भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 206, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 206

१७२ सार्थ तुकारामगाथा तुकोबांनी हे काटेरी कुंपण वाढून टाकले हे काम होत असतानाच मबाजी संतापून धावतच तेथे आला कुंपणाचीच एक काटेरी काठी उपटून तिने तुकोबास मारहाण करण्यास त्याने प्रारंभ केला एक काठी वापरून निरुपयोगी झाली, की तो दुसरी घेई अशा दहा काठ्या झाल्या तरी तुकोबांची शांती ढळली नाही तुकोबांना वाटले, देव आपल्या क्षमावृत्तीची परीक्षाच पाहात आहे या गबाळावर रागवावे हे त्याच्या मनात येईच ना इतर भक्त मंडळींनी व अवलीने अथवा जिजाईने हळूवार हाताने त्यांच्या अंगात रुतलेले काटे काढले एकादशीस तुकोबांचे कीर्तन सुरू झाले मबाजी कीर्तनाला आला नव्हता तुकोबा स्वतः त्याच्या घरी गेले व त्याची त्यांनी क्षमा मागितली आपणास मार देताना त्याला काही घाम तर फार झाला नाही ना ? अशी त्यांनी चौकशी केली । पुढे मबाजीबुवा सजिर झाला व कीर्तनास जाऊ लागला

३६० पुत्राची वारता । शुभ ऐके जेवीं माता ॥ १ ॥ तैसे राहो माझें मन । गाता ऐकतां हरिगुण ॥ २ ॥ नादें लुब्ध जाला मृग । देह विसरला अंग ॥ ३ ॥ तुका म्हणे पाहे । कासवीचे पिले माये ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वारता-बातमी अर्थ - दूर गेलेल्या मुलाची शुभ वार्ता ऐकून ज्याप्रमाणे आईस आनंद होतो, १ त्याचप्रमाणे या ईश्वरीचे गुण गाऊन, ऐकून माझ्या मनास आनंद होत असतो २ पारध्याच्या गाण्यास जसे हरिण लुब्ध होते व देहभान विसरून जाते तशीच अवस्था माझी झाली आहे ३ मोठ्या प्रेमाने कासवीची पिले आपल्या आईकडे पाहात असतात त्याप्रमाणे देवा, माझे लक्ष तुझ्याकडेच लागून राहिले आहे आईच्या दृष्टीवर पिल्लांचे पोषण होते असा कासवीच्या बाबतीत संकेत आहे ४

३६१ ध्यानीं योगिराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाठीं तयाचिया ॥ १ ॥ तान भुक त्याचे राखे शीत उष्ण । झाले उदासीन देहभाव ॥ २ ॥ कोण सखें तया आणीक सोयरें । असे त्या दुसरें हरीविण ॥ ३ ॥ कोण सुख त्याच्या जीवासी आनंद । नाहीं राज्यमद घडी तया ॥ ४ ॥ तुका म्हणे विष अमृता समान । कृपा नारायण करिता होय ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कपाटीं-डोंगराच्या गुहेत, राज्यमद-राज्याचा लोभ, घडी-क्षणभर अर्थ - जे लोक सर्वसंगपरित्याग करून, ध्यानस्थ होऊन डोंगराच्या गुहेत जाऊन बसले त्या योगीराजाच्या पाठोपाठ देव त्याच्या संरक्षणासाठी नेहमी असतो १ त्याची तहान, भूक, त्याचा शीतोष्णापासूनचा त्रास यांची काळजी तोच घेत असतो कारण हे योगिराज किंवा विरक्त पुरुष देहाविषयी नेहमीच उदासीन असतात २ त्यांना या श्रीहरीखेरीज त्याची चिंता पाहणारे दुसरे सखेसोयरे कोण आहेत ? ३ त्या रानावनात त्याच्या जीवास कसले सुख असते ? त्यांच्या मनात दुसरा कसला आनंद असतो ? एक क्षणभर देखील राज्यसुखाचा लोभ त्यांना वाटत नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा महात्म्यांना विष आणि अमृत याही गोष्टी सारखीच वाटते त्या नारायणाच्या कृपेमुळे सर्वत्र समभाव निर्माण होतो ५

३६२ न व्हावे तें जालें देखियेले पाय । आता फिरूं काय मागें देवा ॥ १ ॥ बहु दिस होतौं करीत हे आस । तें आले सायासे फळ आजि ॥ २ ॥ कोठवरि जिणे संसाराच्या आशा । उगवो हा फासा येथूनिया ॥ ३ ॥ वृक्षालीं तयाचा मूळ ना भारग । लागे तो लाग सांडूनिया ॥ ४ ॥