भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 188, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 188

१५४ सार्थ तुकारामगाथा ३१९ बोलावे तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥ १ ॥ काशासाठीं खावे शेण । जेंणे जन थुकीं तें ॥ २ ॥ दुजें ऐसे काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥ ३ ॥ तुका म्हणे शूर रणीं । गाढें मनीं चुरचुरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गांढे-भित्रे अर्थ - नीट डोळे उघडे ठेवून जें बोलायचे ते धर्मास अनुकूल असेल ते नेहमी बोलावे १ ज्या बोलण्यावर लोक तिरस्कारानें थुकतील असे बोलून कशाला शेण खाये ? २ सत्य व स्पष्ट बोलणे हे अग्नीप्रमाणे असल्याने या अग्नीस कोण जाळील ? कोण असा शूर आहे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा सत्य व स्पष्ट आणि धर्मानुकूल बोलणाराच रणांगणावरील शूराप्रमाणे असतो भित्रा मनुष्य मात्र मनात उगाच पुटपुटत राहतो ४ ३२० बरा देवा कुणबी केलो । नाहीं तरी दंभेंचि असतो मेलो ॥ १ ॥ भले केले देवराया । नाचे तुका लागे पाया ॥ २ ॥ विद्या असती कांहीं । तरी पडतो अपायीं ॥ ३ ॥ सेवा चुकतो संतांची । नागवण हे फुकाची ॥ ४ ॥ गर्व होता ताठा । जातो यमपंथें वाटा ॥ ५ ॥ तुका म्हणे थोरपणे । नरक होती अभिमानें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - दंभेंचि-अहंकारानेच, अपार्थी-संकटात अर्थ - देवा, मला कुणबी केलेस हे फार चांगले झाले नाही तर ब्राह्मणजन्माच्या अभिमानाखालीच मी गेलो असतो १ देवराया, ही चांगलीच गोष्ट झाली म्हणूनच तुमच्या पायाशी राहून तल्लीनतेने मी नाचू शकतो २ दुसरी काही थोडी बहुत जरी विद्या मजजवळ असती तर मी मोठ्या संकटातच पडलो असतो ३ मग संतांची सेवाही माझ्या हातून झाली नसती विनाकारण माझी फसवणूक मात्र झाली असती ४ मला मग गर्व झाला असता व उगाच मी ताठून गेलो असतो यमाच्या म्हणजे मृत्यूच्याच वाटेने मग मला जावे लागले असते ५ तुकाराम महाराज म्हणतात थोरपणाच्या अभिमानाने नरकवास मात्र मिळतो ६ विवरण — या अभंगात महत्त्वाचे असे दोन विचार आहेत ब्राह्मणकुळात आल्याने नुसता दंभ, अहंकार निर्माण होऊन खरी ज्ञानलालसा वा भक्तिभावना याचा लवलेशही उरत नाही असे दृश्य तुकोबाना त्यांच्या सभोवती स्पष्टपणे दिसत असावे म्हणूनच ते आपण कुणबी झालो हे फार चांगल असे कृतज्ञतेने म्हणत आहेत आपण कुणबी आहोत असे तुकोबानी अनेक ठिकाणी म्हटले आहे 'आळस न करी या लाभाचा । तुका विनवी कुणबियाचा', 'तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना' - इत्यादी ओळींतून आपण कुणबी आहोत असा उल्लेख तुकोबा स्वतःचा करितात तुकोबांचे बंधू कान्होबा यांनीही 'आता निदसुरू नसावे । गाठ पडली कुणब्यासवें' असेच म्हटले आहे तुकोबांची शिष्या बहिणाबाई हिनेही आपल्या गुरूचे वर्णन करताना 'स्वप्नींचा अनुग्रह गृह केला शूद्र । तोही बळी भद्र ज्ञानहीन', असा उल्लेख केला आहे तेव्हा तुकाराम हे जुणदवाणी कुणबीवाणी किंवा मराठावाणी होते कुणबी- वाणी, आडनाव आंबोले, कुळी मोरे' असा उल्लेख तुकोबांच्या वंशातही आहे तुकोबा कुणबी असले तरी त्यांचे घराणे मराठा जातीचे होते त्यांनी स्वतःस शूद्र यातीचे आपण म्हणून उल्लेख केला आहे तुकोबाची शूद्र याती, त्यांचे कुणबीपण, त्यांचा वैश्य व्यवसाय, त्यांचे आंबीले हे आडनाव, मोरे हे कुळ इत्यादींसंबंधीचे सविस्तर विवेचन पुढे 'याती शूद्र वंक्ष केला वेवसाय' या त्यांच्या प्रसिद्ध अशा या ग्रंथातील अभंग क्रमांक १३३३ मध्ये केले आहे ३२१ दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥ १ ॥ आता काय उरलें वाचें । पुढे शब्द बोलावयाचे ॥ २ ॥