सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 212, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंनकोस असे मला सागितले. २ या विठ्ठलाचे हात त्याच्या कमरेवर आहेत, त्याची पावले एकसारखी असून अत्यंत सुशोभित अशी आहेत. हा विठ्ठल भिवरा नदीच्या तीरावर आपल्या भक्तासाठी उभा आहे ३ देवा, आता या जीयाकडून दुसरे कुठलेही प्रयत्न होणार नाहीत. केशवा, तुझेच पाय म्हणून मी धरिले आहेत ४ हे अनंता, आता तुला जे वाटेल ते माझ्याविषयी कर. तुकाराम महाराज म्हणतात, या संतांनी मला तुझ्याकडे सोपविले असल्यामुळे माझी लाज त्यांनाच आहे. ५ ३७१ माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार जालो आतां ॥ १ ॥ तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ २ ॥ ठायींचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संतीं ॥ ३ ॥ जीवभाव तुझ्या ठेवियेला पायीं । हेचि आतां नाहीं लाज तुम्हां ॥ ४ ॥ तुका म्हणे संतीं घातला हावाला । न सोडीं विठ्ठला पाय आतां ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- निर्धार-निश्चय, आणिका-दुसऱ्यास, ठायींचा-मूळचाच अर्थ - आता माझ्या मनाचा निश्चय तुम्ही जाणून असा. मी आता माझ्या जियावर उदार झालो आहे १ देवा, आता मी तुझ्याशिवाय कोणाचाच आश्रय धरणार नाही. भीती, लाज, शंका याचा मी कधीच त्याग केला आहे. २ देवा, तु व मी एवद्य असल्यामुळे तुझामाझा सबंध हा मूळचाच आहे; तोच या संतानी विशेषकरून ध्यानात आणून दिला ३ आता मी माझा जीवभाव तुझ्याच पायावर ठेविला आहे पण याची तुला लाज आहे असे कसे दिसत नाही ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता मी संतावर सर्वस्वी विश्वास ठेविल्यामुळे, आता विठ्ठला, त्यांनी मला तुझ्या स्वाधीन केले आहे, मी तुझी पावले आता सोडणार नाही ५ विवरण.- तुकाराम महाराजांचे हे चार अभंग त्याच्या गुरुपदेशाचे म्हणून फारच प्रसिद्ध व महत्वाचे आहेत अनेक महत्त्वाच्या बाबींचा स्पष्ट निर्देश यात आहे आपली गुरुपरंपरा, उपदेशाचा दिवस, गुरुमत्र याचा उल्लेख केल्यानंतर तुकारामबुवानी हा आपला मार्ग अगदी सोपा, फार गुंतागुंत नसलेला असा दाखविलेला आहे घरी असलेली विठ्ठलाची भक्तीच तुकोबांना गुरुपदेशातून मिळाली कृपेचा सागर जो पांडुरग तोच भवसागर तरून जाण्यास नौकेच्या रूपाने मिळाला असा त्याच्या बोलण्यांतील भावार्थ होय याच मार्गांनी पूर्वीचे साधुसंत गेले असल्याचाही उल्लेख 'जाती पुढे एक उतरले पार' या शब्दात आला आहे तोही महत्त्वाचा आहे ज्याचा जसा अधिकार तशी सोय या मार्गात असल्याचीही ग्वाही महत्त्वाची आहे 'उतार सागडी तारे पेटी' याच्या साहाय्याने भवसागर तरून जाण्याचे कार्य ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे व अनुकूलतेप्रमाणे करायचे असते ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे या मार्गांनी चाल करणे 'सडे जे देखिले । ते ध्यानास लाविले । परिग्रही घातले तरियावरी' म्हणजे जे ब्रह्मचारी, संन्यासी वगैरे सडे होते त्यांना योगमार्गाची दीक्षा दाखविली जाते व जे परिग्रही म्हणजे बायकामुले व ससार याचे धनी होत, त्यांना नामाच्या नौकेवर घातले असा खुलासा श्रीज्ञानदेवांनीही केलेला आहे ज्ञानेश्वरीत या साधनाचा समर्पक असा उल्लेख आलेला आहे काही जन 'ऐक्याधिया उतारा' घेऊन पैल तीराला जातात कोणी देवप्रसादिचा सागडी' बरोबर घेऊन निघालेले असतात कोणी 'यजनक्रियेची पेटी । बाधोनि घातली पोटीं' असा अन्वंदेश मार्गास झालेले असतात, तर कोणी 'आत्मनिवेदनाचे तरांडे' (ताफे) गळ्यास घेऊन भवसागराउन तरून जाण्याच्या तयारीत असतात तुकारामबुवानी ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील सातव्या अध्यायातील या रूपकाची सांगड आपल्या विचाराशी घातलेली दिसते परमार्थात श्रीगुरू हाच नेहमी तारणारा असल्याने साधुसंतानी आपल्या श्रीगुरूनाथाचा महिमा मोठ्या प्रेमाने वर्णन केलेला आहे शिष्य आपल्या गुरूविषयी केवढे प्रेम दाखवितो ? तर 'सवाह्य आपुलें । जेणें गुरुपुढें वोपिलें । आपण केलें । भक्तीचे घर ॥ गुरुगृह जये देशीं । तो देशुचिये मानसीं ।' अशा भाषेत ज्ञानेश्वरांनी श्रीगुरूचे माहात्म्य वर्णन केले आहे सद्गुरुनाथ कसा असतो, काय करतो, यासबधी एकनाथानी म्हटले आहे,