सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 182, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१५२ | सार्थ तुकारामगाथा एकादशी सोडली त्यामुळे दुर्वास रागावले आपल्या जटेतून त्यांनी एक कृत्या निर्माण करून अबरीषावर सोडली राजा विष्णुभक्त असल्यामुळे सुदर्शनचक्र दुर्वासाच्या पाठीमागे लागले दुर्वास घाबरून अखेर राजाकडे आले एक वर्षाच्या उपवासानंतर त्याने मग दुर्वासासह भोजन करून पारणे फेडले हा अबरीष राजा असा विष्णुभक्त होता हा बार्शी येथील राहणारा असून वारकरी पंथीयांना बार्शीच्या भगवंताचे दर्शन यासाठीच प्रिय आहे ३१३ करविता व्रत अर्ध पुण्य लाभे । मोडविता दोघं नरका जाती ॥ १ ॥ शुद्धबुद्धि होय¹ दोघां एक मान । चोरासये कोण जियें राखे ॥ २ ॥ आपुले देऊनी आपुलाचि घात । न करावा धोत जाणोनिया ॥ ३ ॥ देऊनिया बेच धाडी वाराणसी । नेदावे चोरासि चंद्रबळ ॥ ४ ॥ तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोडू नये ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा. - धोत-व्यर्थ, वेच-खर्च, चंद्रबळ-चंद्राचे बळ, मारग-मार्ग अर्थ - कुणाकडून का होईना पण एखादे व्रत करविले तर त्यात अर्धे पुण्य लाभते त्या व्रताचा भंग केला तर मात्र दोघेही नरकास जातात. १ दोघांचीही बुद्धी शुद्ध असली तरच दोघांची मनेही एकच होतात चोराच्या संगतीत कुणाला स्वतःच्या जिवाचो शाश्वती वाटणार ? २ आपले देऊन आपलाच घात होणार असेल तर तसे व्यर्थ न करणे हेच योग्य नाही का? ३ एखादा काशीयात्रेस जात असेल तर त्याला खर्चासाठी पैसे देऊन पाठवावे पण चोरास मात्र चंद्राचे बळ अनुकूल असल्याचेही सांगू नये ४ तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थव्रत, याग हा भक्तीचा मार्ग आहे, तो सोडू नये कधी ५ ३१४ इनामाची भरली पेठ । याहाती दाट मारग ॥ १ ॥ अवघेची येती याण । अवघं शकुन लाभाचे ॥ २ ॥ अडचणी त्या केल्या दुरी । वेच्या उरी घेण्याच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे जोडी झाली । ते आपुली आपणा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - याण-जितम, उरी-बाकी अर्थ :-या पंढरपुरात भक्तजनांचे घनदाट मार्ग सुरू झाले आहेत ही एक त्याची इनामाची पेठच आहे ! या पेठेत सर्व वस्तू येतात येथे सर्व शकुन लाभदायक होतात २ या ठिकाणी सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात, देण्याघेण्यातील बाकी येथे काही उरत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या पेठेत ज्याने आपला स्वतःचाच लाभ करून घेतला तो धन्य होय ४ ३१५ वेदाचे गह्वर न कळे पाठका । अधिकार लोका नाहीं येरा ॥ १ ॥ विठोबाचे नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ २ ॥ जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥ ३ ॥ तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गह्वर-अंतरंग, मर्म सोपारे-सोपे, एकसरें-एकदम अर्थ - नुसते शब्द पाठ करणाऱ्या शास्त्रीपंडितांना वेदाचा अर्थ समजत नाही व दुसऱ्यांतरे लोकाना त्याचा अधिकार नाही १ एका विठ्ठलाचेच नांव सहज, सुलभ व सोपे आहे ते एकदम संसारसागर तरून नेण्यास समर्थ आहे २ जे केवळ मंत्र, तंत्र शाळवेळ यांनाच जाणतात त्यांना मात्र हे असाध्य आहे, व इतर लोक तर मूर्खच आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, विधिनिषेध संपल्यामुळे या मार्गांचा नाश झाला आहे ४ १ दोघा होय