सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 205, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १७१
शब्दार्थ व टीपा :- सचित-पूर्वजन्मीचे साठलेले कर्म, सोज्वळ-नीट, स्वच्छ, कटकवाटा-वाटघाती भरलेला वाटा अर्थ :- देवा, माझ्या पूर्वसचित कर्माप्रमाणे मला फळ मिळाले ? धाडले कर्म मी केले असावे; त्याप्रमाणे घडून आले. आता त्यावर मी काय बोलावे ? २ मबाजी गोसाव्याने प्रदक्षिणेच्या मार्गात काट्या पसरल्या होत्या त्या मोठ्या भक्तिभावाने लोकाना त्रास होऊ नये म्हणून मी दूर केल्या पण तुकाराम महाराज म्हणतात, ह्या गोसाव्याने मला धरून भूर केले की हो ३ ३५८ का होती कां होती । देवा एवढी फजोती ॥ १ ॥ मुळीं वर्म नसतो चुकलो । तो मी ऐसे चित्तीं ॥ २ ॥ होणार होऊनि गेले । मिथ्या आता खंती रे ॥ ३ ॥ तुका म्हणे पुरे आता । दुर्जनाची सगती रे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वर्म-रहस्य, खती-काळजी अर्थ :- देवा, माझी एवढी फजिती का होत असते रे ? देवा, मुळातले रहस्य जर मला समजले असते तर अशी फजिती झाली नसती १ मुळातच हा दुर्जन आहे असे समजण्याचे माझे चित्तात आले नाही २ खरे, आता जे व्हायचे ते होऊन गेले आता त्याची काळजी करणे खोटेपणाचेच आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मला दुर्जनाची संगत नको हो देवा ४ ३५९ सोडवा सोडवा । सोडवा हो अनंता ॥ १ ॥ तुजविण ऐसा । कोण दुजा प्राणदाता ॥ २ ॥ कोणा लाज नेणा ऐसे । आणिका शरण आम्ही¹ जाता ॥ ३ ॥ तुका म्हणे सख्या । माझ्या रखुनाईच्या कांता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुजा-दुसरा, आणिका-दुसऱ्याना. अर्थ :- अनंता, परमेश्वरा, मला आता या सर्व उपाधींतून सोडवा ना ? १ देवा, तुझ्याशिवाय दुसरा कोण माझे प्राण रक्षण करणारा आहे ? २ मी जर दुसऱ्या दैवताना शरण गेलो, तर त्याची लाज तुमच्याशिवाय कुणास वाटणार आहे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे रखुमाईच्या कांता, विठ्ठला, मला या त्रासातून मुक्त करा ४ विवरण - वरील चारपाच अभंगातून तुकारामबुवाच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या प्रकरणाचा निर्देश आहे तुकोबांच्या वेळी मबाजी नावाचा एक ब्राह्मण चिंचवडहून देहू येथे स्थायिक झाला होता देहूच्या पीलशेट्टी नावाच्या एका गृहस्थाने मठ वगैरे बाधण्यासाठी आपल्या शेतातील भिवमगा नावाचा एक भाग मबाजी गोसाव्यास दिला मबाजीने त्यावर फुलझाडे वगैरे लावून एक छोटासा बगीचा तयार केला लोकाना मत्र वगैरे देऊन मबाजी थोडाफार गब्बरशाही वगीत असे त्याची शिष्यशाखाही मोठी होती, परंतु तुकाराम महाराजाचा भजनकीर्तनाचा संप्रदाय वाढला तेव्हा सर्व लोकाची गर्दी तुकोबाच्या भोवती होत राहिली मबाजीस या गोष्टीचे वैषम्य वाटले तो मनातून तुकोबाचा द्वेष करू लागला हा प्रकार व्हापला एक निमित्त सापडले तुकोबाच्या मासऱ्यानी, अमाजी मुळ्ये यानी त्याना एक म्हैस घेऊन दिली ही म्हैस एकदा कुंपण ओलांडून मबाजीच्या परड्यात शिरली तिने झाडाची थोडी नामधूपही केली अर्थातच मबाजीला फार राग आला,त्याने तुकोबाना अपशब्द बोलायला सुरुवात केली परंतु तुकोबा शान राहिले पण मबाजीचा स्वभाव पालटला नाही त्याने एकादशीस लोक विठ्ठलमदिरात येतील व आपल्या परड्यास उपद्रव होईल या भीतीने प्रदक्षिणेच्या वाटेवर काटेरी झुडुप घालून अडथळा निर्माण केला भक्ताना प्रदक्षिणा घालताना त्रास होऊ नये म्हणून १ तुम्ही