सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 207, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १७३ पुढें उल्लंघितां दुःखाचें डोंगर । नाहीं अंतपार गर्भवासा ॥ ५ ॥ तुका म्हणे कास धरीन पीतांबरों । तूं भवसागरीं तारूं देवा ॥ ६ ॥ शब्दार्थ व टोपा :- आस-इच्छा, सायासे-प्रयत्नाने, फांसा-पाश, उगवो-सुटावा, लाग-लाभ, तारू-नाव अर्थः- देवा जे सहजासहजी घडणार नाही ते आज घडले की रे. मी आज तुझे पवित्र चरण पाहिले. आता काय या थोर लाभापासून मी मागे फिरू ? १ पुष्कळ दिवस झाले, मी हीच इच्छा करीत होतो. ते फळ तुझ्या चरणदर्शनाने मोठ्या प्रयत्नाने माझ्या हातात आले. २ या संसाराच्या आशेत राहून देवा, कुठवर जगावे ? आता या श्रीविठ्ठलाच्या चरणामुळे संसाराच्या पाशातून मी सुटावे. ३ असला हा विठ्ठलप्राप्तीचा लाभ सोडून देऊन जे संसार- सागरात बुडून गेले त्यांचा काहीही ठावठिकाणा सापडत नाही. ४ जर तुझी संगत मिळाली नाही तर देवा, पुढे दुःखाचे डोंगरच्या डोंगर ओलांडताना पुनः पुनः गर्भवासाचे जे दुःख भोगावे लागते त्यास अंत नसतो. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, म्हणून मी तुमच्या पीतांबराची कास धरूनच उभा राहीन. कारण तूच या भवसागरातील माझी नाव आहेस विठ्ठला. ६ ३६३ वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नास न लगे कांहीं ॥ १ ॥ तया पुंडलिकाने केला उपकार । फेडावया १ भार पृथीवीचा ॥ २ ॥ तुका म्हणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टोपा - तपाचे तपश्चर्येचे, सायास-कष्ट. अर्थ - त्या वैकुंठास जाण्यासाठी माणसांस तपश्चर्या करून फार मोठमोठे प्रयत्न करावे लागतात प्रसंगी जीवाचा नाशही करावा लागतो. १ परंतु तो पुंडलीक महामुनी किती थोर पाहा. त्याने मोठाच उपकार पृथ्वीवरील भार हलका करण्यासाठी केला आहे. २ कारण त्याने भूवैकुंठ पंढरपूर येथे विठ्ठलाला उभे करून अतिशय सोपी व सुलभ अशी पायवाट निर्माण केली आहे; असे तुकाराम महाराज म्हणतात. ३ ३६४ शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥ १ ॥ येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ २ ॥ करितो होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥ ३ ॥ तुका म्हणे घडी । साधिलिया एक थोडी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गाढे-मोठे, लंडीपणा भित्रेपण, घडी-वेळ अर्थ :- लोकहो, शोकाने शोकच फार वाढतो म्हणून हिंमत धरून मोठे धैर्य वाढवा. १ या नरजन्मास येऊन काय न करावे ? तर बंधूंनो येथे भित्रेपणा मात्र खोटा आहे. २ परमार्थाच्या विचाराविषयी अथवा ईश्वर- भक्तित्विषयी सर्व जण होय होय असेच म्हणतात, पण शेवटी प्रत्यक्ष मदत करण्याचा प्रसंग आला की कोणीच साह्य करीत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरभक्ती करण्याची नरजन्मातील ही एक वेळ साधली तर पुष्कळच लाभ आहे ४ ३६५ म्हणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जियैली ॥ १ ॥ माझिया गोतें हैं बसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ २ ॥ करूनि ओळखी दिली एकसरें । न देखों दुसरे विपमासी ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं काळापाशी गोवा । स्थिति मति देवा वांचूनियां ॥ ४ ॥
- शब्दार्थ व टीपा :- वर्जियैली-मोडली, गोतें नातेवाईकानी, गोवा-आठवणूक १ हरावया