भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 183, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 183

सार्थ तुकारामगाथा १५३ ३१६ विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥ १ ॥ मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ २ ॥ बहु अतिशय खोटा । तकें होती बहु वाटा ॥ ३ ॥ तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा .- विधीनें-योग्य मार्गानें, आदि-प्रारंभ, अवसान-शेवट अर्थ :-योग्य मार्गानें किंवा शास्त्र सांगेल त्या मार्गानें विषयसेवन केले तर ते विषयत्यागाएवढेच श्रेष्ठ होय. १ या धर्माचे मुख्य रहस्य असे की देह धारण केल्यापासून तो तो नष्ट होईपर्यत देवास मनात वागवाये हे उत्तम. २ कोणत्याही गोष्टीची अतिशय चिकित्सा खोटी आहे; कारण केवळ बुद्धीच्या वाटेने, केवळ तर्काच्या मार्गाने पुष्कळ पर्यायाच्या वाटा निर्माण होऊन कार्यनाश मात्र होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराविषयी एका- चित्ताने भाव ठेवल्यासच त्याची कृपा प्राप्त होते. ४ ३१७ येथींचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥ १ ॥ वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व सांटा ते ठायीं ॥ २ ॥ येथींचिया नाशवंतें । काय रिते चाळवून ॥ ३ ॥ तुका म्हणे वैष्णव जन । माझे गण समुदाय ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -येथींचिया-या जगातील, सांटा-साठा, गण-समुदाय अर्थ - या लोकातील अलंकारानें भूपविणे हे काय खरे पूजन आहे ? हे तर सर्व नाश पावणारे अलंकार होत १ म्हणून वैकुंठाच्या वाटा निर्माण करू. कारण सर्व सुखाचा साठा तिथे आहे. २ या जगातील सर्वच प्रकार नाशवंत आहेत. मग त्याच्या नादाने उगाचच लोकांना कशासाठी फसवू ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवजन किंवा विष्णुभक्त हाच माझा आवडता समुदाय आहे. तोच मला प्रिय आहे. ४ ३१८ उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥ १ ॥ बोलविले बोल बोले । धनीविठ्ठला सन्निध ॥ २ ॥ तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामींच्या ॥ ३ ॥ तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गबाळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-उजळावया-स्वच्छ करण्यासाठी अर्थ - भक्तिमार्गाच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी, त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठीच मी येथे आलो आहे. मला खऱ्याखोट्याचा निवाडा करावयाचा आहे १ ईश्वर, विठ्ठल हा माझा धनी आहे. तो ज्याप्रमाणे बोलवील त्याप्रमाणे मी बोलतो २ त्या माझ्या स्वामीच्या पाठबळामुळे मी बोलत असल्याने मला कसलीच शंका नसते ३ तुकाराम महाराज म्हणतात, आमच्यापुढे गबाळमास्तरांचे काम कधीच चालणार नाही. ४ विवरण- या एका लहानशा अभंगात तुकारामबुवा आपल्या आयुष्याचा हेतू स्पष्टपणे सागत आहेत आपण जे बोलत आहोत तो देवाचाच निरोप आहे अशी भावना त्याची नेहमीच होती भाडार फोडून तो धन्याचा माल आपण भारवाहीप्रमाणे वाहतो अशी त्याची श्रद्धा होती जो कृपावत सखा पाडुरंग तोच बोलविता असून आपली वाणी त्याचीच आहे असे ते वारवार सांगतात ' नव्हती माझे बोल बोले पाडुरग ।' अशी त्याची निष्ठा होती आपण भक्तिमार्गाचा प्रसार करण्यास आलो आहोत, सत्याचा मार्ग स्वच्छ करावयास आलो आहोत, जग गर्व लाडरानात सापडले असून त्याच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी आपण आहोत असेही ते अनेकदा बोलतात तु गाथा २०