भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 213, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 213

' तरी तो कायेंवाचामनें । श्ांति कृपाळू दीवाकारणे । तोडी शिष्याचीं भयबंधनें । उठवी ठाणे अहंकाराचे ॥ जो शब्दज्ञानें पारंगतु । ब्रह्मानंदें सदा डुल्लतु । शिष्य प्रबोधनों समर्थु । यथोचितु निजमायें । ' शिष्यप्रबोधन हे श्रीगुरूचे महत्त्वाचे कार्य बाबाजी चैतन्यानी तुकारामबुवांच्या चित्ताचे प्रबोधन केले तुकारामबुवानी समकालीन भोंदू गुरूची थट्टा केली आहे त्यांच्यासारख्या श्रेष्ठ सताला स्वत श्रीगुरू बाबाजी चैतन्य शोधीत आले हाही योग कमी महत्त्वाचा नाही

३७२ देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥ १ ॥ ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ २ ॥ देवाची जतन । तया बाधू न शके अग्न ॥ ३ ॥ तुका म्हणे हरी । प्रल्हादासि यत्न करी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जतन-जपणूक, यत्न-यतन, जतन, रक्षण अर्थ - देव एकदा सोबती झाल्यावर, त्याची कृपा झाल्यावर सगळ्या जगाची आपल्यावर कृपा झाल्या- सारखी असते १ असा अनुभव असूनही जीव उगाचच कासावीस होत असतात २ ज्याला देवाने सरक्षण दिले, ज्याची जपणूक ईश्वराने केली त्याला प्रत्यक्ष अग्नीही काही करू शकत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या प्रल्हादासही आणीबाणीच्या संकटातून ईश्वरानेच साभाळले ४ विवरण - एकदा देवाने कृपा केली म्हणजे मग प्रत्यक्ष अग्नीसारख्या प्रखर पंचमहाभूताचाही त्रास होत नाही हे सागताना बुवांनी प्रल्हादाचे एवच उदाहरण दिल आहे ते योग्यच आह प्रल्हाद हा हिरण्यकशिपु व कयाधू याचा मुलगा हा मोठा विष्णुभक्त हाता याने वाढविलेले भक्तीचे स्ताभ त्याचे वडील हिरण्यकशिपुस न आवडल्या- मुळे प्रल्हादाचा छळ करण्यास त्याच्या बापाने सुरुवात केली हत्तीच्या पायास बाधून तुडविणे, सर्प डसविने, वाघगी- पाशाने बाधणे, शस्त्रप्रहार करणे, कडकड्यावरून लोटून देणे, अग्नीत टाकणे यासारख्या उपायानी प्रल्हादाचा छळ झाला पण अत्यंत शात चित्ताने त्याने ता सहन केला व ईश्वराची भक्ती आणखी दृढ केली शेवटी ईश्वराने नृसिंहाचा अवतार धारण करून प्रल्हादाच्या बापाचा वध केला याची विष्णुभक्ती श्रेष्ठ प्रकारची असून हा थोर नृसिंहभक्त म्हणूनही प्रसिद्ध आहे

३७३ भले म्हणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥ १ ॥ ठसावितां यत्न लागती सायास । चुकतया घडे नास अल्प वर्म ॥ २ ॥ पाकसिद्धी लागे संचित आइते । घटता सोई ते तेव्हा गोड ॥ ३ ॥ तुका म्हणे बरे सांगताचि गोष्टी । रणभूमि दृष्टि न पडे तो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आइते-श्रम न करता मिळालेले, सायास-श्रम, नास-नाश, संचित-साहित्य अर्थ - आम्ही संताचे सेवक आहोत असे म्हणताना बरे वाटते सतमाहात्म्याची आयती मिळालेली भीक आपणास बरी वाटते १ पण त्याचा महिमा जनात ठसावना फार श्रम पडतात काही थोडे जरी चुकले तरी संतत्वाचे मर्म नाहीसे होईल हेही ध्यानात हवे २ चांगल्या स्वयपाकाच्या प्राप्तीसाठी साधनसाहित्याची तयारी आयती असेल सर उत्तम तरच सर्व स्वयंपाक गोड व रुचकर लागतो ३ युद्धाच्या वार्ता दूर राहूनच करावयास गोड असतात प्रत्यक्ष रणक्षेत्र दृष्टीस पडले नाही तोपर्यंतच या वार्ता मनोरंजक असतात त्याप्रमाणे सतपणाच्या गोड गोष्टी होत ४

३७४ संतसमागम एकांदिया परी । राहावे त्याचे द्वारीं¹ श्वानयाती ॥ १ ॥ तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचे ॥ २ ॥ १ घरीं