सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 175, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १४७ 'मुक्त कासया म्हणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥' असा एक तुकोबांचा अर्थपूर्ण चरण आह बंधनाची खोटी कल्पना माडली की मुक्तीची कल्पना आपोआपच गळते ना आणि यासाठी थोर मतानी मोक्ष अथवा मुक्ती याची काळजी कधीच केलेली नाही ३०१ माझें म्हणता याला का रे' नाहीं लाज । कन्या पुत्र भाज धन वित्त ॥ १ ॥ कोणी सोडवी ना काळाचे हातौंचे। एकाविणें साचे नारायणा ॥ २ ॥ तुका म्हणे किती सागावे चाडाळा । नेणे जीवकळा' फोप्पा जोतो ॥ ३ ॥ शब्दार्थ व टोपा - भाज-बायका, जीवकळा-जीवनाचे रहस्य अर्थ - हा भला गृहस्थ माझे माझे म्हणत असतो, याला लाज कशी वाटत नाही ? माझी कन्या, माझा पुत्र, माझी बायको, माझे धन, माझी सपत्ती असे हा म्हणतो याला लाज कशी वाटत नाही? १ प्रत्यक्ष यम येऊन दारात उभा राहिला की एका परमेश्वराखेरीज याला त्याच्या हातून कोणीही सोडविणार नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, या चाडाळास सांगावे तरी किती ? जीवनाचे रहस्य हा जाणीतच नाही कसा तरी जगून राहतो एवढेच ३ ३०२ आंधळयासि जन अवघेचि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाही ॥ १ ॥ रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥ २ ॥ तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - विषतुल्य-विषासारख अर्थ - आंधळ्या माणसाास सब जगच बाघळ असे वाटते कारण त्याला स्वत ला डोळे व दृष्टी नाही १ रोगी माणसाला मिष्टान्न वाढले तरी त्याला त्याच्या तोंडात चव नसल्यामुळे ते विषासारखे वाटते २ त्याचप्रमाणे स्वत शुद्ध भावाचा नाही त्याला सर्व त्रिभुवनही खोटे वाटते ३ ३०३ छळो विष्णुदासा कोणी । त्याची अमगळ वाणी ॥ १ ॥ येऊ न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ २ ॥ नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥ ३ ॥ तुका म्हणे याति । भ्रष्ट तयाची ते मति ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - विष्णुदासात- भक्तास, याति-जात, मति-बुद्धी अर्थ - जो परमेश्वराच्या भक्तास छळतो त्याची वाणी अमगल समजावी १ तो अभागी व दुराचारी समजून त्यास समोरसुद्धा येऊ देऊ नये २ ज्याला हरिकथा आवडत नाही त्याची आई व्याभिचारिणी समजावी ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाची जात भ्रष्ट झालेली समजावी, त्याची बुद्धीही खोटीच मानावी ४ ३०४ बोलविती तैसे आणी अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥ १ ॥ मिठाँविण काय करावे मिष्टान्न' । शव जीवेविण शृगारिलें ॥ २ ॥ संपादणीविण विटविले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥ ३ ॥ कन्यापुत्रेंविण मगळदायके । वेचिले हैं फिके द्रव्य तरी ॥ ४ ॥ तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अतरीं प्रेमभाव ॥ ५ ॥ शब्दार्थ व टोपा - शव-प्रेत सपािणी-बतावणीचे आचरण, चांग-चागले, मगळदायक-लग्नसमारभ, वेचिले-खर्च केले, अतरीं-मनात १ नाहीं, २ जीवनकळा, ३ हो का तयाची भक्ती, ४ पक्वान्न