भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 210, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 210

१७६ सार्थ तुकारामगाथा चैतन्य संप्रदायाच्या परंपरेचा शोधही आज मोठ्या प्रमाणावर झालेला आहे या पंथाचा बंगालमधील गौरंग प्रभू किंवा चैतन्य प्रभू यांच्या पंथाशी काही संबंध आहे की काय ? असा एक तर्क संशोधकांच्या मनात नेहमी असतो, पण तो तसा नाही असे मानण्याकडे कल काही आधुनिक अभ्यासकांचा आहे राघव चैतन्याचे बालपण गिरनारच्या भोवती गेले त्याचा संचार महाराष्ट्र, उत्तर हिंदुस्थान, तेलंगण इत्यादी भागात नेहमी असे राघव चैतन्याचे मूळचे नाव रघुनाथ गिरिनारच्या एका भागात 'शौर्यकुळात' याचा जन्म झाला. वडिलांच्या आज्ञेवरून रघुनाथाने श्रीदत्ताची उपासना केली दत्ताच्या अनुग्रहानंतर त्याच्याच प्रेरणेवरून हे जुन्नर- जवळच्या ओतूरच्या डोंगरात व तपोवनात अनुष्ठान करू लागले पुष्पवती नदीच्या तीरावरील शिवाची मडक उपासना यांनी केली शेवटी व्यासांनी याना दर्शन दिले व याचे नाव राघव चैतन्य असे ठेऊन 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र दिला दत्तानेही चतुःश्लोकी भागवताची शिकवण देऊन संप्रदाय वाढविण्यास सुचविले पुढे लेण्याद्रीसारख्या ठिकाणी गहून यांनी आपली योगसाधना वाढविली याचा शिष्य केशव भट राजर्षी याच्या संगतीने याचा मुसलमानी राजकर्त्यां- शीही परिचय वाढला या नव्या सबंधामुळे याची कीर्ती कल्याणी, गुलबर्गा या भागातही खूप वाढली आळंदचे पडित व जोशी याचे अनुयायी झाले प्रसिद्ध राजर्षी केशवभट यास सन १५४८-४९ मध्ये दीक्षा देऊन यानी त्याचे नाव केशव चैतन्य असे ठेविले केशव चैतन्याबरोबर यानी तीर्थयात्राही केली सन १५६२ च्या सुमारास राघव चैतन्य यानी जिवंत समाधी घेतली याचा जन्म सन १४६० नंतरचा असावा याना मुसलमानी परंपरेत हजरत लाडले मशायकही ऊर्फ राघव दराज आळंद शरीफ या नावाने ओळखत असत राघव चैतन्यांनी संस्कृत व मराठी भाषेत अनेक ग्रंथ लिहिले ब्रह्मस्वरूप, मायाविचार, ईशम्तवन, योगनिद्रा, सनातन धर्मविचार, इंद्रियदमन, त्रिगुणलीला, बुद्धि- विकास ही त्याच्या काव्यग्रंथाची नावे होत केशव चैतन्य हे या राघव चैतन्याचे प्रमुख शिष्य होत यांचा जन्म राजर्षी कुलात झाला हा माळ राजकारणी व शूर असून यास राघव चैतन्याच्या सहवासात वैराग्याचे महत्त्व पटले राघव चैतन्याकडून गुरुदीक्षा मिळाल्यानंतर याचे नाव केशव चैतन्य म्हणून प्रसिद्ध झाले राघव चैतन्य समा धन्य झाल्यानंतर केशव चैतन्य काही दिवस आळंद, मान्‍यव्हाळ, ओतूर येथे गहात बसत ओतूरास गयावाटेवर याचा मठ असे शिष्यगणही याना मोठ्या प्रमाणावर लाभला होता केशव चैतन्यानी सन १५७१ मध्ये समाधी घेतली याचाही परमार्थातील अधिकार मोठा असून यानी भक्तिप्रवाह, वैकुंठपद, बामनांगपंदेह, गीताभागवतसार, परमार्थ विचार असे ग्रंथ लिहिले होते बाबाजी चैतन्य हे या केशव चैतन्याचे शिष्य होत हे ब्रह्मचारी असून यानी राघव चैतन्याच्या समाधीची सेवा बरीच वर्षे केली होती याचा मान्‍यव्हाळीसही एक मठ असे याची उपासना भक्तीप्रधान असून याची कीर्ती महाराष्ट्रात व तेलंगणात पसरली होती हिंदू मुसलमान असे अनेक शिष्य याना मिळाले याचे गुरू केशव चैतन्य हे हजरत स्वाजा बदे नवाज व हे हजर शेख गाहाबुद्दीनसाहेब मान्‍यव्हाळ अशा नावानी प्रसिद्ध होते ओतुरूसही याचे वास्तव्य असे