सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 178, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१५० सार्थ तुकारामगाथा ८ शब्दार्थ व टीपा - मानसीं-मनात, वर्म-खूण, रहस्य, जोग-भिक्षा अर्थ - कुणी एक मनुष्य तटस्थ राहून ध्यानात मग्न आहे व दुसरा स्वभावत च आळशी आहे १ ही दोनही माणसे एकसारखी वरवर दिसतात पण दोहोंच्यांतील फरक जाणणारे असतात तेच खरे पारख करणारे होत २ कुणी खरोखरीची ध्यानधारणा करतात, जपजाप्य करतात व दुसरे नुसतीच झोप काढतात, पण दोहोंत फारच फरक आहे ३ एकाचा त्याग सर्वस्वाचा असून चित्त प्रभूशी रममाण झालेले असते, तर दुसऱ्या ढोंगी माणसाचे काम केवळ पोटासाठी भिक्षा मागण्याचे होते ४ एकाची भक्ती पोटासाठी असते, तर दुसऱ्याची देवाची भेट घेण्यासाठी असते ५ या शब्दांतील रहस्य तुकाराम महाराज म्हणतात असे आहे की, वरवर एकसारख्या दिसणाऱ्या कर्माचे फळ मात्र भिन्न भिन्न असते ६ ३१० काय फळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥ १ ॥ आहे नाहीं हे न फळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ २ ॥ देखिले तें दृष्टी । मागे घालूनिया मिठी ॥ ३ ॥ तुका म्हणे भावे । माझ्या मज समजावे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सदैव-भाग्यवंत अर्थ - आपला बाप भाग्यवंत आहे की दुबळा दरिद्री आहे, हे काय लहान मुलाला समजत नसते ? १ आपण मागीत आहोत ती वस्तू बापाजवळ आहे की नाही हे काय त्यावेळी मुलाला समजत असते का ? २ त्याला एवढेच माहीत असते की, जे पाहिले ते मागायचे, बापाला मिठी घालून त्याचा हट्ट धरायचा ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, याच भावाने मी तुम्हास मागत आहे माझी समजूत काढावी ४ ३११ भजन घाली भोगावरी । अकर्तव्य¹ मनीं धरी ॥ १ ॥ धिग त्याचे साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥ २ ॥ नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जीवे आस² ॥ ३ ॥ हे ना ते से जाले । तुका म्हणे वाया गेले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अकर्तव्य-जे करू नये ते कर्म जीर्वे-मनापासून, जीवे-जिवंत राहता अर्थ - या माणसाचे भजन भोगासाठीच असते जे कर्म करू नये त्यासाठी, भोगासाठीच ज्याचा तर्कही करता येणार नाही अशाच्या प्राप्तीसाठीच हे भजन त्याचे असते १ अशा माणसाच्या साधुपणाचा धिक्कार असो त्याचे मन विटाळूनच जगात वावरत असते २ त्याच्या मनात वैराग्याचा लेशही नसतो त्याला पैशाची हास मना पासून असते त्यासाठीच तो जगत असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाला काही प्राप्त होत नाही त्याला इहलोकी समाधान मिळत नाही त्यास परलोकातही स्थान नसते त्याचे जीवितच वाया गेलेले असते ४ ३१२ एकादशीस अन्न पान । जे नर करीती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥ १ ॥ ऐका व्रताचे महिमान । नेमें आचरती जन । गाती ऐकती हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ २ ॥ अशुद्ध विटाळसीचे फळ । विष्ठा भक्षिता तांबूल । सापडे सबळ । काळहातीं न सुटे ॥ ३ ॥ सेज चाज विलास भोग । करी कामिनींशीं संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी मळिवंत ॥ ४ ॥ १ अकर्तव्य त २ जीवे आस