भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 196, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 196

१६२ सार्थ तुकारामगाथा मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवलें आजि ॥ १ ॥ बाळ चांगलें वो । बाळ चांगलें वो । म्हणतां चांगलें । वेळ लागे तया बोलें । जीवापरीत.तें वाल्हें । मज आवडतें ॥ २ ॥ मिळोनियां याति । येती नारी कुमारी बहुती । नाहीं आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं । विसरल्या घरें । तान्हीं पाठीं लेकुरें । धाक सांडोनियां पेरें । तान भूक नाहीं ॥ ३ ॥ एकी असतील घरीं । चित्त तयापासीं परी । वेगों करोनि वोसरी । तेथें जाऊं पाहे । लाज सांडियेली बोज । नाहीं फजितीचें काज । सुख सांडोनियां सेज । तेथें धाव घाली ॥ ४ ॥ वेधियेल्‍या बाळा । नर नारी या सकळा । बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या । कुमार कुमारी । नाभाव हा शरीरीं । दृष्टी न फिरे माघारी । तया देखतां हे ॥ ५ ॥ वैरभाव नाहीं । आप पर कोर्णी कांहीं । शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं । तुका म्हणे सुखी । केलीं आपणांसारिखीं । स्वामी माझा कवतुकें । बाळवेषें खेळे ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा :-मधुरेनघारी-मथुरेमध्ये, कडदोरा-करदोता, वोडवले-प्राप्त झाले, वाल्हे-प्रिय, वोसरी-कमी करून, योज-चिंता, काळजी.

अर्थ :-हा श्रीकृष्ण लहानपणी मथुरेमध्ये खेळत होता. या बालकृष्णाच्या पायांत घागऱ्या व गळ्यात सरी, कमरेस करदोता व दंडांत वाक्या असे अनेक दागिने शोभून दिसतात. या शोभिवंत मुलाचे मुख पाहताच आईचा आनंद तिच्या मनात मावत नाही. माझे भाग्य व पूर्वसंचित चांगले असल्यामुळे मी हे सुख प्राप्त करून धन्य होत आहे असे ती म्हणाली. १ हे माझे मूल फार चांगले आहे हो. इतके चांगले की ते चांगले म्हणण्यासही वेळ पुरत नाही हे बाळ मला माझ्या जिवापेक्षाही आवडते. २ या माझ्या लाडक्या मुलास पाहण्यासाठी गावातील सर्व जातींच्या बायका व मुली पुष्कळ येतात. त्यांना देहभावाचीही स्मृती नसते. श्रीकृष्णाच्या प्रेमापुढे त्या आपली घरे व तान्ही मुले यांनाही विसरल्या. त्यांना घरांतील वडील माणसांचा धाकच उरला नाही. त्यांची तहानभूकही हरपून गेली. ३ काही गोपी आपापल्या घरी असल्या तरी त्यांचे चित्त मात्र या बालकृष्णाकडेच असते. त्याला पाहण्यासाठी घरची कामे लगबगीने करून त्या त्याच्याकडे जाण्याची इच्छा करतात. त्यांना आता लौकिक जीवनाची लाज नाही की शरीराचीहि चिंता उरलेली दिसत नाही. घरची सुखशय्या सोडून त्या श्रीकृष्णास पाहण्यासाठी धावतात. ४ या माझ्या बाळास पाहण्यासाठी गोकुळातील सर्व स्त्री-पुरुष नादावलेले आहेत. त्या सर्व स्त्रिया याच मुलास खेळवू लागल्या. आपण कुमार की कुमारी हा भावही त्यांच्या मनांत उरला नाही. या श्रीकृष्णास पाहताच त्यांची दृष्टी