भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 194, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 194

अर्थ :- कित्येक लोकांना काही कळतच नाही म्हणून ते फसतात; तर दुसऱ्या कित्येकांना आपणांस फार कळते या ज्ञानाच्या अहंकाराने ते पछाडलेले असते भूल पडलेली असते १ मुक्याला बोलता येत नाही म्हणून त्याचा उपयोग होत नाही, ज्याला बोलता येते तो तर वाचाळ- होतो, तेही काही चांगले नव्हे २ दोन्ही बाजूनी अड चणच असते एकाकडे आड व दुसरीकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झालेली असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आमचे कर्मच आम्हांस तुझे रहस्य समज देत नाही असे दिसते ४

३३४ म्हणवितो दास । मज' एवढीं च आस ॥ १ ॥ परी तें अगीं नाहीं वर्म । करीं आपुला तूं धर्म ॥ २ ॥ बडबडितो तोंडें । रितें भावेंविण धेंडें ॥ ३ ॥ तुका म्हणे खरा । दावू जाणतो पसारा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टोपा - आस-इच्छा, धेंडे-अर्धवट मनुष्य अर्थ - देवा, मी तुमचा दास आहे असे मी सारखे म्हणत असतो, आणि मलासुद्धा ही एवढी एकच आशा आहे १ पण देवा, दास्य भक्तीचे जे मर्म आहे ते मला माहीत आहे असे नाही तरी तू तुला तुझ्या धर्मा- प्रमाणे जे पतितपावनाचे कार्य करायला हवेस ते मात्र कर २ मी आपल्या तोंडाने नुसतीच बडबड करीत असतो, पण हे माझे बोलणे अर्धवट माणसाच्या प्रमाणे भावाशिवाय रिकामेच असते ३ तुकाराम महाराज म्हणतात खरंघर साधुत्वाचा पसारा मात्र मी चांगलाच दाखवू शकतो ४

३३५ पूजा समाधाने । अतिशय वाढें' सोंग ॥ १ ॥ हे तो जाणा तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥ २ ॥ पाहिजे ते केले । सहज प्रसंगीं घडले ॥ ३ ॥ तुका म्हणे माथा । पायीं ठेवीं तुम्हा संता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अतिशय-हव्यास, नीत-नीती अर्थ - मनाचे समाधान हीच खरी परमेश्वराची पूजा होय, किंवा समाधानाने परमेश्वराची पूजा करावी उगाच बाह्य फापटपसाऱ्याची हौस मात्र नसावी त्यामुळे त्रास मात्र वाढतो १ सत लोकांहो, हे तुम्ही जाणताच अशी ही सांगली नीती मी तुम्हास सांगितली आहे २ जे सहजासहजी घडण्यासारखे आहे ते तुम्ही केले पाहिजे ३ तुकाराम महाराज म्हणतात तुम्हां संतांच्या पायावर मी माझा माथा ठेविला आहे ४

३३६ स्वप्नींचिया गोष्टी । मज धरिले होतें वेठी । जालियां सेवटीं । जाले लटिकें सकळ ॥ १ ॥ वाया भाकिली करुणा । मूळ पावावया सिणा । राव रंक राणा । कैंचे स्थानावरि आहे ॥ २ ॥ सोसिले ते अंगे । खरे होते नव्हता जागें । अनुभव ही सांगें । दुखें डोळे उघडीले ॥ ३ ॥ तुका म्हणे संतीं । सावचित केले अतो । नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वेठी-बळजबरीने कामास लावण सिणा-त्रास, राव-श्रीमंत रंक-दरिद्री, सावचित- सावधान चित्त टाळी बसणे-तोंड बंद होणे १ एवढीच मज आस २ वाट

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 194, कुल 611 में से · BharatKosha