सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 200, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१६६ सार्थ तुकारामगाथा ३४५ ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्याच्या दर्शनें तुटे भवबंधु । जे का सच्चिदानंदीं नित्यानंदु । जे का मोक्षसिद्धी तीर्थ वंदू रे ॥ १ ॥ भाव सर्वकारण मूळ बहु । सदा समबुद्धि नास्तिवयभेदु । भूतकृपा मोडीं द्वेषकडु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बघू रे ॥ २ ॥ मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं । लघुत्व सर्वभावे अंगीकारीं । साडीमाडी मीतूपण ऐसी थोरी रे ॥ ३ ॥ अर्थकामचाड नाहीं चित्ता' । मानामान मोह माया मिथ्या । वर्तें समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥ ४ ॥ मनीं दृढ धरीं विश्वास । नाही साडीमाडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - भवबंधु-संसारपाश, साडीमाडी-मोडणेतोडणे याचा व्याप, सायास-प्रयत्न अर्थ - ज्याच्या दर्शनाने संसारपाशातून मनुष्य मुक्त होतो असे साधुसंत पुढे दिलेल्या कारणांमुळे भेटतात ते नेहमीच त्या सच्चिदानंदास वंदन करणारे असतात त्या नित्यानंदस्वरूपात असणाऱ्या साधुसंतांचा सहवास मोक्षसिद्धीच्या तीर्थाप्रमाणेच असतो त्यांना वंदन करुं या. १ यांच्या भेटीचे एक प्रमुख व सबळ कारण म्हणजे आपल्या मनात भक्तिभाव हवा नास्तिक्यबुद्धीचा नाश व्हावयास हवा सर्व प्राणिमात्रावर दया असावी मनातील द्वेषाचा कड मोडून टाकावा शत्रू, मित्र, पुत्र, वधू यांच्यावर समत्वानेच प्रेम करावे २ आपले मन, आपली बुद्धी, वाणी, शरीर यांची, तू शुद्धी कर सर्वत्र परमेश्वराचेच रूप समजून त्याला नमस्कार कर सर्व बाजूंनी आपण कमी आहोत अशी भावना मनात धर मी मोठा, तू लहान अशा भेदाचा किंवा अशा थोरवीचा त्याग कर ३ ज्याच्या मनात धनलोभ मुळीच नाही, ज्यास मानापमान नाही, मोह नाही, जो नेहमी समाधानानेच वागत असतो, जो आपल्या ज्ञानाचा गर्व करीत नाही, त्यासच अवचितपणे साधुसंत भेटतात ४ तू मनात ईश्वरावर दृढ विश्वास ठेव मग इतर खटपट करण्याचा मुळी तुला शीण नको तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्या अंगी असणाऱ्या ज्ञानास विटला आहे त्यास नित्य साधुपुरुषांचे दर्शन होत असते ५ ३४६ भवसागर तरता। का रे करीतास चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥ १ ॥ त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं । खांदा वाहे आपुल्या ॥ २ ॥ सुखें करावा संसार । परि न सडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥ ३ ॥ भुक्तिमुक्तीची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता । तुका म्हणे दाता । पाडुरंग वोळंगिल्या ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पैल-पलीकडे, नेघे-घेई नाही चोजवीत-शोधीत, वोळंगिल्या-प्रसन्न झाल्यावर अर्थ - हा संसारसागर तरून जाण्यास एवढी चिंता तुम्ही कसली करता ? पलीकडच्या तीरावर कटीवर हात ठेवून प्रत्यक्ष पांडुरंग दाता, हवे ते देणारा उभा आहे ना १ त्याच्या पायाशी एकदा मिठी घाला तो विश्वचालक परमेश्वर काहीही मोल मागणार नाही केवळ तुमची भक्ती पाहून तुम्हांस खांद्यावर घेऊन संसार सागरातून तुम्हास वाचवील २ तुम्ही सुखाने आपला संसार करावा पण आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी १ चित्ता