भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 177, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 177

सार्थ तुकारामगाथा १४९ अणीक एक कोड । नरका जावयाची चाड । तरी सतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥ ४ ॥ तुक म्हणे ऐसे । मना लायी राम पिसें । नाहीं तरी आलिया सायासे । फुकट जासी ठकोनी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कोड-हौंस, राम पिस-देवाची आवड, सायासे-प्रयत्नाने, ठकोनी-फसून अर्थ - अरे गृहस्था, हा नरजन्म फुकट जावा असे तुला वाटत असेल तर तूं द्यूत खेळ ना सारीपाटाचा डाव मांडून सारखा बैस १ मग देवाचे नाव कसले आले आहे? जागा असून झोपल्याचे सोंग जो करतो त्यास कुठला राम ? कुठला देव ? असा हा मनुष्य जन्मोजन्मीचाच अधम समजावा. त्याने फार मोठ्या दुःखाचे साधन करून ठेविलेले असते २ जो विषयसुखाविषयी लंपट आहे, दासींशी सबंध ठेवण्यात जो धीट आहे त्याच्या आयुष्याची वाट अशीच अधोगतीचीच मानावयास हवी ३ आणखी कुणास नरकासच जायची हौस असेल तर नेहमी कौतुकाने संताची निंदा करावी म्हणजे ठीक होईल ४ तुकाराम महाराज म्हणतात, अरे, तुझ्या मनाला रामाचे वेड लावून घे ना नाही तर मोठ्या प्रयत्नाने मिळालेला हा नरजन्म फुकट जाईल ना ! विनाकारण फसशील ना तूं ५ ३०८ अवघें ब्रह्मरूप रिता नाही ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥ १ ॥ नाहीं भाव तया सांगावे तें किती । आपुल्याला मतीं पाषाडिया ॥ २ ॥ जया भावें सत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकासि ॥ ३ ॥ तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळता खळीं दूषिला देव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - रिता-रिकामा, ठाव-स्थान, प्रतिमा-मूर्ती, पाषाडिया-नास्तिकांना, अनुमोदन-अनुभव, खळीं-दुष्ट लोकांना अर्थ - सर्व जगच ब्रह्मरूप आहे रिकामी जागा कुठही नाही, असे असताना मूर्तीत देव नाही असे कसे म्हणता ? १ ज्याच्या मनांत भावच नाही, त्यांना सांगावे तरी किती ? असे नास्तिक लोक आपापल्या मतालाच धरून असतात २ सत ज्या भावनेने बोलतात त्याची प्रचीती केवळ शब्दांतून कल्पून घेणारांना येत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतानी केवळ भावालाच बलवान केले, महत्त्व दिले पण हे रहस्य न कळल्यामुळे दुष्ट लोकांनी देवालाच दूषण दिले ४ विवरण - तुकारामादा मत हे सगुण ध्यानाचे मोठे उपासक हात निर्गुण, निराकारास आपल्या आवडयासाठी देव व भक्त याच्या रूपान प्रकट झाला सगुणावर ध्यान केंद्रित करण सुलभ झाल हा देव भक्ताला आलिंगन देण्या साठी दोन मांडून चार हात धारण करून प्रकट होत राहिंग यास नाना आकारानी व रूपानी सौदर्य प्राप्त झाल देवाची खूण म्हणून एखादी मूर्ती वा एखादी प्रतिमा समोर आली म्हणून काही बिघडले असे नाही मवत्र ब्रह्मतत्त्व पसरल आहे जिथा ब्रह्मतत्त्वच गच चराचर विश्वात व्यत्त झाले आह असे असेल तर प्रतिमेत किंवा मूर्तीत ते नाही असे म्हणता येणार नाही मग मूर्तीवर भाव ठेवून तिची भजनी केल्यास बिघडले कुठे ? असा तुकारामाच्या म्हणण्याचा भावार्थ, अधिक विवरण क्र २६२ च्या अभंगावरील पाहावे ३०९ एक तटस्थ मानसीं । एक सहजचि आळसी ॥ १ ॥ दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ २ ॥ एक ध्यानीं करितो जप । एक बैसुनि घेती झोप ॥ ३ ॥ एका सर्वस्वाचा त्याग । एका पोटासाठीं जोग ॥ ४ ॥ एका भक्ति पोटासाठीं । एका देवासवें गाठी ॥ ५ ॥ वर्म पोटीं एकां । फळें दोन म्हणे तुका ॥ ६ ॥

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 177, कुल 611 में से · BharatKosha