भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 176, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 176

१४८ सार्थ तुकारामगाथा अर्थ - देवा, माझ्याकडून जसे बोलविता तसा अनुभव द्या ना नाही तर सर्वत्र विटंबना होणार आहे माझी १ मिष्टान्न अथवा पक्वान्न जरी झाले तरी मिठाशिवाय त्याची काय गोडी ? जीव नसलेले शरीर शृंगारून काय उपयोग ? २ सतायणी नीट न झाली तर सर्व सोंग व्यर्थच आहे चांगले गुण नसतील तर चांगल्या रूपाच काय करायचे ? ३ अगणित द्रव्य खर्च केले व बाहुल्याबाहुल्यांची लग्न केले, त्याचा काहीच उपयोग नाही कारण या लग्नात खरी कन्या किंवा खरा पुत्र यांपैकी कोणीच नसते ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, काही अनु भव तुम्ही दिला नाही तर माझीही अवस्था अशीच होईल यात संशय नाही ५ ३०५ अंगीं ज्वर तया नावडे साखर । जन तो इतर गोडी जाणे ॥ १ ॥ एकाचिये तोंडीं पडिली ते माती । अवघे ते खाती पोटभरी ॥ २ ॥ चारितां बळें येत असे दांतीं । मागोनिया घेती भाग्यवंत ॥ ३ ॥ तुका म्हणे नरो संचित हे बरें । तयास दुसरे काय करी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ज्वर-ताप संचित-पूर्वकर्म अर्थ - ज्याच्या अंगात ताप आहे त्यास साखर गोड लागणार नाही इतर लोकांनाच तिची गोडी समजणार १ एखाद्याच्या तोंडात अन्न पडले तर ते मातीसारख होऊन जाते, पण दुसऱ्यांना मात्र ते पोटभर खाल्याचा आनंद मिळतो २ प्रयत्न करून जरी त्याला अन्न चारले तरी ते त्याच्या दाती येते त्याला खाववत नाही, पण दुसरे भाग्यवंत असतात ते मात्र आवडीन मागवून घेऊन त्याचा स्वाद लुटतात ३ तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याचे पूर्वकर्मच बरे नसेल तर तो काय करणार ? त्याला दुसरा मनुष्य तरी काय करणार ? ४ ३०६ धिग जीणे तो वाईले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥ १ ॥ धिग जीणे ज्याचे लोभावरी मन । अतीतपूजन घडेचि ना ॥ २ ॥ धिग जीणे आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥ ३ ॥ धिग जीणे नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा ॥ ४ ॥ तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - धिग-तुच्छ अतीतपूजन-अतिथीचे पूजन अमित-अमर्याद अघोरिया-अघोर कर्म करणाऱ्यास अर्थ - जो बाईलबेडा आहे ज्याचे वागण बायकोच्याच तंत्राप्रमाणे आहे त्याचे जगणे व्यर्थ आहे त्याला या लोकात मान नाही, परलोकात स्थान नाही १ ज्याचे चित्त केवळ लोभावर, फायद्यावरच असते व ज्याला कधी अतिथीचे पूजन घडत नाही त्याचेही जिणे व्यर्थ होय २ ज्या माणसांस फार आळस फार झोप, ज्याचे खाणे फार व जो अघोर कर्म करणारा आहे त्याचेही जिणे व्यर्थ आहे ३ ज्याला कुठल्याही गोष्टीचा विवेक नाही, ज्याला वैराग्याचा विचार शिवत नाही, व जो केवळ मानासाठी, साधुत्वाच्या ढोंगासाठी झुरतो त्याचेही जिण व्यर्थ आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, असे जिण कित्येक लोकांचे व्यर्थ झाले आहे हे केवळ निंदा करणारे, वाद करणारे असून ते नरकातच जाणारे आहेत ५ ३०७ अरे हे देह व्यर्थ जावे । ऐसे जरी तुज व्हावे । द्यूतकर्म मनोभावे । सारीपाट खेळावा ॥ १ ॥ मग कैंचे हरिचे नाम । निजेलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिले ॥ २ ॥ विषयसुखाचा लपट । दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥ ३ ॥