भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 211, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 211

सार्थ तुकारामगाथा १७७ पुढच्या अभंगात समाधान व्यक्त केले आहे. वारकरी संप्रदायात या 'राम कृष्ण हरि' मंत्राचे फारच महत्त्व मानले जाते. भजन-कीर्तनास प्रारंभ यानेच होतो यानाचा जप साधक करीत असतात. या सोप्या मंत्राने ईश्वरसर्वांना सहज व सुलभ करून दिला अशी श्रद्धा सांप्रदायिकांची आहे या मंत्राचा उच्चार निवृत्तिनाथ, ज्ञानदेव यांनीही केलेला आहे 'रामकृष्ण माळा नित्य जप करो । तपासी संसारी सुख आहे', 'रामकृष्ण मूर्ती जपा आवृत्ति', 'रामकृष्ण मंत्र जगासी उद्धार' अशा शब्दांत निवृत्तिनाथांनी या मंत्राचे महत्त्व विशद केले आहे ज्ञानेश्वर महाराजांनीही 'रामकृष्ण सणू आम्हां नित्य दिवाळी', 'रामकृष्ण नेम गृह भजनें', 'हें योगियाचे निज जीवन । रामकृष्ण नारायण', 'ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं' या शब्दांतून या प्रसिद्ध मंत्राचा गौरव केलेला आहे 'नाम मंत्र आम्हां हरि रामकृष्ण' असे मुक्ताबाईने म्हटले आहे. 'मंत्रामाजी मंत्र सार । रामकृष्ण हा उच्चार', 'रामकृष्ण हें वाचें उच्चारा । इतुकेचि पुरें आम्हां' इत्यादी चरणांतून नामदेवांनी या मंत्राचे माहात्म्य वर्णन केले आहे पुढे एकनाथतुकारामांनी तर या मंत्राचा उच्चार वारंवार करून भक्तिमार्गाची वाट सर्वसामान्य प्रापंचिकांनाही सुलभ करून दिली 'रामकृष्ण ऐसीं उच्चारोन नामें,' 'रामकृष्ण गानीं गात । टाळ चिपळया वाजवीत', 'रामकृष्ण गोविंद नारायण हरी। केशवा मुरारी पांडुरंगा' अशा अनेक चरणांतून तुकोबांनी या मंत्राचा उच्चार वारंवार केलेला आहे. ३६९ माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुराजा ॥ १ ॥ आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नव्हे गुंपा कांहीं कोठें ॥ २ ॥ जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥ ३ ॥ जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटीं ॥ ४ ॥ तुका म्हणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरू पांडुरंग ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- उपाव-उपाय, गुंपा-गुंतागुत, सांगडी-नौका, तापे-ताफे, पेटीं-नदीतून तरून जाण्याचे साधन. अर्थ :- या सद्गुरुनाथाने माझ्या चित्तातील भाव जाणून मला हा मार्ग उपायाचा म्हणून सांगितला, १ तो असा की हा माझ्या आवडीचा मंत्र सोपा असा 'राम कृष्ण हरि' असा सांगितला. त्यात कसलीही गुंतागुंत नाही. २ या सोप्या मंत्राच्या साहाय्याने अनेक साधुसंत यापूर्वी भवसागर तरून गेले आहेत ३ हा मंत्र सर्वांना सुलभ असा आहे. जाणत्यांना किंवा नेणत्याना आपापल्या आवडीप्रमाणे याचा लाभ घेता येतो. या साधकाना हा मंत्र म्हणजे एक- प्रकारची भवसागर तरून जाणारी नौकाच आहे. भवसागर पार करणारा हा एक ताफाच आहे. भवनदी तरून जाण्यास हे एक महत्त्वाचे साधन आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, या पांडुरंगाने, या कृपेच्या सागराने भव- सागरातून तरून जाणाऱ्या तारूचेच, नावेचेच साहाय्य मला दिले आहे. ५ ३७० घालुनियां भार राहिलों निश्चितीं । निरविले संतीं विठोबासि ॥ १ ॥ लावूनिया हातें कुरवाळिला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ २ ॥ कटीं कर सम चरण साजिरे । राहिला भीवरे तीरीं उभा ॥ ३ ॥ खुंटले सायास अणिक या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥ ४ ॥ तुज वाटे आतां ते करी अनंता । तुका म्हणे संता लाज माझी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- भार-ओझे, निरविले-स्वाधीन केले, सायास-श्रम/ अर्थ :- मी आतां या संतावर माझें ओझे घालून निश्चिन्त झालो आहे या संतांनी मला विठ्ठलाच्या स्वाधीन केले १ या विठ्ठलाने मला जवळ घेऊन आपल्या हाताने माझा माथा कुरवाळिला; व काही चिंता करू तु. गाथा. २३