भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 189, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 189

सार्थ तुकारामगाथा १५५ देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥ ३ ॥ तुका म्हणे नाद । जाला अवघा गोविंद ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दाता-देणारा, नाद-ध्वनी. अर्थ:- प्राणिमात्रास हवे ते देणारा तो नारायण असून त्या सर्व वस्तूंचा भोग घेणाराही तोच एक आहे १ मग मी भोगले, मी भोगले असे शब्द बोलण्यात तरी अर्थ कसला आहे ? २ जेथे दृष्टी टाकावी तेथे स्वतःचे रूप दिसावे अशी आत्मीयता अंगीं बाणली आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जेवढा म्हणून ध्वनी अथवा नाद आहे तेवढा गोविंदरूपी ईश्वरच सर्वत्र भरून राहिला आहे खास. ४ ३२२ कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥ १ ॥ तुम्हीं दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी यसे¹ ॥ २ ॥ पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । माझा करावा कुडावा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपाः- साच-खरे, कुडावा-कुंपण घालून रक्षण अर्थः- देवा, माझ्यावर कृपा करा व जे खरे असेल तेंच मला दाखवा; तेच माझ्या प्रचीतीस आणून द्या. १ तुम्ही दयावंत कसे आहात यासंबंधीची कीर्ती सर्व जगात पसरून राहिलेली आहे. २ तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी मजकडे पाहात असूनही मला काळ ओढीत आहे हे ठीक नव्हे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही तुमच्या कृपेचे कुंपण घालून माझे रक्षण करावे. ४ ३२३ ठायींची ओळखी । येईल टाकूं टाका सुखीं ॥ १ ॥ तुमचा जाईल ईमान । माझे कपाळीं पतन ॥ २ ॥ ठेविला तो ठेवा । अभिलाषें बुडवावा ॥ ३ ॥ मनीं न विचारा । तुका म्हणे हे दातारा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- ईमान-प्रामाणिकपणा, पतन-नरकात जाणे, अभिलाषें-लोभाने. अर्थ :- देवा, तुमची व आमची मूळची ओळख एका ठिकाणचीच आहे. ती काय तुम्हांला सुखासुखी टाकता येईल ? सहजासहजी टाकता येत असेल तर टाका ना. १ पण यामध्ये मग तुमचाच प्रामाणिकपणा जाईल ना आणि माझ्या नशिबात मात्र कायमचे पतन अथवा नरकवास येईल. २ आणि मग मला असे होईल की तुमच्यावरील विश्वासाचा जो ठेवा मी ठेविला होता, तो लोभाने बुडवावा असे होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, दातारा, असला विचार सुद्धा मनात आणू नका. ४ विवरण :- देवाची आपली ओळख मूळच्या स्थानापासूनच आहे असा एक महत्त्वाचा विचार तुकोबांनी या अभंगात मांडला आहे. सर्व चराचर जगत व्यक्त होण्याआधी एकच तत्त्व स्फुरणरूपात होते.त्या परब्रह्मास अपार प्रेम हेत म्हणून ते अनेकत्वाने साकार झाले 'बीजचि झालें तरु । अथवा भांगाराचे अलंकार' अशा भाषेत संतानी या व्यक्ताचे वर्णन केले आहे. तुकोबांची शिष्या बहिणाबाई हिने तर 'तुम्ही आम्ही एक एकाचि गांविचे । विसरल्ये त्याचें फळ मागें' म्हणून आपली 'ठायींची ओळखी' स्पष्ट केली आहे. दुसऱ्या एका अभंगात 'तुम्ही आम्ही दोघे होतों एके ठावों' अशी जाणीव देऊन तिने म्हटले आहे, 'तुह्मचि हितानें वाढला संसार । आम्ही का रे दूर अंतरलों?' ३२४ तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥ १ ॥ रूप कासवाचे परी । धरुनि राहे न अंतरीं ॥ २ ॥ १ असे