भारतकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा १५५ देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥ ३ ॥ तुका म्हणे नाद । जाला अवघा गोविंद ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दाता-देणारा, नाद-ध्वनी. अर्थ:- प्राणिमात्रास हवे ते देणारा तो नारायण असून त्या सर्व वस्तूंचा भोग घेणाराही तोच एक आहे १ मग मी भोगले, मी भोगले असे शब्द बोलण्यात तरी अर्थ कसला आहे ? २ जेथे दृष्टी टाकावी तेथे स्वतःचे रूप दिसावे अशी आत्मीयता अंगीं बाणली आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जेवढा म्हणून ध्वनी अथवा नाद आहे तेवढा गोविंदरूपी ईश्वरच सर्वत्र भरून राहिला आहे खास. ४ ३२२ कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥ १ ॥ तुम्हीं दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी यसे¹ ॥ २ ॥ पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । माझा करावा कुडावा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपाः- साच-खरे, कुडावा-कुंपण घालून रक्षण अर्थः- देवा, माझ्यावर कृपा करा व जे खरे असेल तेंच मला दाखवा; तेच माझ्या प्रचीतीस आणून द्या. १ तुम्ही दयावंत कसे आहात यासंबंधीची कीर्ती सर्व जगात पसरून राहिलेली आहे. २ तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी मजकडे पाहात असूनही मला काळ ओढीत आहे हे ठीक नव्हे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही तुमच्या कृपेचे कुंपण घालून माझे रक्षण करावे. ४ ३२३ ठायींची ओळखी । येईल टाकूं टाका सुखीं ॥ १ ॥ तुमचा जाईल ईमान । माझे कपाळीं पतन ॥ २ ॥ ठेविला तो ठेवा । अभिलाषें बुडवावा ॥ ३ ॥ मनीं न विचारा । तुका म्हणे हे दातारा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- ईमान-प्रामाणिकपणा, पतन-नरकात जाणे, अभिलाषें-लोभाने. अर्थ :- देवा, तुमची व आमची मूळची ओळख एका ठिकाणचीच आहे. ती काय तुम्हांला सुखासुखी टाकता येईल ? सहजासहजी टाकता येत असेल तर टाका ना. १ पण यामध्ये मग तुमचाच प्रामाणिकपणा जाईल ना आणि माझ्या नशिबात मात्र कायमचे पतन अथवा नरकवास येईल. २ आणि मग मला असे होईल की तुमच्यावरील विश्वासाचा जो ठेवा मी ठेविला होता, तो लोभाने बुडवावा असे होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, दातारा, असला विचार सुद्धा मनात आणू नका. ४ विवरण :- देवाची आपली ओळख मूळच्या स्थानापासूनच आहे असा एक महत्त्वाचा विचार तुकोबांनी या अभंगात मांडला आहे. सर्व चराचर जगत व्यक्त होण्याआधी एकच तत्त्व स्फुरणरूपात होते.त्या परब्रह्मास अपार प्रेम हेत म्हणून ते अनेकत्वाने साकार झाले 'बीजचि झालें तरु । अथवा भांगाराचे अलंकार' अशा भाषेत संतानी या व्यक्ताचे वर्णन केले आहे. तुकोबांची शिष्या बहिणाबाई हिने तर 'तुम्ही आम्ही एक एकाचि गांविचे । विसरल्ये त्याचें फळ मागें' म्हणून आपली 'ठायींची ओळखी' स्पष्ट केली आहे. दुसऱ्या एका अभंगात 'तुम्ही आम्ही दोघे होतों एके ठावों' अशी जाणीव देऊन तिने म्हटले आहे, 'तुह्मचि हितानें वाढला संसार । आम्ही का रे दूर अंतरलों?' ३२४ तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥ १ ॥ रूप कासवाचे परी । धरुनि राहे न अंतरीं ॥ २ ॥ १ असे

१५६ सार्थ तुकारामगाथा नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वर्म-रहस्य, भावें-तुजविषयीच्या भक्तिभावामुळे, कासवाचे परी-आपले सर्व अवयव पोटाशी धरून कासव ज्याप्रमाणे असते तसे. अर्थ :- देवा, तुझे रहस्य मला माझा जो तुजविषयी भक्तिभाव आहे त्यामुळे सापडले आहे. १ कासवाप्रमाणे मी सर्व अवयव आत धरून तुझे रूप मनात साठवून ठेवीन. २ तुझ्या रूपाची व माझी तुटातूट होऊ देणार नाही. अगदी दृष्टीस दृष्टी मिळवून राहीन. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमचे चिंतन हीच खरी तुमची सेवा आहे. ४ ३२५ गहूं एक जाती । परी ह्या पाधाणी नासिती ॥ १ ॥ वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ २ ॥ कमाईच्या सारें । जाति दाविती प्रकार ॥ ३ ॥ तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-पाधाणी-आडाणी बायका, कमाई-मेहनत अर्थ :-एकाच गव्हाचे पुष्कळ प्रकार होऊ शकतात; पण अडाणी बायकांना त्याचे मर्म न समजल्यामुळे त्या त्यांचा नाश करतात. १ यासाठी जे काही थोडेफार वर्म असेल ते जाणून घेणे हेच मुख्य आहे. २ जितकी मेहनत चांगली होईल तितके ते प्रकार चांगले होतील हे खरेच आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, खरे मोल गुणाचे आहे, इतर सर्व बोल व्यर्थ होत. ४ ३२६ पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांचीं नावें ॥ १ ॥ नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठीं । २ ॥ विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥ ३ ॥ तुका म्हणे पापें । जाती संतांचिया जपें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- ठाव-ठिकाण अर्थ :-संतसज्जनाची नावे घेऊन आपण पुण्यवंत व्हावे. १ यासाठीच माझी वाणी त्याची नावे घेण्यास टाळाटाळ करीत नाही. फुकट असा हा महालाभ होतो. २ या साधुसंतांच्या पायांवरील भक्तिभाव हेच एक विश्रांतीचे ठिकाण मला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या संतांच्या दर्शनाने सर्व पापे नाहीशी होतात. ४ ३२७ देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया १ ॥ १ ॥ दोहींकडे दोन्ही घाहातील वाटा । करितील सांटा आपुलाला ॥ २ ॥ दाखविले परी नाहीं वर्जिजेतां । आला तो तो चित्ता भाग भरा ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळबीजमात्र ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-सांटा-संग्रह. अर्थ :- देवाची संगत असेल तर आपणास देव होता येईल. आणि जगांतील सामान्य लोकांच्या सहवासाने आपले पतन होईल. १ या दोन वाटा दोन निरनिराळ्या दिशांनी जाणाऱ्या आहेत; व त्या आपापल्या कर्माचा संग्रह करणाऱ्या आहेत. २ वरील दोन वाटा मी दाखविल्या, पण आता जो भाग टाळता न येण्यासारखा आहे तो भाग चित्तात धरून आपले हित साधा. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गाची प्रीती मूळची अंगातच हवी; उपदेशाचे निमित्त केवळ मूळ बीजाप्रमाणे समजावे. ४ १ देवांचिया.

सार्थ तुकारामगाथा १५७ ३२८ शोधिसील मूळें । त्याचें करोसी वाटोळें ॥ १ ॥ ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु जाले तट ॥ २ ॥ लौकिका बाहेरी । घाली रोंखीं जया घरीं१ ॥ ३ ॥ तुका म्हणें गुण । तुझा लागलिया शून्य ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- बोभाट-गवगवा, तट-तन्हा, शून्य-मुक्तता. अर्थ :- देवा, ज्यांची मुळे तुम्ही शोधता त्याचे वाटोळे करता. १ असा तुमच्या विषयीचा गवगवा सर्व साधुसंतांनी केलेला आहे. तुमच्या अशा तऱ्हा किती सांगाव्यात ? २ तुम्ही ज्याच्यावर रोखून धरता त्यास तुम्ही सर्व लौकिकाच्या बाहेर घालून देता. ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुझा एकदा गुण लागला की त्या माणसांस लौकिकापासून मुक्तता मिळते. त्याचे लौकिक जीवन शून्य होते. ४ ३२९ वैद्य वाचविती जीवा । तरी कोण ध्यांतें देवा ॥ १ ॥ काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ २ ॥ अंगीं दैवत संचरे । मग तेथें काय उरे ॥ ३ ॥ नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ॥ ४ ॥ जाणे हा विचार । स्वामी तुक्याचा दातार ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- परी-प्रकार, उरी-शिल्लक. अर्थ :- वैद्याच्या औषधाने जर माणसाचे रोग नष्ट होत असतील तर मग देवाच्या ध्यानाची गरज काय ? १ प्रारब्धाने जे शिल्लक ठेविले असेल तसे होईल असे असले, तरी खरोखर काय घडेल ते समजत नाही २ एकदा अंगात दैवत संचारले म्हणजे काही तेथे उरत नाही ३ जर नवसासायासाने मुलगे-मुलगी होणार असतील तर मग नवरा करण्याची गरजच काय आहे ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व बाबींचा विचार तुक्याचा स्वामी जाणतो; तुकोबाच्या काही नीट ध्यानात येत नाही ५ ३३० मार्गीं बहुत । याचि गेले साधुसंत ॥ १ ॥ नका जाऊं आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ २ ॥ चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥ ३ ॥ झळकती पताका । गरुड टके म्हणे तुका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- धोपटा-सरळ, टके-टोंकास अर्थ :- ईश्वराचे भजनपूजन, नामस्मरण याच मार्गाने पुष्कळ साधुसंत गेले आहेत आजपर्यंत. १ उगाच भलत्यासलत्या आडमार्गाने जाऊ नका अशी गर्जना सर्व पुराणे करीत आहेत. २ हा भक्तिमार्ग अनेकांनी चोखाळून स्वच्छ केलेला असल्याने याच्या वाटा कुणास विचाराव्या लागत नाहीत. धोपट मार्गाने जाता येते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्याच्या पताका झळकत असून त्यांच्या अग्रभागावर गरुडाचें वास्तव्य आहे. ४ ३३१ पातिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ जवळां । सन्निध२ पंढरीये ॥ १ ॥ पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ २ ॥ १ घरीं. २ पंढरीये सन्निध.

१५८ सार्थ तुकारामगाथा चालती स्थिर स्थिर । गरुड टक्याचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥ ३ ॥ मिळालिया भद्रजाती । कैसा आनंदें डुलती । शूर उठावती । एका एक आगळे ॥ ४ ॥ नामामृत कल्लोळ । वृंदें फोडली सकळ । आले वैष्णवदळ । कलिकाल कांपती ॥ ५ ॥ आस करिती ब्रह्मादिक । देखुनि वाळवंटींचे सुख । धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचे फँसे ॥ ६ ॥ मरण मुक्ति वाराणसी । पितृऋण गया नासी । उधार नाहीं पंढरीसि । पायापाशीं विठोवाच्या ॥ ७ ॥ तुका म्हणे आतां । काय करणे आम्हा चिंता । सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा :- घुमरी-विपुल, पुष्कळ, गरुड टक्याचे-गरुड अग्रभागी असणाऱ्या निशाणाचे, श्रुति-वीणा, भद्रजाती-सुलक्षणी हत्ती, वृंदें-समुदाय, नासी-नाश करते, नुपेक्षी-उपेक्षा करीत नाही अर्थ. - चला, कार्तिकी एकादशीचा सोहळा पंढरपुरात जाऊन दोन्ही डोळ्यांनी पाहू या पंढरीचे वैकुंठ अगदी जवळच आले आहे १ येथे हरिनामाचे पीक विपुल प्रमाणात आले असून प्रभुप्रेम आकाशात मावेनासे झाले आहे प्रभुप्रेमाने सर्व पंढरी सामावून गेली आहे घरोघरी प्रेमाचा सुकाळच झाला आहे २ वैष्णवाचे गट जागजागी स्थिर होऊन चालत आहेत. त्यांच्या निशाणावर गरुडाची खूण आहे नामघोषाचा गजर त्यानी चालविला आहे टाळ, वीणा, मृदंग यांची साथ त्याला मिळत आहे ३ सुलक्षणी हत्ती जसे डुलत डुलत चालतात तसे हे वैष्णववीर आनंदाने डुलत डुलत नामघोषाच्या नादात चालले आहेत एकापेक्षा एक शूर असे हे वैष्णववीर भगवद्भक्तीचा उठाव करीत आहेत ४ हरीच्या नामामृताचा कल्लोळ चालला असून सर्वत्र वैष्णवांचे समुदाय वाटून आले आहेत या वैष्णववीरांच्या समुदायापुढे प्रत्यक्ष यमही थरथर कापत उभा राहतो. ५ पंढरपूरच्या या वाळवंटाचे सुख पाहून त्याची इच्छा प्रत्यक्ष ब्रह्मदेवही करीत आहेत या मृत्युलोकाचे भाग्य केवढे थोर ! धन्य धन्य या मृत्युलोकाची ! असे उद्गारही ते काढतात ६ काशीला मुक्ती मिळते पण तेथे मरण यावे लागते गयेस गेल्यानंतर पितृऋणातून मुक्त होता येते पंढरपुरात मात्र या गोष्टी उधारीवर नसतात विठ्ठलाच्या पायाशी याचा लाभ त्वरित होत असतो ७ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता चिंता कशासाठी करावी ? सर्व सिद्धीस देणारा तो दाता पांडुरंग समर्थ असा असून तो आपल्या भक्तांची उपेक्षा कधीही करीत नाही ८ विवरण - भागवत संप्रदायात आषाढी व कार्तिकी एकादशीचे माहात्म्य फार सांगितले गेले आहे या दोन्ही प्रसंगी पंढरपूर येथे यात्रा भरत असून विठ्ठलाच्या गजराने अवघे वाळवंट दुमदुमून जाते उभ्या महाराष्ट्रा- तील भक्तगण खांद्यावर गरुडपताका घेऊन यात्रेस येत असतात निरनिराळ्या ठिकाणाहून संतांच्या पालख्याही येतात टाळ, मृदुंग, वीणा, हरिभजन यांनी सारे वातावरण पवित्र होऊन जाते या एका अभंगात तुकारामबुवा मुख्यत कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याचे वर्णन करीत आहेत आषाढी एकादशीएवढेच कार्तिकी एकादशीचेही महत्व वार- करी संप्रदायात असते ही एकादशी प्रबोधिनी एकादशी म्हणून प्रसिद्ध असून चातुर्मासात भगवान शेषशय्येवर शयन करीत असतात पण या एकादशीस त्यांना जागे करण्यासाठी स्तोत्रपाठ, भजन, पूजन, काकडआरती, गायन, वादन इत्यादींच्या साहाय्याने स्तवन केले जाते ‘उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद त्यज निद्रा जगत्पते। त्वयि सुप्ते जगन्नाथ जगत् सुप्तं भवेदिदम्’ यासारख्या मंत्राने परमेश्वराची प्रार्थनाही केली जाते पंढरपूर येथील सोहळा याही एकादशीला अवर्णनीय असतो

सार्थ तुकारामगाथा १५९ ३३२ जया दोषां परीहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । ते हरती अपार । पंढरपूर देखिलिया ॥ १ ॥ धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मातीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं ॥ २ ॥ सकळतीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निर्विकार । होतो नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥ ३ ॥ नाहीं उपमा द्यावया । सम तुल्य आणिका ठाया । धन्य भाग्य जया । जे पंढरपूर देखती ॥ ४ ॥ उपजोनि संसारों । एक वेळ पाहें पा पंढरी । महा दोषां कैंची उरी । देवभक्त देखिलिया ॥ ५ ॥ ऐसी विष्णूची नगरी । चतुर्भुज नर नारी । सुदर्शन घरटी करी । रीग न पुरे कळिकाळा ॥ ६ ॥ तें सुख वर्णावया गति । एवढी कैंची मज मति । जे पंढरपुरा जाती । ते पावती वैकुंठ ॥ ७ ॥ तुका म्हणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा । अधम जन्मांतरिचा । तया पंढरी नावडे ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा :-परीहार-निरसन, आणिका-दुसऱ्या, उपजोनि-जन्मास येऊन. अर्थ :-हातून इतके दोष घडले आहेत कीं त्यांचे निरसन व्हावे म्हणून, ते दूर व्हावेत म्हणून सर्व शास्त्रे तपासून पाहिली; तरी उपाय सापडत नाही पण हे पंढरपूर क्षेत्र पाहिल्यानंतर मात्र सारे दोष निघून जातात. १ हे भीमातीर धन्य होय. चंद्रभागा सरोवरही धन्य होय. या ठिकाणी पद्मतीर्थावर हे विठ्ठलवीर म्हणजे विष्णुभक्त जमलेले आहेत. त्याचे क्रीडेचे स्थान वेणुनाद हेच आहे. २ सर्व तीर्थस्थानांचे माहेर म्हणजे हे पंढरपूर असून या भूमीवरचे निर्विकार असे हे प्रत्यक्ष वैकुंठच आहे. येथे विठ्ठलनामाचा गजर सतत होत असून त्यामुळे प्रत्यक्ष यमाचाही थरकाप उडालेला आहे. ३ या पंढरपूर क्षेत्राचा महिमा वर्णन करण्यास दुसरी साजेेल अशी उपमा द्यावयास वस्तूच नाही. जे लोक हे पंढरपूर पाहतात त्यांचे भाग्य केवढे थोर मानावयास हवे ४ या जगात जन्मास येऊन एक वेळ तरी पंढरपूरचे दर्शन घ्यावे तेथील दैवत श्रीविठ्ठल व त्याचा महाभक्त पुंडलीक याचे दर्शन घेतल्यावर महापापांचाही दोष उरणार नाही. ५ अशी ही श्रीविष्णूची नगरी आहे. येथील स्त्री-पुरुष चतुर्भुज असून त्यांच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र एकसारख्या फेऱ्या घालीत असते. यमाच्या शिरकावाला थोडीही संधि मिळत नाही. ६ पंढरपूरचे हे सौख्य वर्णन करण्याएवढी बुद्धी मला कुठे आहे ? जे स्वतःच पंढरपूरला जातात त्यांनाच या वैकुंठाची प्राप्ती होते. ७ तुकाराम महाराज म्हणतात, या शब्दाचा ज्यांना विश्वास वाटत नाही व ज्यांना पंढरपूर आवडत नाही तो जन्मोजन्मींचा अधमच म्हणावयास हवा. ८ ३३३ एक नेणतां नाडलीं । एकां जाणिवेची भुली ॥ १ ॥ बोलो नेणें मुकें । येहें वाचाल काय निकें ॥ २ ॥ दोहीं सवा नाड । विहीर एकीकडे आड ॥ ३ ॥ तुका म्हणे कर्म । तुझें कळों नेदी धर्म ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-नाडलीं-फसली. भुली-भूल, निकें-चांगले, सवा-दाटून.

अर्थ :- कित्येक लोकांना काही कळतच नाही म्हणून ते फसतात; तर दुसऱ्या कित्येकांना आपणांस फार कळते या ज्ञानाच्या अहंकाराने ते पछाडलेले असते भूल पडलेली असते १ मुक्याला बोलता येत नाही म्हणून त्याचा उपयोग होत नाही, ज्याला बोलता येते तो तर वाचाळ- होतो, तेही काही चांगले नव्हे २ दोन्ही बाजूनी अड चणच असते एकाकडे आड व दुसरीकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झालेली असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आमचे कर्मच आम्हांस तुझे रहस्य समज देत नाही असे दिसते ४

३३४ म्हणवितो दास । मज' एवढीं च आस ॥ १ ॥ परी तें अगीं नाहीं वर्म । करीं आपुला तूं धर्म ॥ २ ॥ बडबडितो तोंडें । रितें भावेंविण धेंडें ॥ ३ ॥ तुका म्हणे खरा । दावू जाणतो पसारा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टोपा - आस-इच्छा, धेंडे-अर्धवट मनुष्य अर्थ - देवा, मी तुमचा दास आहे असे मी सारखे म्हणत असतो, आणि मलासुद्धा ही एवढी एकच आशा आहे १ पण देवा, दास्य भक्तीचे जे मर्म आहे ते मला माहीत आहे असे नाही तरी तू तुला तुझ्या धर्मा- प्रमाणे जे पतितपावनाचे कार्य करायला हवेस ते मात्र कर २ मी आपल्या तोंडाने नुसतीच बडबड करीत असतो, पण हे माझे बोलणे अर्धवट माणसाच्या प्रमाणे भावाशिवाय रिकामेच असते ३ तुकाराम महाराज म्हणतात खरंघर साधुत्वाचा पसारा मात्र मी चांगलाच दाखवू शकतो ४

३३५ पूजा समाधाने । अतिशय वाढें' सोंग ॥ १ ॥ हे तो जाणा तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥ २ ॥ पाहिजे ते केले । सहज प्रसंगीं घडले ॥ ३ ॥ तुका म्हणे माथा । पायीं ठेवीं तुम्हा संता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अतिशय-हव्यास, नीत-नीती अर्थ - मनाचे समाधान हीच खरी परमेश्वराची पूजा होय, किंवा समाधानाने परमेश्वराची पूजा करावी उगाच बाह्य फापटपसाऱ्याची हौस मात्र नसावी त्यामुळे त्रास मात्र वाढतो १ सत लोकांहो, हे तुम्ही जाणताच अशी ही सांगली नीती मी तुम्हास सांगितली आहे २ जे सहजासहजी घडण्यासारखे आहे ते तुम्ही केले पाहिजे ३ तुकाराम महाराज म्हणतात तुम्हां संतांच्या पायावर मी माझा माथा ठेविला आहे ४

३३६ स्वप्नींचिया गोष्टी । मज धरिले होतें वेठी । जालियां सेवटीं । जाले लटिकें सकळ ॥ १ ॥ वाया भाकिली करुणा । मूळ पावावया सिणा । राव रंक राणा । कैंचे स्थानावरि आहे ॥ २ ॥ सोसिले ते अंगे । खरे होते नव्हता जागें । अनुभव ही सांगें । दुखें डोळे उघडीले ॥ ३ ॥ तुका म्हणे संतीं । सावचित केले अतो । नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वेठी-बळजबरीने कामास लावण सिणा-त्रास, राव-श्रीमंत रंक-दरिद्री, सावचित- सावधान चित्त टाळी बसणे-तोंड बंद होणे १ एवढीच मज आस २ वाट

सार्थ तुकारामगाथा १६१ अर्थ - एखाद्या स्वप्नामधील गोष्टींप्रमाणे या कामक्रोधांनी मला वेडीस धरले होते, जन्ममृत्यूने मला बळजबरीने कामास जुंपले होते १ मग या आपत्तींतून सुटावे म्हणून स्वप्नात मी व्यर्थच ईश्वराची प्रार्थना केली पण त्यापासून मला त्रासच झाला जागे होऊन पाहतो ते स्वप्नातील श्रीमंत, राजा, दरिद्री, भिकारी हे काही त्याच्या स्थानावर नव्हते २ जोपर्यंत मी आत्मबोधाने जागाच झालो नव्हतो तेव्हा स्वप्नातील तो त्रास मी स्वतः भरपूर सोसला आता जागृत असताना तोच अनुभव हे सांगत आहे या युक्ताने मात्र माझे डोळे पुरते उघडले. मी सावध झालो ३ तुकाराम महाराज म्हणतात, या साधुसंतानींच मला या स्वप्नातील दुःखातून सावध केले नाही तर पहिल्याने या हरिनामाविषयी माझे तोंड बद्ध होते. ४ ३३७ आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठुर अतिवादी ॥ १ ॥ याति कुळ येथे असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ २ ॥ काळकुट पितळ सोने शुद्ध रंग । अंगाचेच अंग साक्षी देतें ॥ ३ ॥ तुका म्हणे बरी जातीसवे भेटी । नवनीत पोटीं सांटविले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मानसीं-मनात, अतिवादी-वृथा वाद करणारा अर्थ - काही लोकांचा स्वभावच आसुरी असून अंतःकरण निर्दय असते अशी माणसे मनाची निष्ठुर असून वृथा वाद करणारी असतात १ अशा वेळी अमुक एक चांगल्या कुळातील, अमुक वाईट कुळातील असा विचारच अयोग्य असतो अंगच्या गुणाचे महत्त्व या ठिकाणी प्रमुख असते २ पितळ व सोने दोन्ही पिवळचा रंगाची असली तरी पितळ कालांतराने काळेकुट्ट पडते व सोने आपल्या शुद्ध व तेजस्वी रंगाने नेहमी चमकून राहते. दोघांची अंगेच त्याच्या गुणावगुणांची साक्ष देतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या जातीच्या माणसाची मला भेट व्हावी. मी त्याचा सहवास नवनीताप्रमाणे पोटात साठवीन किंवा प्रभुप्रतीचे नवनीत ज्याने आपल्या पोटी साठविले आहे अशा चांगल्या जातीच्या माणसाशी माझी भेट व्हावी ४ विवरण - या अभंगातील 'याति कुळ येथे असे अप्रमाण । गुणाचे कारण असे अंगीं' हा विचार भागवत- धर्मीय परंपरेस शोभून दिसणारा असाच आहे बगच्या गुणावरून पारख व्हावी. वरवरच्या जन्मजात जातीवरून होऊ नये आणि भक्तीच्या क्षेत्रात तर ह् जातीभेदाचे थड असू नये असा एक आग्रहाचा विचार सर्व संतानी सांगितलेला आहे एकदा ईश्वराकडे मोहरा वळला म्हणजे हा अमुक एक जातीचा अशी स्थिती उरतच नाही तुकारामबुवांनीच एका ठिकाणी म्हटले आहे, 'भावता भेदाची जाव उठाउठी । तुका म्हणे भेटीं गोंविदाचे' जे ईश्वराचे भक्त झाले, ज्यांना सो ध्यास लागला त्याच्या बाबतीत यातिकुळाचा विचार हा बरोबर नसतो 'याति- कूळ माझें गेलें हारपोनि' असे स्वतः ज्ञानेश्वरांनीही म्हटले आहे तुकारामबोवांनी तर स्पष्टच निर्वाळा दिला आहे की, 'जिहीं म्हणविले हरीचे भक्ति । जातीचे ते होत कोणी तरी ॥ जातीकुळ नाहीं तयासी प्रमाण । अनन्या अनन्य तुका म्हणे' एकदा परमेश्वरास शरण गेल्यावर मग वर्ण व जाती हा भेद उरत नाही हे ज्ञानदेवांनीही नवव्या अध्यायात ज्ञानेश्वरीत स्पष्ट मेल्याचे आपण पाहिलेच आहे तुकारामबुवानी त्यानेच मत पुढे आणखी स्पष्ट केले आहे 'वर्णा- भिमान विसरलीं याती । एकमेकां लोटांगणीं जाती रे' हरिभक्ताची एवढा पदवी मिळाली की मग हरिभक्त हीच एक जात इतरांच्याही दृष्टीस ठरने चोखोबांची जात मग कुणामच दिसली नाही या यातिहीन भक्ताची महती गाताना जनाबाईने म्हटले आहे 'चोखामेळा अनामिक । भक्तराज तोचि एक ॥ परब्रह्म त्याचे घरीं । न सांगतां काम करी ॥' एकनाथांनीही 'चोखियाची भक्ती कैसी । प्रेमें आवड देवासी ॥' म्हणून चोखोबाचा गौरव केला आहे कारण या अभंगात सांगितल्याप्रमाणे गुणांचे कारणच माणसाची पारख करीत असते ३३८ बाळपणीं हरि । खेळे मयुरेमाझारी । पायीं घागरिया सरी । कडदोरा पाकी । तु गाथा २१

१६२ सार्थ तुकारामगाथा मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवलें आजि ॥ १ ॥ बाळ चांगलें वो । बाळ चांगलें वो । म्हणतां चांगलें । वेळ लागे तया बोलें । जीवापरीत.तें वाल्हें । मज आवडतें ॥ २ ॥ मिळोनियां याति । येती नारी कुमारी बहुती । नाहीं आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं । विसरल्या घरें । तान्हीं पाठीं लेकुरें । धाक सांडोनियां पेरें । तान भूक नाहीं ॥ ३ ॥ एकी असतील घरीं । चित्त तयापासीं परी । वेगों करोनि वोसरी । तेथें जाऊं पाहे । लाज सांडियेली बोज । नाहीं फजितीचें काज । सुख सांडोनियां सेज । तेथें धाव घाली ॥ ४ ॥ वेधियेल्‍या बाळा । नर नारी या सकळा । बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या । कुमार कुमारी । नाभाव हा शरीरीं । दृष्टी न फिरे माघारी । तया देखतां हे ॥ ५ ॥ वैरभाव नाहीं । आप पर कोर्णी कांहीं । शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं । तुका म्हणे सुखी । केलीं आपणांसारिखीं । स्वामी माझा कवतुकें । बाळवेषें खेळे ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा :-मधुरेनघारी-मथुरेमध्ये, कडदोरा-करदोता, वोडवले-प्राप्त झाले, वाल्हे-प्रिय, वोसरी-कमी करून, योज-चिंता, काळजी.

अर्थ :-हा श्रीकृष्ण लहानपणी मथुरेमध्ये खेळत होता. या बालकृष्णाच्या पायांत घागऱ्या व गळ्यात सरी, कमरेस करदोता व दंडांत वाक्या असे अनेक दागिने शोभून दिसतात. या शोभिवंत मुलाचे मुख पाहताच आईचा आनंद तिच्या मनात मावत नाही. माझे भाग्य व पूर्वसंचित चांगले असल्यामुळे मी हे सुख प्राप्त करून धन्य होत आहे असे ती म्हणाली. १ हे माझे मूल फार चांगले आहे हो. इतके चांगले की ते चांगले म्हणण्यासही वेळ पुरत नाही हे बाळ मला माझ्या जिवापेक्षाही आवडते. २ या माझ्या लाडक्या मुलास पाहण्यासाठी गावातील सर्व जातींच्या बायका व मुली पुष्कळ येतात. त्यांना देहभावाचीही स्मृती नसते. श्रीकृष्णाच्या प्रेमापुढे त्या आपली घरे व तान्ही मुले यांनाही विसरल्या. त्यांना घरांतील वडील माणसांचा धाकच उरला नाही. त्यांची तहानभूकही हरपून गेली. ३ काही गोपी आपापल्या घरी असल्या तरी त्यांचे चित्त मात्र या बालकृष्णाकडेच असते. त्याला पाहण्यासाठी घरची कामे लगबगीने करून त्या त्याच्याकडे जाण्याची इच्छा करतात. त्यांना आता लौकिक जीवनाची लाज नाही की शरीराचीहि चिंता उरलेली दिसत नाही. घरची सुखशय्या सोडून त्या श्रीकृष्णास पाहण्यासाठी धावतात. ४ या माझ्या बाळास पाहण्यासाठी गोकुळातील सर्व स्त्री-पुरुष नादावलेले आहेत. त्या सर्व स्त्रिया याच मुलास खेळवू लागल्या. आपण कुमार की कुमारी हा भावही त्यांच्या मनांत उरला नाही. या श्रीकृष्णास पाहताच त्यांची दृष्टी

सार्थ तुकारामगाथा १६३ कधीच मागे फिरत नाही. ५ याच्याकडे लक्ष येताच त्यांच्यांतील गैरभाव व आपपर विचार संपला त्यांना कसलाही शोक, मोह किंवा दुःखभाव उरलेला नाही तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीकृष्णाने त्या सर्वांना आपल्यासारखेच शेवटी सुखी केले. याप्रमाणे हा माझा स्वामी श्रीकृष्ण सर्वांशी मोठ्या कौतुकाने खेळत असतो. ६ ३३९ अशोकाच्या वनीं सीता शोक करी । कांहो अंतरले रघुनाथ दुरी । येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कां हो मज आणिले अवघड लंकापुरी ॥ १ ॥ सांगा वो त्रीजटे सखिये ऐसी मात । देईल कां नेदी भेटी रघुनाथ । मन उताविळ जाला दुरी पंथ । राहों न सके प्राण माझा कुडी आंत ॥ २ ॥ काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें । तीर्थ व्रत होते कवणाचें भंगीलेँ । गाईवत्सा पत्नीपुरुषा बिघडिलें । न कळे वो संचित चरण अंतरले ॥ ३ ॥ नाडियेलें आशा मृगकांतिसोनें । धाडिलें रघुनाथा पाठिलागे तेणे । उलंधिली आज्ञा माय काय मी जाणें । देखुनी सूनाट घेऊनि आलें सुनें ॥ ४ ॥ नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामें रघुनाथाच्या माये । उपटी पक्षिया एक देउनि पाये । उदकवेढ्यामध्यें तेथें चाले काये ॥ ५ ॥ जनकाची नंदिनी दुःखें ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तेंशा परी ॥ संबोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । घेइल तुक्यास्वामी राम लंकापुरी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- गुंफेमाजी-झोपडीत, कुडी-शरीर, त्रिजटा-सीतेच्या रक्षणासाठी रावणाने ठेवलेल्या राक्षसींपैकी एक, नाडियले-फसविले, माय-माया, सुनाट-रिकाने, सुनें-कुत्रे, लाग-उपाय, पक्षिया-जटायूस, नंदिनी- मुलगी, स्थिर-शांत

१६४ सार्थ तुकारामगाथा झाला ? ३ त्या सुवर्णमृगाच्या तेजाच्या आशेनेच मला फसविले त्याच आशेत गुंतून मी रघुनाथास त्याच्यामागे धाडले आणि लक्ष्मण भावजींची मी आज्ञा मोडली व रेषेबाहेर आले मी त्या राक्षसाची माया कशी ओळखणार ? झोपडी रिकामी पाहून त्या रावणरूपी कुत्र्याने मला येथे बळजबरीने आणले की ग ४ आता या संकटातून सुटण्यासाठी त्या रघुनाथाच्या नामाशिवाय दुसरा काही मार्ग अथवा उपाय दिसत नाही. त्या दुष्ट रावणाने त्या जटायू पक्ष्याच्या अंगावर पाय देऊन त्याचे पक्ष उपटले व त्यास मारले सभोवती पाण्याने वेढलेल्या स्थितीत त्या बिचाऱ्याचे काहीच चालले नाही' ५ अशा प्रकारे ती जनकराजाची मुलगी दुःखाने व्याकुळ झाली आपल्या मेळाव्यातून एकटारो हरिणी चुकावी तशी तिची अवस्था झाली समोरची त्रिजटा तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली, व तुकाराम महाराज म्हणतात, की राम लौकरच लंकेस येऊन तिची सुटका करील असे तिने सांगितले ६ ३४० वीट नेघे ऐसे रांधा । जेणे बाधा उपजे ना ॥ १ ॥ तरीच ते गोड राहे । निरे पाहे स्वयंभ ॥ २ ॥ आणिका गुणा पोटीं ठाव । दासी भाव आपुला ॥ ३ ॥ तुका म्हणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नेघे-येणार नाही, निरे-शुद्ध अर्थ :- ज्याचे भरपूर सेवन केले तरी जे बाधणार नाही असे अन्न शिजवून तयार करा याच्या सेवनाने कसलीच बाधा येणार नाही १ तरच ते गोड राहील नाही तरी ते मुळातच शुद्ध आहे रांधवून बिघडवू नका २ जे शुद्ध मुळातच आहे त्यात इतर गुणाचा शिरकाव होत असताना आपला अवगुण मात्र दिसू नये ३ तुकाराम महाराज म्हणतात, जे जातीने खरे शुद्ध असतात ते कधी मागे परत फिरत नाहींत ४ ३४१ नव्हतो सावचित । तेणे अंतरले हित ॥ १ ॥ पडिला नामाचा विसर । वाढविला सवंसार ॥ २ ॥ लटिक्याचे पुरीं । बाहोनिया गेलो दुरी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाव । आम्हा सापडला भाव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सावचित-सावध, लटके-खोटे अर्थ - प्रभुनामाविषयी मी या संसारात सावध चित्ताने राहिलो नाही म्हणून माझ्या खऱ्या हितास मी अंतरलो १ त्याच्या नावाचा विसर पडून हा माझा संसार मी वाढविला २ खरवर दिसणाऱ्या पण खोट्या अस णाऱ्या या मायिक पसाऱ्याच्या पुरात मी वाहून गेलो ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण आता ही हरिभक्तीची नाव मला तरून जाण्यास सापडली आहे ४ ३४२ अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि का हे पाक घरोघरीं ॥ १ ॥ आपुलाले तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ २ ॥ देखोनि जीवन जरि जाय तान । तरि का साठवण घरोघरीं ॥ ३ ॥ देखोनिया छाया सुख न पवीजे । जव न बेसीजे तया तळीं ॥ ४ ॥ हित' तरी होय गाता आईकता । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥ ५ ॥ तुका म्हणे होसी भावेचि तू मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा -परिमळें-सुवासाने, जीवन-पाणी, तान-तहान, न पवीजे-मिळत नाही, आणिपेची-ज्ञानाची. १ गुल

सार्थ तुकारामगाथा १६५ अर्थ :- अन्नाच्या नुसत्या घासाने भूक जात असती तर मग परोपरी लोकांनी स्वयंपाक कशासाठी केला असता ? १ म्हणून मी तुम्हास सांगत आहे की तुम्ही आपापले हित साधण्यासाठी वाणीने नित्य रामनामाचे स्मरण करा. २ पाण्याकडे नुसते पाहून कधी तहान जाते का ? अशी तहान भागत असती तर परोपरी पाण्याची साठवण करण्याची जरूरीच नव्हती. ३ झाडाची नुसती सावली पाहून कुणास सुख लाभणार ? त्याच्या तळाशीं जाऊनच सावलीचे सुख भोगले पाहिजे. ४ आपल्या चित्तामध्ये एक भाव असेल तरच त्या ईश्वराच्या स्तुतीचे गाणे गायल्याने, ऐकल्याने सुख वाटेल. ५ तुकाराममहाराज म्हणतात, यासाठी ध्यानात धर की, तुला दृढ भावानेच भक्ती मिळेल. ज्ञानाची खटपट तुला हवी कशासाठी ? ६

३४३ काय उणें आम्हां विठोबाचे पांईं । नाहीं ऐसें काई येथें एक ॥ १ ॥ तें हें भोवतालें ठायीं वांटूं मन । वराडो करून दारोदारीं ॥ २ ॥ कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥ ३ ॥ तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गांवीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - उणे-कमी, वराडी-भिकारी, बळी-बळवंत, आगळा-समर्थ

अर्थ :- या विठोबाच्या पायाशी आल्यावर आम्हास काय कमी आहे ते सांगा. या पायापाशी आल्यावर मिळत नाही असे काही आहे काय ? १ भोवती सर्वत्र मन वाटून, भिकारी होऊन दारोदार फिरण्याची खरे म्हणजे जरूरीच नाही. २ माझ्या या विठ्ठलाखेरीज दुसरा कोणी एवढा बळवंत आहे काय ? असेल तर सांगा ना ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हास हवा असलेला मोक्ष याच विठोबाच्या पायाशी आहे, याच्या गावी मोक्ष आहे. ही मोक्षाची भांडारे अगदी फुकट लुटावीत ४

३४४ सेवितो रस तो वाटितो आणिका । घ्या रे होऊं नका रानभरो ॥ १ ॥ विटेवरी ज्याचीं पाऊलें समान । तोचि एक दानशूर दाता ॥ २ ॥ मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुलभरूप ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - रस-भक्तिभाव, मारग-मार्ग

अर्थ - पांडुरंगाच्या भक्तीचा हा रस मी स्वतः सेवन करतोच, पण हा इतरांनाही मी वाटतो हा तुम्ही सारेजण पोटभर घ्या उगाच वणवण करीत साऱ्या रानभर भटकू नका. १ ज्या विठ्ठलाची गोजिरवाणी पावले विटेवर शोभून दिसतात तोच एक दानशूर असा दाता आहे. २ त्याच्या ठिकाणी जर आपली बुद्धी स्थिर राहिली तर, निष्ठा जडली तर, तुमच्या मनातील सर्व संकल्प सिद्धीस जातील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा सोपा व सुखाचा सर्वांना सांगण्यासाठी देवाचा निरोप घेऊनच मला त्याने धाडिले आहे. ४

विवरण - आपण आपल्या बळावर बोलत नाही, आपण ईश्वराचे निरोपी आहोत अशी भूमिका तुकाराम महाराजांनी अनेकदा घेतलेली आहे सर्व सत्ता त्या प्रभूची वा श्रीविठ्ठलाची असल्याने तोच आपल्या मुखातून शब्द वदवितो, असेही त्यांनी काही ठिकाणी म्हटले आहे साळुंकी मंजुळ वाणीने बोलत असली तरी तिचा बोलविता धनी वेगळाच असतो असे त्यांनीच एका अभंगात म्हटले आहे 'तुका म्हणे मज बोलवितो देव', 'आपुलीया बळें नाहीं मी बोलत' या ओळीवरून तुकोबांच्या मनामागे प्रेरणा ईश्वराची होती ते ईश्वराचा निरोप सांगणारे होते धन्याचा माल भक्तजनांसाठी भरपूर प्रमाणात वाटण्यासाठी ते आले होते हे स्पष्ट होते त्यांचे कवित्वही याच ईश्वरी प्रेरणेतून आकारास आलेले होते तेव्हा ही वाणी आपल्या पदरची नाही. 'माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो', 'वदवी गोविंद तैंचि वदें' तो गोविंद बोलवील तसे आम्ही बोलणार असा भावार्थ या सर्व वचनांचा.

१६६ सार्थ तुकारामगाथा ३४५ ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्याच्या दर्शनें तुटे भवबंधु । जे का सच्चिदानंदीं नित्यानंदु । जे का मोक्षसिद्धी तीर्थ वंदू रे ॥ १ ॥ भाव सर्वकारण मूळ बहु । सदा समबुद्धि नास्तिवयभेदु । भूतकृपा मोडीं द्वेषकडु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बघू रे ॥ २ ॥ मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं । लघुत्व सर्वभावे अंगीकारीं । साडीमाडी मीतूपण ऐसी थोरी रे ॥ ३ ॥ अर्थकामचाड नाहीं चित्ता' । मानामान मोह माया मिथ्या । वर्तें समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥ ४ ॥ मनीं दृढ धरीं विश्वास । नाही साडीमाडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - भवबंधु-संसारपाश, साडीमाडी-मोडणेतोडणे याचा व्याप, सायास-प्रयत्न अर्थ - ज्याच्या दर्शनाने संसारपाशातून मनुष्य मुक्त होतो असे साधुसंत पुढे दिलेल्या कारणांमुळे भेटतात ते नेहमीच त्या सच्चिदानंदास वंदन करणारे असतात त्या नित्यानंदस्वरूपात असणाऱ्या साधुसंतांचा सहवास मोक्षसिद्धीच्या तीर्थाप्रमाणेच असतो त्यांना वंदन करुं या. १ यांच्या भेटीचे एक प्रमुख व सबळ कारण म्हणजे आपल्या मनात भक्तिभाव हवा नास्तिक्यबुद्धीचा नाश व्हावयास हवा सर्व प्राणिमात्रावर दया असावी मनातील द्वेषाचा कड मोडून टाकावा शत्रू, मित्र, पुत्र, वधू यांच्यावर समत्वानेच प्रेम करावे २ आपले मन, आपली बुद्धी, वाणी, शरीर यांची, तू शुद्धी कर सर्वत्र परमेश्वराचेच रूप समजून त्याला नमस्कार कर सर्व बाजूंनी आपण कमी आहोत अशी भावना मनात धर मी मोठा, तू लहान अशा भेदाचा किंवा अशा थोरवीचा त्याग कर ३ ज्याच्या मनात धनलोभ मुळीच नाही, ज्यास मानापमान नाही, मोह नाही, जो नेहमी समाधानानेच वागत असतो, जो आपल्या ज्ञानाचा गर्व करीत नाही, त्यासच अवचितपणे साधुसंत भेटतात ४ तू मनात ईश्वरावर दृढ विश्वास ठेव मग इतर खटपट करण्याचा मुळी तुला शीण नको तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्या अंगी असणाऱ्या ज्ञानास विटला आहे त्यास नित्य साधुपुरुषांचे दर्शन होत असते ५ ३४६ भवसागर तरता। का रे करीतास चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥ १ ॥ त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं । खांदा वाहे आपुल्या ॥ २ ॥ सुखें करावा संसार । परि न सडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥ ३ ॥ भुक्तिमुक्तीची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता । तुका म्हणे दाता । पाडुरंग वोळंगिल्या ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पैल-पलीकडे, नेघे-घेई नाही चोजवीत-शोधीत, वोळंगिल्या-प्रसन्न झाल्यावर अर्थ - हा संसारसागर तरून जाण्यास एवढी चिंता तुम्ही कसली करता ? पलीकडच्या तीरावर कटीवर हात ठेवून प्रत्यक्ष पांडुरंग दाता, हवे ते देणारा उभा आहे ना १ त्याच्या पायाशी एकदा मिठी घाला तो विश्वचालक परमेश्वर काहीही मोल मागणार नाही केवळ तुमची भक्ती पाहून तुम्हांस खांद्यावर घेऊन संसार सागरातून तुम्हास वाचवील २ तुम्ही सुखाने आपला संसार करावा पण आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी १ चित्ता

हे दोन दिवस मात्र विसरू नका या मार्गाने चालला तर दया, क्षमा, इत्यादी वृत्ती तुमचे घर शोधीत येतील ३ ऐहिक भोग व पारलौकिक मुक्ती याची काळजीच तुम्ही करू नये. तुम्ही स्वतःमध्ये दैन्य व दरिद्रता कधीच धारण करू नये तुकाराम महाराज म्हणतात, एक हा पांडुरंग प्रसन्न झाल्यावर, या दात्याच्या आश्रयाने तुम्हास कसलीच चिंता उरणार नाही ४

३४७ जें कां रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले ॥ १ ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥ २ ॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ॥ ३ ॥ ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरीं जो हृदयीं ॥ ४ ॥ दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥ ५ ॥ तुका म्हणे सांगूं किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा .-रंजले-त्रासले, आपंगिता-सांभाळणारा

अर्थ – जे लोक या संसारतापाने त्रासलेले आहेत, गांजलेले आहेत त्याना जो आपले म्हणून जवळ करतो, १ तोच खरा साधू म्हणून ओळखावा इतकेच नव्हे तर त्याच्या ठिकाणीच देव आहे असे समजावे २ लोणी जसे अंतर्बाह्य मऊ असते त्याप्रमाणेच सज्जनाचे चित्त कोवळे असते ३ ज्यांना कोणीही ममतेने सांभाळणारा नाही त्यांना जो पोटाशी धरून आश्रय देतो, ४ जो आपल्या स्वतःच्या मुलावर जी माया करतो तीच दासदासींवरही करीत असतो, तोच साधू समजावा ५ तुकाराम महाराज म्हणतात, आणखी किती सांगू ? तो प्रत्यक्ष भगवंताचीच मूर्ती समजावा ६

विवरण - तुकाराम महाराजाचा हा अतिशय प्रसिद्ध व लोकप्रिय असा अभंग आहे दीन, दुःखी पीडित, रंजल्यागांजलेले जे कुणी आहेत त्याना उदार अंतःकरणाने जवळ करावे, त्यांच्यावर दया करावी, स्वतःच्या मुलाबाळांप्रमाणे त्यांसीही आपणूक करावी हा एक थोर विचार बुवांनी येथे सांगितला आहे साधुत्वाची, देवत्वाची खूणही त्यांनी याच संदर्भात सांगितली आहे दीनदुः खितांना जवळ करणारा जो साधुपुरुष तोच प्रत्यक्ष भगवंत होय हा एक मोठा विचार भागवत संप्रदायातील मानावा लागेल अगदी सोप्या, सरळ, साध्या व हृदयाचा ठाव घेणाऱ्या भाषेत बुवांनी साधुत्वाचे लक्षण सांगितले आहे सर्व धर्माचे हेच सार आहे नुसता आत्मोद्धार उपयोगी पडत नाही या आत्मोद्धाराचेच एक अंग म्हणजे जनसेवा 'आई चिंता करितों विश्वाची' असे समर्थ रामदास लहानपणीच म्हणाले होते पुढे साऱ्या हिंदुस्थानाचे भ्रमण केल्यावर लोकांची दुःस्थिती पाहून त्यांनी उद्गार काढल 'कैसी वाचतील जनें ?' या लोकांच्या संसाराचे, परमार्थाचे होणार तरी काय ? असा एक प्रश्न साधुसंतांच्या मनात निर्माण होतोच 'चित्तेनें उर फाटतो' अशा भाषेत समर्थांनी या चिंतेची धार व्यक्त केली आहे धनिनांना बुद्धिमंतांना कुणीही जवळ करील, पण दीनदरिद्री व संसारतापाने पोळलेल्या जीवांना कोण आसरा देणार ? त्यांच्यावर मायेचे पांघरूण कोण घालणार ? त्यांना जवळ करून सन्मार्ग कोण दाखविणार ? जो दुसऱ्याची पीडा जाणून ती दूर करतो तोच खरा वैष्णव होय असे गुजराथचे थोर संत नरसी मेहता यांनी म्हटले आहे संतांचा अवतार यासाठीच असतो दुरितांचे तिमिर नष्ट व्हाव, दुष्टांची दुष्ट बुद्धी नाहीशी व्हावी जगात पापताप दूर व्हावेत, विश्वातील अंधार दूर व्हावा, बद्ध मुक्त व्हावेत, बुडालेले वर यावेत, दुःखितांची संकटे दूर व्हावीत यासाठी संतांचे अवतार होत 'संतीं बोधिलौँ सोडीत । बुडालीं काढीत । साकडें फेडीत । आर्तांचिया ' साधुसंत नावरूप असतात असे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे तुकारामबुवाही याच उपकारासाठी उरले होते त्यांना स्वतःस आत्मसुखाचा लाभ झाला तर या भक्तिरभाचे सेवन इतराना व्हावे अशी त्यांची इच्छा होतीच 'आपण ठेवूनि जेववी लोका । सतर्पण करी तुका' अशी त्यांची भूमिका होती दीनदरिद्री व दुःखी जीवाचे दुःख ओळखून वागणे, त्याचा दुःखभार हलका करणे यासारखे दुसरे पुण्यकर्म नाहीच असे समजावे

१६८ सार्थ तुकारामगाथा ३४८ याजसाठीं भक्ति । जगां रुढवाव्या¹ ख्याति ॥ १ ॥ नाहीं तरी फोटें दुजें । आहे बोलाया सहजें ॥ २ ॥ गौरव यासाठीं । स्वामिसेवेची कसोटी ॥ ३ ॥ तुका म्हणे अळंकारा । देवभक्त लोकीं खरा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- रुढवाव्या-वाढविण्यासाठी, ख्याती-प्रसिद्धी. अर्थ:- दुःखी कष्टी जीवांना तारण्यासाठीच या भक्तीच्या प्रसिद्धीची वाढ व्हावयास हवी. १ नाही तर दुसऱ्यापणाने बोलावे असे ईश्वर व जीव यांत द्वैत आहे कुठे ? २ केवळ भक्तीचा गौरव व्हावा म्हणून हा स्वामी, हा सेवक असा वरवरचा दुजाभाव आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवभक्ताचे नाते हाच एक खरा अलंकार या लोकात आहे ४ ३४९ अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं ॥ १ ॥ जो हे दूषी हरिची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ २ ॥ याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥ ३ ॥ तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- याति-जात अर्थ:- देवा, जी वाणी अमंगल आहे ती माझ्या कानावर सुद्धा येऊ नये. १ जो हरीच्या कथेला दूषण देतो त्याला क्षय रोगाची व्यथा लागली आहे असे समजावे २ मग तो श्रेष्ठ वर्णाचा ब्राह्मण असला तरी तो पापी, चाडाळच समजावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्यास स्वतःचे आईबाप आवडत नाहीत, नकोसे झाले आहेत, तो पापीच समजावा. ४ ३५० कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥ १ ॥ वाचें नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ २ ॥ कैसा निरयगांवा । जाऊं न पवे दिसावा ॥ ३ ॥ तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- सिंदळीचा-जारिणीच्या पोटचा, नुच्चारी-उच्चारीत नाही, निरयगाव-नरक, लंड- नास्तिक. अर्थ:- जो पुढे दिल्याप्रमाणे श्रीहरीचे नाव घेत नाही तो जारिणीच्या पोटचाच नव्हे काय ? १ तो कधीही वाणीने गोविंदाचे नाव घेत नाही. सतत दुसऱ्याची निंदा करतो २ तो नरकाच्या गावी जाऊनच विसावा घेणार नाही का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा या नास्तिकास चांगलाच दंड होणार असतो. ४ ३५१ आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव ॥ १ ॥ करवी आणिकाचे घात । खोडी काढूनि पडित ॥ २ ॥ श्वानाचियापरी । मिष्टान्नासि विटाळ करी ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा । शटबेचि ना पांचा दिसां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- ठाव-पत्ता, खोडी-दोष, भटवणे-दाघणे अर्थ - ज्याला शुद्ध आचरणाचा पत्ताच नाही ; व ज्याच्या स्वतःच्या अंगी भक्तिभाव नाही, १ असा हा पंडित दुसऱ्याचा दोष काढून त्याचा घात करतात किंवा करवितात २ एखादे कुत्रे मिष्टान्नात शिवून भ्रष्ट करते, तसे वागणे या दुष्टाचे असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा या दुष्ट माणसांस इतके आयुष्य तरी १ वाढवावा

सार्थ तुकारामगाथा १६१ कसे लाभले ? जन्मतःच पाचव्या सहाव्या दिवशी याला सटवीच्या किंवा सटवाईच्या फेऱ्याची बाधा कशी झाली नाही ? ४ ३५२ गर्भाचे धारण । तिने वागविला सिण ॥ १ ॥ व्याली कुल्हाडीचा दांडा । वर न घालीच धोंडा ॥ २ ॥ उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची माय ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सिण-त्रास, काळ-यम, माय-आई अर्थ - असा जो अभक्त त्याच्या गर्भधारणेने आईस शीण मात्र व्यर्थ झाला १ आपल्याच गोतास काळ होणारा कुऱ्हाडीचा दांडा तो जणु व्याली उपजतच तिने त्याच्या मुखावर धोंडा घालून त्यास मारून का नाही टाकले ? २ हा तिच्या पोटी जणु प्रत्यक्ष यमच जन्मास आला व त्याने सर्व कुळास बट्टा लाविला ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा या दुष्ट अभक्ताची आई नरकास जाते ४ ३५३ पतनासि जे नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥ १ ॥ विधीपुरतें कारण । बहु वारावे वचन ॥ २ ॥ सर्वस्वाप्ति नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥ ३ ॥ तुका म्हणे दुरी । राखता हे तोची बरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वारावे-दूर करावे, नाडी-आड येते, फसचित अर्थ - जो स्त्री आपल्या पतीस पतनाकडेच नेत असते तिचा स्नेह किंवा तिचे प्रेम या सर्व गोष्टी खोट्याच समजाय्यात १ केवळ शास्त्रविधीपुरताच तिच्याशी सबंध ठेवावा तिच्याशी फार बोलणे दूर करावे, फार बोलू नये तिच्याशी २ ती सर्वस्वाच्या आड येणारी, फसविणारी असून लाघवाची, गोड गोड बोलाची ती एक येडीच असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही स्त्री जितकी दूर ठेवता येईल तितकी बरी त्यातच आपले सुख आहे ४ ३५४ देव आड जाला । तो भोगिता मी उगला । अवघा निवारला । शीण शुभाशुभाचा ॥ १ ॥ जीवशिवाचे भातुके । केले क्रीडाया¹ कौतुके । फेचीं येथें लोके । हा आभास अनित्य ॥ २ ॥ विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वाटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ तयाचा ॥ ३ ॥ अवघी एकाचीच वीण । तेथें कैंचे भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणे केला नियाडा ॥ ४ ॥ प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा² ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - उगला-उगाच, भातुकें-भातुकलीचा खेळ, लाग-सबध; सौरस-गोडी अर्थ - आता आमच्यासमोर देव उभा राहून आड आला व तोच सर्व भोगत असून मी मात्र उगाच उभा आहे सर्व शुभाशुभ कर्माचा शीण जो अवघा होता तो त्याने स्वतःकडे भोक्तृत्व घेऊन दूर केला १ केवळ क्रीडा १ होत कवतुकें, २ निरोपी तु गाथा २१

१७० सार्थ तुकारामगाथा करण्यासाठी मुली भातुकलीचा खेळ करतात त्याप्रमाणे त्याने ०शियाशिवीचा खेळ केवळ स्वत च्या कौतुकासाठी मांडलेला आहे या ठिकाणी विविध प्रकारचे लोक म्हणजे हे आपले, हे परके असे आहेत तरी कुठे ? जो दिसतात तो सर्व आभासच आहे अनित्य आहे २ तात्त्विक दृष्टीने पाहिले तर हे सब जगच विष्णुमय नव्हे काय ? आपला सबंध तिथे जडत असला तरी व वर्णधर्माप्रमाणे वाटणी झालेली असली तरी हा एक प्रकारचा खोट्याचाच प्रकार नव्हे काय ? ३ सारे पाहिले असता हे सर्व चराचर जगत म्हणजे त्या एकाचीच वीज नव्हे काय ? मग तेथे भिन्नतेचा प्रकार असणार कुठून ? असा निर्णय जो वेद पुरुष नारायण त्यानेच घेतलेला आहे ४ तुकाराम महाराज म्हण तात त्या प्रसादाची गोडी मला भाग्याने मिळालेली आहे म्हणूनच मला त्या प्रभूच्या पायाशी निवास करण्याचे सधी मिळाली आहे मी आता येथून निराळा कधीच होणार नाही ५ विवरण - तुकोबांच्या या एका सुबोध अभगात एक फार मोठे तत्त्व स्पष्ट झाले आहे केवळ स्वत च्या सुखासाठी ते चित्तत्त्व बहुविध रूपानी व्यक्त झाले वास्तविक पाहता ही विविधता खरी नव्हे निरनिराळया रूपाची वाटणी, वर्णविभाग हे सब खेळच होत परतु मूळचे तत्त्व फार वेगळ बाहे या सब विविधतेतून एक प्रकारचे बनूट असे सूत्र आहे 'मयि सर्वमिद प्रोत सूत्र मणिगणा इव दान्यान अनेक मणी ओवावेत त्याप्रमाणे माझ्या ठिकराणीच हे सर्व विश्व ओविलेले आहे असे गीतेत भगवतानी सागितल बाह सूत्र व त्यात ओवलेले मणी या गीतेच्या दृष्टान्तातील कमतरता भरून पाडताना ज्ञानेश्वरानी एव बहारदार अशी तत्त्वदर्शी ओवी लिहिलेली आहे 'सुवर्णाचे मणी केले। ते सोनियाचे सुतीं वोविले। तैसे म्या जग धरिलें। सबाह्याभ्यंतरों' ॥ आता हा एकाचाच विस्तार असल्यामुळे 'अवघी एकाचीच वोण । तेथें कैंचे भिन्नाभिन्न' असा महत्त्वाचा प्रश्न बुवानी उत्पन्न केला आहे मंबाजी गोसावी यांनीं स्वामीस पीडा केली-अभंग ३५५ न सोडीं न सोडीं न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥ १ ॥ भलतें जड पडो भारी । जीवावरी आगोज ॥ २ ॥ शतखंड देह शस्त्रधारी । करिता परी न भीयें ॥ ३ ॥ तुका म्हणे केलों आधीं । दृढ बुद्धी सावध ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जड-दुःख, सकट, आगोज-भयंकर अर्थ - विठ्ठला, मी तुझे पाय सोडणार नाही असे त्रिचार सागतो अगदी भयरकर वाटेल असा भार मजवर मोठाच पडला आहे विठ्ठला २ शस्त्रधारण करणाऱ्याने मजवर जरी आघात करून शेकडो तुकडे माझ्या देहाचे केले तरी मी भिणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, आरभीच सावध होऊन मी बुद्धी दृढ केली आहे सावध केली आहे ४ ३५६ बरवे बरवे केले विठोबा बरवे । पाहोनि आत क्षमा अगीं फाटीवरी मारविलें ॥ १ ॥ शिव्या गाळी नीत नाहीं । बहु फार विटविले ॥ २ ॥ तुका म्हणे क्रोधा हातीं । सोडवूनि घेतले रे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - बरवें-चागले, फाटीवरी-काठ्यानी अर्थ - विठ्ठला, हे फार चागले केले तुम्ही माझ्या अगची क्षमा वृत्ती पाहून मबाजीबुवाकडून मला काठ्यानी तुम्ही मारविले १ नीतीनियम सोडून त्याने मला फार शिवीगाळ परून माझी पुरतीच विटबना केली २ तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही क्रोधापासून यावेळी माझे रक्षणच केले ३ ३५७ पावलो पाथलो । देवा पावलो रे ॥ १ ॥ थरवें संचित होतें तैसे जालें रे । आता काय बोलो रे ॥ २ ॥ सोज्ज्वळ फटकवाटा भावे करू गेला रे । तुका म्हणे करुन वेगळा केलो रे ॥ ३ ॥

सार्थ तुकारामगाथा १७१

शब्दार्थ व टीपा :- सचित-पूर्वजन्मीचे साठलेले कर्म, सोज्वळ-नीट, स्वच्छ, कटकवाटा-वाटघाती भरलेला वाटा अर्थ :- देवा, माझ्या पूर्वसचित कर्माप्रमाणे मला फळ मिळाले ? धाडले कर्म मी केले असावे; त्याप्रमाणे घडून आले. आता त्यावर मी काय बोलावे ? २ मबाजी गोसाव्याने प्रदक्षिणेच्या मार्गात काट्या पसरल्या होत्या त्या मोठ्या भक्तिभावाने लोकाना त्रास होऊ नये म्हणून मी दूर केल्या पण तुकाराम महाराज म्हणतात, ह्या गोसाव्याने मला धरून भूर केले की हो ३ ३५८ का होती कां होती । देवा एवढी फजोती ॥ १ ॥ मुळीं वर्म नसतो चुकलो । तो मी ऐसे चित्तीं ॥ २ ॥ होणार होऊनि गेले । मिथ्या आता खंती रे ॥ ३ ॥ तुका म्हणे पुरे आता । दुर्जनाची सगती रे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वर्म-रहस्य, खती-काळजी अर्थ :- देवा, माझी एवढी फजिती का होत असते रे ? देवा, मुळातले रहस्य जर मला समजले असते तर अशी फजिती झाली नसती १ मुळातच हा दुर्जन आहे असे समजण्याचे माझे चित्तात आले नाही २ खरे, आता जे व्हायचे ते होऊन गेले आता त्याची काळजी करणे खोटेपणाचेच आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मला दुर्जनाची संगत नको हो देवा ४ ३५९ सोडवा सोडवा । सोडवा हो अनंता ॥ १ ॥ तुजविण ऐसा । कोण दुजा प्राणदाता ॥ २ ॥ कोणा लाज नेणा ऐसे । आणिका शरण आम्ही¹ जाता ॥ ३ ॥ तुका म्हणे सख्या । माझ्या रखुनाईच्या कांता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुजा-दुसरा, आणिका-दुसऱ्याना. अर्थ :- अनंता, परमेश्वरा, मला आता या सर्व उपाधींतून सोडवा ना ? १ देवा, तुझ्याशिवाय दुसरा कोण माझे प्राण रक्षण करणारा आहे ? २ मी जर दुसऱ्या दैवताना शरण गेलो, तर त्याची लाज तुमच्याशिवाय कुणास वाटणार आहे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे रखुमाईच्या कांता, विठ्ठला, मला या त्रासातून मुक्त करा ४ विवरण - वरील चारपाच अभंगातून तुकारामबुवाच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या प्रकरणाचा निर्देश आहे तुकोबांच्या वेळी मबाजी नावाचा एक ब्राह्मण चिंचवडहून देहू येथे स्थायिक झाला होता देहूच्या पीलशेट्टी नावाच्या एका गृहस्थाने मठ वगैरे बाधण्यासाठी आपल्या शेतातील भिवमगा नावाचा एक भाग मबाजी गोसाव्यास दिला मबाजीने त्यावर फुलझाडे वगैरे लावून एक छोटासा बगीचा तयार केला लोकाना मत्र वगैरे देऊन मबाजी थोडाफार गब्बरशाही वगीत असे त्याची शिष्यशाखाही मोठी होती, परंतु तुकाराम महाराजाचा भजनकीर्तनाचा संप्रदाय वाढला तेव्हा सर्व लोकाची गर्दी तुकोबाच्या भोवती होत राहिली मबाजीस या गोष्टीचे वैषम्य वाटले तो मनातून तुकोबाचा द्वेष करू लागला हा प्रकार व्हापला एक निमित्त सापडले तुकोबाच्या मासऱ्यानी, अमाजी मुळ्ये यानी त्याना एक म्हैस घेऊन दिली ही म्हैस एकदा कुंपण ओलांडून मबाजीच्या परड्यात शिरली तिने झाडाची थोडी नामधूपही केली अर्थातच मबाजीला फार राग आला,त्याने तुकोबाना अपशब्द बोलायला सुरुवात केली परंतु तुकोबा शान राहिले पण मबाजीचा स्वभाव पालटला नाही त्याने एकादशीस लोक विठ्ठलमदिरात येतील व आपल्या परड्यास उपद्रव होईल या भीतीने प्रदक्षिणेच्या वाटेवर काटेरी झुडुप घालून अडथळा निर्माण केला भक्ताना प्रदक्षिणा घालताना त्रास होऊ नये म्हणून १ तुम्ही

१७२ सार्थ तुकारामगाथा तुकोबांनी हे काटेरी कुंपण वाढून टाकले हे काम होत असतानाच मबाजी संतापून धावतच तेथे आला कुंपणाचीच एक काटेरी काठी उपटून तिने तुकोबास मारहाण करण्यास त्याने प्रारंभ केला एक काठी वापरून निरुपयोगी झाली, की तो दुसरी घेई अशा दहा काठ्या झाल्या तरी तुकोबांची शांती ढळली नाही तुकोबांना वाटले, देव आपल्या क्षमावृत्तीची परीक्षाच पाहात आहे या गबाळावर रागवावे हे त्याच्या मनात येईच ना इतर भक्त मंडळींनी व अवलीने अथवा जिजाईने हळूवार हाताने त्यांच्या अंगात रुतलेले काटे काढले एकादशीस तुकोबांचे कीर्तन सुरू झाले मबाजी कीर्तनाला आला नव्हता तुकोबा स्वतः त्याच्या घरी गेले व त्याची त्यांनी क्षमा मागितली आपणास मार देताना त्याला काही घाम तर फार झाला नाही ना ? अशी त्यांनी चौकशी केली । पुढे मबाजीबुवा सजिर झाला व कीर्तनास जाऊ लागला

३६० पुत्राची वारता । शुभ ऐके जेवीं माता ॥ १ ॥ तैसे राहो माझें मन । गाता ऐकतां हरिगुण ॥ २ ॥ नादें लुब्ध जाला मृग । देह विसरला अंग ॥ ३ ॥ तुका म्हणे पाहे । कासवीचे पिले माये ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वारता-बातमी अर्थ - दूर गेलेल्या मुलाची शुभ वार्ता ऐकून ज्याप्रमाणे आईस आनंद होतो, १ त्याचप्रमाणे या ईश्वरीचे गुण गाऊन, ऐकून माझ्या मनास आनंद होत असतो २ पारध्याच्या गाण्यास जसे हरिण लुब्ध होते व देहभान विसरून जाते तशीच अवस्था माझी झाली आहे ३ मोठ्या प्रेमाने कासवीची पिले आपल्या आईकडे पाहात असतात त्याप्रमाणे देवा, माझे लक्ष तुझ्याकडेच लागून राहिले आहे आईच्या दृष्टीवर पिल्लांचे पोषण होते असा कासवीच्या बाबतीत संकेत आहे ४

३६१ ध्यानीं योगिराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाठीं तयाचिया ॥ १ ॥ तान भुक त्याचे राखे शीत उष्ण । झाले उदासीन देहभाव ॥ २ ॥ कोण सखें तया आणीक सोयरें । असे त्या दुसरें हरीविण ॥ ३ ॥ कोण सुख त्याच्या जीवासी आनंद । नाहीं राज्यमद घडी तया ॥ ४ ॥ तुका म्हणे विष अमृता समान । कृपा नारायण करिता होय ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कपाटीं-डोंगराच्या गुहेत, राज्यमद-राज्याचा लोभ, घडी-क्षणभर अर्थ - जे लोक सर्वसंगपरित्याग करून, ध्यानस्थ होऊन डोंगराच्या गुहेत जाऊन बसले त्या योगीराजाच्या पाठोपाठ देव त्याच्या संरक्षणासाठी नेहमी असतो १ त्याची तहान, भूक, त्याचा शीतोष्णापासूनचा त्रास यांची काळजी तोच घेत असतो कारण हे योगिराज किंवा विरक्त पुरुष देहाविषयी नेहमीच उदासीन असतात २ त्यांना या श्रीहरीखेरीज त्याची चिंता पाहणारे दुसरे सखेसोयरे कोण आहेत ? ३ त्या रानावनात त्याच्या जीवास कसले सुख असते ? त्यांच्या मनात दुसरा कसला आनंद असतो ? एक क्षणभर देखील राज्यसुखाचा लोभ त्यांना वाटत नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा महात्म्यांना विष आणि अमृत याही गोष्टी सारखीच वाटते त्या नारायणाच्या कृपेमुळे सर्वत्र समभाव निर्माण होतो ५

३६२ न व्हावे तें जालें देखियेले पाय । आता फिरूं काय मागें देवा ॥ १ ॥ बहु दिस होतौं करीत हे आस । तें आले सायासे फळ आजि ॥ २ ॥ कोठवरि जिणे संसाराच्या आशा । उगवो हा फासा येथूनिया ॥ ३ ॥ वृक्षालीं तयाचा मूळ ना भारग । लागे तो लाग सांडूनिया ॥ ४ ॥

सार्थ तुकारामगाथा १७३ पुढें उल्लंघितां दुःखाचें डोंगर । नाहीं अंतपार गर्भवासा ॥ ५ ॥ तुका म्हणे कास धरीन पीतांबरों । तूं भवसागरीं तारूं देवा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टोपा :- आस-इच्छा, सायासे-प्रयत्नाने, फांसा-पाश, उगवो-सुटावा, लाग-लाभ, तारू-नाव अर्थः- देवा जे सहजासहजी घडणार नाही ते आज घडले की रे. मी आज तुझे पवित्र चरण पाहिले. आता काय या थोर लाभापासून मी मागे फिरू ? १ पुष्कळ दिवस झाले, मी हीच इच्छा करीत होतो. ते फळ तुझ्या चरणदर्शनाने मोठ्या प्रयत्नाने माझ्या हातात आले. २ या संसाराच्या आशेत राहून देवा, कुठवर जगावे ? आता या श्रीविठ्ठलाच्या चरणामुळे संसाराच्या पाशातून मी सुटावे. ३ असला हा विठ्ठलप्राप्तीचा लाभ सोडून देऊन जे संसार- सागरात बुडून गेले त्यांचा काहीही ठावठिकाणा सापडत नाही. ४ जर तुझी संगत मिळाली नाही तर देवा, पुढे दुःखाचे डोंगरच्या डोंगर ओलांडताना पुनः पुनः गर्भवासाचे जे दुःख भोगावे लागते त्यास अंत नसतो. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, म्हणून मी तुमच्या पीतांबराची कास धरूनच उभा राहीन. कारण तूच या भवसागरातील माझी नाव आहेस विठ्ठला. ६ ३६३ वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नास न लगे कांहीं ॥ १ ॥ तया पुंडलिकाने केला उपकार । फेडावया १ भार पृथीवीचा ॥ २ ॥ तुका म्हणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टोपा - तपाचे तपश्चर्येचे, सायास-कष्ट. अर्थ - त्या वैकुंठास जाण्यासाठी माणसांस तपश्चर्या करून फार मोठमोठे प्रयत्न करावे लागतात प्रसंगी जीवाचा नाशही करावा लागतो. १ परंतु तो पुंडलीक महामुनी किती थोर पाहा. त्याने मोठाच उपकार पृथ्वीवरील भार हलका करण्यासाठी केला आहे. २ कारण त्याने भूवैकुंठ पंढरपूर येथे विठ्ठलाला उभे करून अतिशय सोपी व सुलभ अशी पायवाट निर्माण केली आहे; असे तुकाराम महाराज म्हणतात. ३ ३६४ शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥ १ ॥ येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ २ ॥ करितो होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥ ३ ॥ तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गाढे-मोठे, लंडीपणा भित्रेपण, घडी-वेळ अर्थ :- लोकहो, शोकाने शोकच फार वाढतो म्हणून हिंमत धरून मोठे धैर्य वाढवा. १ या नरजन्मास येऊन काय न करावे ? तर बंधूंनो येथे भित्रेपणा मात्र खोटा आहे. २ परमार्थाच्या विचाराविषयी अथवा ईश्वर- भक्तित्विषयी सर्व जण होय होय असेच म्हणतात, पण शेवटी प्रत्यक्ष मदत करण्याचा प्रसंग आला की कोणीच साह्य करीत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरभक्ती करण्याची नरजन्मातील ही एक वेळ साधली तर पुष्कळच लाभ आहे ४ ३६५ म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जियैली ॥ १ ॥ माझिया गोतें हैं बसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ २ ॥ करूनि ओळखी दिली एकसरें । न देखों दुसरे विपमासी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं काळापाशी गोवा । स्थिति मति देवा वांचूनियां ॥ ४ ॥

  • शब्दार्थ व टीपा :- वर्जियैली-मोडली, गोतें नातेवाईकानी, गोवा-आठवणूक १ हरावया

१७४ सार्थ तुकारामगाथा अर्थ - म्हणूनच मी हा असा खेळ आज मांडिला आहे यात कोणतीहो दिशा मी वगळलेली नाही १ हे सभोवती जे दिसत आहे ते माझ्याच नातेवाईकांच्या सबंधातील जगत आहे विटाळाचा भेद मला कुठेच दिसत नाही २ त्या श्रीविठ्ठलाने तो स्वत च सर्वत्र भरून राहिला आहे अशी मला ओळख पटवून दिली असल्यामुळे दुसरा विपरीत भावच माझ्या मनात कधी येत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या काळोपाशी माझ्या चित्ताची आडवणूक झालेली नाही माझी स्थिती, माझी बुद्धी त्या देवापासून निराळी मुळीच नाही ४ ३६६ वैष्णव तो जया। अवघी देवावरी माया ॥ १ ॥ नाहीं आणिक प्रमाण । तन धन तृण जन ॥ २ ॥ पडता जड भारी । नेमा न टळे निर्धारीं ॥ ३ ॥ तुका म्हणे याती । हो का तयाची भलती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - तन-शरीर जड-सकट अर्थ - ज्याची सब प्रीती त्या देवावर असते तोच खरा वैष्णव होय १ त्याला शरीर, सपती, लोक हे गवताप्रमाणे क्षुल्लक वाटतात त्याला दुसऱ्या कशाचीही इच्छा नसते तो देवालाच प्रमाण मानतो २ केवढहो मोठे सकट आले तरी तो आपल्या नेहमीच्या नित्य उपासनेत अथवा भक्तीत निर्धाराने व्यत्यय आणीत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात तो एकदा ईश्वराशी जडला की मग त्याची जात कोणती का असेना ४ ३६७ करोत तपादि साधने । कोणी साधो गोराजने ॥ १ ॥ आम्ही न वजों तया वाटा । नाचू पंढरीचोहटा ॥ २ ॥ पावोत आत्मस्थिति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥ ३ ॥ तुका म्हणे छंद । आम्हा हरिच्या दासा निंद्य ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गोराजने- ईश्वराच्या प्राप्तीसाठी स्वत स जाळून घेण्यासारखी अघोर साधन, न वगो- जाणार नाही, चोहटा-चव्हाट्यावर अर्थ - कुणी तपश्चर्यादी साधन करोत, अथवा कुणी ईश्वराच्या प्राप्तीसाठी स्वत स जाळून घेण्याचे अधोरी उपाय करोत १ आम्ही काही त्या वाटाकडे चुकूनही जाणार नाही आम्ही केवळ पंढरपूरच्या चव्हाट्यावरच श्रीहरीचे नाम घेत नाचत राहू २ कुणाला आत्मस्थितीचे ज्ञान लाभो कुणाला मुक्ती ही उत्तम स्थिती असे म्हणा वेसे वाटो, ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे असले विठ्ठलभजनाखेरीजचे छंद आम्हासारख्या भक्तांना निंद्यच वाटतात ४ स्वामींस सद्गुरूची कृपा झाली-अभंग ४ ३६८ सद्गुरुरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥ १ ॥ सांपडविले वाटे जाता गगास्नाना । मस्तकों तो जाणा ठेविला कर ॥ २ ॥ भोजना मागतो तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥ ३ ॥ कांहीं कळे उपजला अंतराय । म्हणोनिया काय त्वरा जाली ॥ ४ ॥ राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खूण मालिकेची ॥ ५ ॥ बाबाजी आपले सागितले नाम । मत्र दिला राम कृष्ण हरी ॥ ६ ॥ माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अगीकार तुका म्हणे ॥ ७ ॥