सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 191, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १५७ ३२८ शोधिसील मूळें । त्याचें करोसी वाटोळें ॥ १ ॥ ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु जाले तट ॥ २ ॥ लौकिका बाहेरी । घाली रोंखीं जया घरीं१ ॥ ३ ॥ तुका म्हणें गुण । तुझा लागलिया शून्य ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- बोभाट-गवगवा, तट-तन्हा, शून्य-मुक्तता. अर्थ :- देवा, ज्यांची मुळे तुम्ही शोधता त्याचे वाटोळे करता. १ असा तुमच्या विषयीचा गवगवा सर्व साधुसंतांनी केलेला आहे. तुमच्या अशा तऱ्हा किती सांगाव्यात ? २ तुम्ही ज्याच्यावर रोखून धरता त्यास तुम्ही सर्व लौकिकाच्या बाहेर घालून देता. ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुझा एकदा गुण लागला की त्या माणसांस लौकिकापासून मुक्तता मिळते. त्याचे लौकिक जीवन शून्य होते. ४ ३२९ वैद्य वाचविती जीवा । तरी कोण ध्यांतें देवा ॥ १ ॥ काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ २ ॥ अंगीं दैवत संचरे । मग तेथें काय उरे ॥ ३ ॥ नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ॥ ४ ॥ जाणे हा विचार । स्वामी तुक्याचा दातार ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- परी-प्रकार, उरी-शिल्लक. अर्थ :- वैद्याच्या औषधाने जर माणसाचे रोग नष्ट होत असतील तर मग देवाच्या ध्यानाची गरज काय ? १ प्रारब्धाने जे शिल्लक ठेविले असेल तसे होईल असे असले, तरी खरोखर काय घडेल ते समजत नाही २ एकदा अंगात दैवत संचारले म्हणजे काही तेथे उरत नाही ३ जर नवसासायासाने मुलगे-मुलगी होणार असतील तर मग नवरा करण्याची गरजच काय आहे ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व बाबींचा विचार तुक्याचा स्वामी जाणतो; तुकोबाच्या काही नीट ध्यानात येत नाही ५ ३३० मार्गीं बहुत । याचि गेले साधुसंत ॥ १ ॥ नका जाऊं आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ २ ॥ चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥ ३ ॥ झळकती पताका । गरुड टके म्हणे तुका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- धोपटा-सरळ, टके-टोंकास अर्थ :- ईश्वराचे भजनपूजन, नामस्मरण याच मार्गाने पुष्कळ साधुसंत गेले आहेत आजपर्यंत. १ उगाच भलत्यासलत्या आडमार्गाने जाऊ नका अशी गर्जना सर्व पुराणे करीत आहेत. २ हा भक्तिमार्ग अनेकांनी चोखाळून स्वच्छ केलेला असल्याने याच्या वाटा कुणास विचाराव्या लागत नाहीत. धोपट मार्गाने जाता येते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्याच्या पताका झळकत असून त्यांच्या अग्रभागावर गरुडाचें वास्तव्य आहे. ४ ३३१ पातिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ जवळां । सन्निध२ पंढरीये ॥ १ ॥ पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ २ ॥ १ घरीं. २ पंढरीये सन्निध.