सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 203, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १६१ कसे लाभले ? जन्मतःच पाचव्या सहाव्या दिवशी याला सटवीच्या किंवा सटवाईच्या फेऱ्याची बाधा कशी झाली नाही ? ४ ३५२ गर्भाचे धारण । तिने वागविला सिण ॥ १ ॥ व्याली कुल्हाडीचा दांडा । वर न घालीच धोंडा ॥ २ ॥ उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची माय ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सिण-त्रास, काळ-यम, माय-आई अर्थ - असा जो अभक्त त्याच्या गर्भधारणेने आईस शीण मात्र व्यर्थ झाला १ आपल्याच गोतास काळ होणारा कुऱ्हाडीचा दांडा तो जणु व्याली उपजतच तिने त्याच्या मुखावर धोंडा घालून त्यास मारून का नाही टाकले ? २ हा तिच्या पोटी जणु प्रत्यक्ष यमच जन्मास आला व त्याने सर्व कुळास बट्टा लाविला ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा या दुष्ट अभक्ताची आई नरकास जाते ४ ३५३ पतनासि जे नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥ १ ॥ विधीपुरतें कारण । बहु वारावे वचन ॥ २ ॥ सर्वस्वाप्ति नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥ ३ ॥ तुका म्हणे दुरी । राखता हे तोची बरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वारावे-दूर करावे, नाडी-आड येते, फसचित अर्थ - जो स्त्री आपल्या पतीस पतनाकडेच नेत असते तिचा स्नेह किंवा तिचे प्रेम या सर्व गोष्टी खोट्याच समजाय्यात १ केवळ शास्त्रविधीपुरताच तिच्याशी सबंध ठेवावा तिच्याशी फार बोलणे दूर करावे, फार बोलू नये तिच्याशी २ ती सर्वस्वाच्या आड येणारी, फसविणारी असून लाघवाची, गोड गोड बोलाची ती एक येडीच असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही स्त्री जितकी दूर ठेवता येईल तितकी बरी त्यातच आपले सुख आहे ४ ३५४ देव आड जाला । तो भोगिता मी उगला । अवघा निवारला । शीण शुभाशुभाचा ॥ १ ॥ जीवशिवाचे भातुके । केले क्रीडाया¹ कौतुके । फेचीं येथें लोके । हा आभास अनित्य ॥ २ ॥ विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वाटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ तयाचा ॥ ३ ॥ अवघी एकाचीच वीण । तेथें कैंचे भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणे केला नियाडा ॥ ४ ॥ प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा² ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - उगला-उगाच, भातुकें-भातुकलीचा खेळ, लाग-सबध; सौरस-गोडी अर्थ - आता आमच्यासमोर देव उभा राहून आड आला व तोच सर्व भोगत असून मी मात्र उगाच उभा आहे सर्व शुभाशुभ कर्माचा शीण जो अवघा होता तो त्याने स्वतःकडे भोक्तृत्व घेऊन दूर केला १ केवळ क्रीडा १ होत कवतुकें, २ निरोपी तु गाथा २१