सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 190, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१५६ सार्थ तुकारामगाथा नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वर्म-रहस्य, भावें-तुजविषयीच्या भक्तिभावामुळे, कासवाचे परी-आपले सर्व अवयव पोटाशी धरून कासव ज्याप्रमाणे असते तसे. अर्थ :- देवा, तुझे रहस्य मला माझा जो तुजविषयी भक्तिभाव आहे त्यामुळे सापडले आहे. १ कासवाप्रमाणे मी सर्व अवयव आत धरून तुझे रूप मनात साठवून ठेवीन. २ तुझ्या रूपाची व माझी तुटातूट होऊ देणार नाही. अगदी दृष्टीस दृष्टी मिळवून राहीन. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमचे चिंतन हीच खरी तुमची सेवा आहे. ४ ३२५ गहूं एक जाती । परी ह्या पाधाणी नासिती ॥ १ ॥ वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ २ ॥ कमाईच्या सारें । जाति दाविती प्रकार ॥ ३ ॥ तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-पाधाणी-आडाणी बायका, कमाई-मेहनत अर्थ :-एकाच गव्हाचे पुष्कळ प्रकार होऊ शकतात; पण अडाणी बायकांना त्याचे मर्म न समजल्यामुळे त्या त्यांचा नाश करतात. १ यासाठी जे काही थोडेफार वर्म असेल ते जाणून घेणे हेच मुख्य आहे. २ जितकी मेहनत चांगली होईल तितके ते प्रकार चांगले होतील हे खरेच आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, खरे मोल गुणाचे आहे, इतर सर्व बोल व्यर्थ होत. ४ ३२६ पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांचीं नावें ॥ १ ॥ नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठीं । २ ॥ विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥ ३ ॥ तुका म्हणे पापें । जाती संतांचिया जपें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- ठाव-ठिकाण अर्थ :-संतसज्जनाची नावे घेऊन आपण पुण्यवंत व्हावे. १ यासाठीच माझी वाणी त्याची नावे घेण्यास टाळाटाळ करीत नाही. फुकट असा हा महालाभ होतो. २ या साधुसंतांच्या पायांवरील भक्तिभाव हेच एक विश्रांतीचे ठिकाण मला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या संतांच्या दर्शनाने सर्व पापे नाहीशी होतात. ४ ३२७ देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया १ ॥ १ ॥ दोहींकडे दोन्ही घाहातील वाटा । करितील सांटा आपुलाला ॥ २ ॥ दाखविले परी नाहीं वर्जिजेतां । आला तो तो चित्ता भाग भरा ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळबीजमात्र ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-सांटा-संग्रह. अर्थ :- देवाची संगत असेल तर आपणास देव होता येईल. आणि जगांतील सामान्य लोकांच्या सहवासाने आपले पतन होईल. १ या दोन वाटा दोन निरनिराळ्या दिशांनी जाणाऱ्या आहेत; व त्या आपापल्या कर्माचा संग्रह करणाऱ्या आहेत. २ वरील दोन वाटा मी दाखविल्या, पण आता जो भाग टाळता न येण्यासारखा आहे तो भाग चित्तात धरून आपले हित साधा. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गाची प्रीती मूळची अंगातच हवी; उपदेशाचे निमित्त केवळ मूळ बीजाप्रमाणे समजावे. ४ १ देवांचिया.