सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 204, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१७० सार्थ तुकारामगाथा करण्यासाठी मुली भातुकलीचा खेळ करतात त्याप्रमाणे त्याने ०शियाशिवीचा खेळ केवळ स्वत च्या कौतुकासाठी मांडलेला आहे या ठिकाणी विविध प्रकारचे लोक म्हणजे हे आपले, हे परके असे आहेत तरी कुठे ? जो दिसतात तो सर्व आभासच आहे अनित्य आहे २ तात्त्विक दृष्टीने पाहिले तर हे सब जगच विष्णुमय नव्हे काय ? आपला सबंध तिथे जडत असला तरी व वर्णधर्माप्रमाणे वाटणी झालेली असली तरी हा एक प्रकारचा खोट्याचाच प्रकार नव्हे काय ? ३ सारे पाहिले असता हे सर्व चराचर जगत म्हणजे त्या एकाचीच वीज नव्हे काय ? मग तेथे भिन्नतेचा प्रकार असणार कुठून ? असा निर्णय जो वेद पुरुष नारायण त्यानेच घेतलेला आहे ४ तुकाराम महाराज म्हण तात त्या प्रसादाची गोडी मला भाग्याने मिळालेली आहे म्हणूनच मला त्या प्रभूच्या पायाशी निवास करण्याचे सधी मिळाली आहे मी आता येथून निराळा कधीच होणार नाही ५ विवरण - तुकोबांच्या या एका सुबोध अभगात एक फार मोठे तत्त्व स्पष्ट झाले आहे केवळ स्वत च्या सुखासाठी ते चित्तत्त्व बहुविध रूपानी व्यक्त झाले वास्तविक पाहता ही विविधता खरी नव्हे निरनिराळया रूपाची वाटणी, वर्णविभाग हे सब खेळच होत परतु मूळचे तत्त्व फार वेगळ बाहे या सब विविधतेतून एक प्रकारचे बनूट असे सूत्र आहे 'मयि सर्वमिद प्रोत सूत्र मणिगणा इव दान्यान अनेक मणी ओवावेत त्याप्रमाणे माझ्या ठिकराणीच हे सर्व विश्व ओविलेले आहे असे गीतेत भगवतानी सागितल बाह सूत्र व त्यात ओवलेले मणी या गीतेच्या दृष्टान्तातील कमतरता भरून पाडताना ज्ञानेश्वरानी एव बहारदार अशी तत्त्वदर्शी ओवी लिहिलेली आहे 'सुवर्णाचे मणी केले। ते सोनियाचे सुतीं वोविले। तैसे म्या जग धरिलें। सबाह्याभ्यंतरों' ॥ आता हा एकाचाच विस्तार असल्यामुळे 'अवघी एकाचीच वोण । तेथें कैंचे भिन्नाभिन्न' असा महत्त्वाचा प्रश्न बुवानी उत्पन्न केला आहे मंबाजी गोसावी यांनीं स्वामीस पीडा केली-अभंग ३५५ न सोडीं न सोडीं न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥ १ ॥ भलतें जड पडो भारी । जीवावरी आगोज ॥ २ ॥ शतखंड देह शस्त्रधारी । करिता परी न भीयें ॥ ३ ॥ तुका म्हणे केलों आधीं । दृढ बुद्धी सावध ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जड-दुःख, सकट, आगोज-भयंकर अर्थ - विठ्ठला, मी तुझे पाय सोडणार नाही असे त्रिचार सागतो अगदी भयरकर वाटेल असा भार मजवर मोठाच पडला आहे विठ्ठला २ शस्त्रधारण करणाऱ्याने मजवर जरी आघात करून शेकडो तुकडे माझ्या देहाचे केले तरी मी भिणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, आरभीच सावध होऊन मी बुद्धी दृढ केली आहे सावध केली आहे ४ ३५६ बरवे बरवे केले विठोबा बरवे । पाहोनि आत क्षमा अगीं फाटीवरी मारविलें ॥ १ ॥ शिव्या गाळी नीत नाहीं । बहु फार विटविले ॥ २ ॥ तुका म्हणे क्रोधा हातीं । सोडवूनि घेतले रे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - बरवें-चागले, फाटीवरी-काठ्यानी अर्थ - विठ्ठला, हे फार चागले केले तुम्ही माझ्या अगची क्षमा वृत्ती पाहून मबाजीबुवाकडून मला काठ्यानी तुम्ही मारविले १ नीतीनियम सोडून त्याने मला फार शिवीगाळ परून माझी पुरतीच विटबना केली २ तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही क्रोधापासून यावेळी माझे रक्षणच केले ३ ३५७ पावलो पाथलो । देवा पावलो रे ॥ १ ॥ थरवें संचित होतें तैसे जालें रे । आता काय बोलो रे ॥ २ ॥ सोज्ज्वळ फटकवाटा भावे करू गेला रे । तुका म्हणे करुन वेगळा केलो रे ॥ ३ ॥