सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 174, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१४६ सार्थ तुकारामगाथा २९८ साधूनी बचनाग खातो तोळा तोळा । आणिकाते डोळा न पाहवे ॥ १ ॥ साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिके कापती देखोनिया ॥ २ ॥ असाध्य ते साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टोपा - साधूनी-साधन करून, बचनाग-भयंकर वीष, भुजंग-विषारी सर्प, सायास-प्रयत्न अर्थ - अभ्यास करून, साधने करून एवढी तयारी होते की दुसऱ्यांना डोळ्यांनी पाहावणार नाही. काही लोक भयानक असे बचनागाचे वीष तोळा तोळा खातात. १ त्याचप्रमाणे दुसऱ्यांना पाहताच थरकाप उडेल असे भयानक विषारी सर्पही हे लोक अंगावर धारण करतील. २ तुकाराम महाराज म्हणतात, प्रयत्न केला की सर्व काही साध्य होते जे असाध्य म्हणजे साधावयास कठिन वाटते ते प्रयत्न किंवा अभ्यास केला की सहज प्राप्त होते ३ २९९ आमचे गोसावी अयाचितवृत्ति । करवी शिष्याहातीं उपदेश ॥ १ ॥ दगडाची नाव आधीच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥ २ ॥ तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनीं । सोंगसंपादणी करितो परी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टोपा - अयाचितवृत्ति-न मागण्याची वृत्ती, परी-प्रकार अर्थ - आमची वृत्ती गोसाव्यासारखी, न मागण्याची आहे कुणी न मागता काही दिले तरच आम्ही ते घेतो, असे शिष्यांकडून सर्वांना सांगून काही गुरू दक्षिणा व भिक्षासामग्री मिळवितात, त्याचा काय उपयोग ? दगड आधीच जड, त्याची नाव दुसऱ्या दगडास कशी तारणार ? २ तुकाराम महाराज म्हणतात, अशा साधुसंतांनी जे अशा सोंगसंपादनीचे प्रकार केले, त्यामुळे त्यांनी साधुत्वाचे वेष विटाळून टाकले त्या पोषाखाचीच त्यांनी विटंबना केली ना ३ ३०० मृगजळा काय करावा उतार । पावावया पार¹ पैल थडी ॥ १ ॥ खापराचे होन खेळती लेकुरे । कोण त्या व्हेव्हारे² लाभ हानि ॥ २ ॥ मंगळदायक करिती कुमारी । काय त्याची खरी सोयरीक ॥ ३ ॥ स्वप्नींचे जे सुखदुःख जाले कांहीं । जागृतीं तो नाही साच भाव ॥ ४ ॥ सारीं जालीं मेली लटिकें वचन । बद्ध मुक्त शीण तुका म्हणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - पार-पलीकडचा काठ, होन-नाणे, मंगळदायक-लग्नाचा सोहळा अर्थ - केवळ मृगजळाचीच नदी आहे, तेथे उतार कसला करावा ? पलीकडच्या तीरावर जाण्याची सोय करण्याची येथे काय जरूरी आहे ? १ लहान मुले खापराच्या तुकड्याची नाणी घेऊन व्यापाराचा खेळ खेळतात त्यांच्या व्यवहारात किंवा व्यापारात नफातोडा कसला असतो ? २ मुली आपापसात बाहुलाबाहुलीचे लग्न लावतात, पण ती त्यांची सोयरीक खरी की काय ? ३ स्वप्नात काही सुखदुःख झाले तरी जागेपणी त्याचा भाव काही खरा नसतो ४ त्याचप्रमाणे या सर्व जगात सारी जन्मास आली, मेली हे वचन खरे नाही आपण बद्ध, आपण मुक्त असे मानणेही व्यर्थ शीण म्हणजे त्रास मात्र आहे ५ विवरण :- या अभंगात एक तात्त्विक विचार तुवांनी मोठ्या कुशलतेने अनेक प्रकारचे दृष्टान्त देऊन मांडला आहे आपण पापी आहोत, आपण बद्ध आहोत, आपण पाशात अडकलेलो आहोत अशी आपली सारखी तक्रार असते व अनंत साधने करून आपणास या बंधनातून मुक्त व्हायचे असते. परंतु एकदा श्रीहरीच्या चरणी मन विसावले की मग हे बंधन सुटते, हा पाश मोकळा होतो, म्हणजे बद्धत्वाची अवस्थाच नाही अशी यथार्थ जाणीव होते मृगजळ जसे खोटे, स्वप्नीची सुखदुःखे जशी खोटी, बाहुलाबाहुलीची लग्ने जशी खोटी, खापराची नाणी जशी खोटी तसाच बद्धमुक्तीचा भाव खोटाच आहे जीव बद्ध व परमेश्वर मुक्त असे नाही एका थोर भूमिकेवर हा भेदच संपतो १ तीर, २ व्यापारे