव त्याचे घरीं । निरंतरी तिष्ठत ॥ जथें राहिले हरि वरिष्ठ । तोचि आश्रम होय श्रेष्ठ । ब्रह्मानंदें पिकली पेठ । ग्राहक तेथें हरिभक्त ॥ ऐसे एकादशीचे व्रत । निर्विकल्प पा आचरत । त्याचे घरों हरि तिष्ठित । कातेसहवर्तमान ॥ माघरी एकादशी । भक्त उद्धरती दोन्ह पक्षीं । मोक्षांचिया राशी । तिथियात्रा जोडिती ॥ घरों जरी व्रतासी दृढभाव । तरी सबाह्य प्रकट देव । वदनी संसार चाय । निजात्मठाय निजपदों ॥ जो एकादशीचा व्रती, त्यासी तीर्थे पें सेधिती । तेथे पुण्यं भगव प्राप्ती । क्षणमात्र न लागता ॥' या एकादशी व्रताची कथा व माहात्म्य याच वर्णन पुराणांतून आले आहे भागवताच्या नवम स्कंधातील अध्याय चार ते सहामध्ये अंबरीष राजाचे आख्यान आले आहे द्वादशीच्या दिवशी त्याच्या येथे दुर्वास ऋषी अतिथी म्हणून आले त्यांना भोजनाम येण्यास उशीर झाला, पण व्रतभंग होऊ नये म्हणून या भगवद्भक्त राजाने तोय पाऊन