सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 209, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १७५ अर्थ. - सद्गुरुराजा, मजवर तुम्ही फार मोठी कृपा केलीत परंतु माझ्याकडून तुमची म्हणावी अशी काही सेवा झाली नाही १ मी गंगेस स्नानासाठी जात असतानाच त्यांनी मला वाटेत पकडले व माझ्या मस्तकावर आपला अभय हात ठेविला २ त्यांनी भोजनासाठी माझ्याजवळ पावशेर तूप मागितले परंतु मला त्याचा विसर पडला, हे सर्व स्वप्नात घडले ३ सद्गुरूच्या या ईश्वराच्या सेवेत काही अंतर पडले की काय न जाणो, म्हणून त्वरा करून सद्गुरू मला सोडून दूर निघून गेले ४ राघव चैतन्य, केशव चैतन्य अशी आपल्या परंपरेची खूण त्यांनी मला सांगितली ५ आणि स्वतःचे नाव बाबाजी चैतन्य असे सांगून त्यांनी मला 'राम कृष्ण हरि' हा सोपा मंत्र दिला ६ या दिवशी माघ शुद्ध दशमी, गुरुवार, हा पुण्यदिवस होता तो पाहूनच त्यांनी माझा स्वीकार केला असे तुकाराम महाराज म्हणतात ७ विवरण - मर्तपर्य तुकाराम महाराज याना सद्गुरूनाथांची कृपा झाली, त्यांनी त्यांचा स्वीकार केला, असा अतिशय महत्त्वाचा प्रसंग या व या पुढच्या तीन अभंगात त्यांनीच स्वतः वर्णन केलेला असल्यामुळे या अभंगांना सांप्रदायिकतेत अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे वैराग्य पूर्णपणे अंगी बाणल्यानंतर तुकोबांचे पूर्ण लक्ष ईश्वराकडेच लागून राहिले होते वृक्षवल्लीच्या सहवासात व वनचरांच्या संगतीत ते आपल्याशीच वादविवाद करून रमत होते आपली बुद्धी स्थिर करून ह्याने आपल्या मनास पाडुरंगचरणी दृढ केले होते पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्यांचे मन तळमळत असे त्याच्या चित्तानी तळमळ होत असे पण परमार्थाच्या मार्गावरही त्याची पावले चित्तशुद्धीच्या मार्गाने झपाझप अशी पडत होती रोज नवीन जागृति त्यांना येई 'तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दीस जागृतीचा' या शब्दात त्यांनी स्वतःच्या आत्मविकासाचे मर्म सांगितले आहे त्यांनी संसार व व्यवहार जवळ जवळ सोडलेलाच होता एकान्तात ग्रंथांचे अध्ययन व ईश्वराचे चिंतन त्यांचे सुरू होते अभ्यासगाभनेत मग्न असणाऱ्या तुकोबाना मग एके दिवशी सद्गुरू श्रीबाबाजी चैतन्य यांचा स्वप्नात उपदेश झाला कारण मद्गुरूच्या स्वीकाराखेरीज परमार्थ- ज्ञान विटे पडते जगू ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, 'शब्दात आलोडिले । अथवा योगादिक जे अभ्यासिले । तें तेंचि म्हणो ये आपुले । जे सानुकूळ श्रीगुरू ॥' श्रीगुरूची अनुकूलता लाभली वरच सर्व साधनाची वा परमार्थप्राप्तीची सार्थकता हाय असा हा श्रीगुरूचा महिमा वर्णन करताना अत्यंत बहारदार पद्धतीने श्रीज्ञानेश्वरांनी तेराव्या अध्यायात 'आचार्योपासनम्' या शब्दावर जे अतिशय विस्तृत व जिव्हाळ्याचे भाष्य केले आहे त्याला इतरत्र जोड नाही याच भूमीस अनुसरून तुकोबांना चैतन्य संप्रदायातील बाबाजी महाराज याचा उपदेश स्वप्नात झाला सद्गुरूंनी तुकोबांचेवर पूर्ण कृपा केली त्यांना रामकृष्ण हरि हा मंत्र मिळाला हा उपदेश तुकारामांना स्वप्नात इंद्रायणीच्या गंगेच्या काठी स्नानास जात असताना झाला श्रीगुरूंनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून कृतार्थ केले सद्गुरुनाथांनी त्यांना भोजनासाठी पावशेर तूप मागितले, पण विस्मृतीमुळे तुकोबांच्या हातून ते मिळाले नाही आपल्या हातून ते मिळाले नाही हाच आपल्या हातून अंतर पडल्याचा प्रसंग घडला म्हणून सद्गुरूंनी निघून जाण्याची घाई केली की काय ? अशी खूटपूट तुकोबांच्या मनास लागली या बाबाजी चैतन्यांनी राघव चैतन्य व केशव चैतन्य अशी आपली परंपरा निवेदन केली हा दिवस माघ शुद्ध दशमी गुरुवार हा होता इतका सर्व तपशील तुकोबांच्या गुरुप्राप्तीसबंधीचा महत्त्वाचा आहे तुकारामांना हा मंत्रोपदेश देणारे सद्गुरुनाथ कोण ? ते त्यांना केव्हा, कुठे भेटले? त्यांनी जाण्याची त्वरा का केली ? त्यांनी पावशेर तूप का मागितले ? वगैरे महत्त्वाचे प्रश्न आहेत तुकोबाच्या गुरुपरंपरेचा शोध घेण्याचे महत्त्वाचे कार्य आजपर्यंत अनेक संशोधकांनी विशेषत श्री वा सी बेंद्रे यांच्यासारख्या अभ्यासकाना केले आहे श्री बेंद्रे यांच्या मते हा गुरुपदेश तुकोबाना ओतुराम 'गंगाघाट' नावाच्या वाटेने तुकोबा असताना झाला सद्गुरूच्या स्पर्शाने तुकोबाना भावावस्था प्राप्त झाली असावी असाही स्वप्नाचा अथ त्यांनी केलेला आहे या भावानंदात तुकोबा पूर्णपणे भग्न झाले असल्यामुळे खूप वेळ झाला तरी त्यांना जाग आली नाही एवढ्यात बाबाजी चैतन्य निघून गेले मग सावध झाल्यानंतर तूप द्यायचे विसरून राहून गेले म्हणून तुकारामबुवाना वाईट वाटले साधू, सन्यासी, वैरागी यांना तूप देण्याची प्रथा असे तुकोबांचा हा गुरुपदेश इंग्रजी कालगणनेप्रमाणे २३ जानेवारी १६४० या दिवशी झाला असल्याचा शाध श्री बेंद्रे यांचा आहे