भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 21, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 21

सत्तावीस पाणी आणून विनवितात, 'घाव घाली आई । आता पाहातेस काई ॥ धीर नाहीं माझे पोटीं । झालो वियोगें शिपुटी ॥ करावें शीतल । बहु झाली हळहळ ॥ तुका म्हणे डोई । कई ठेवीन हे पायीं ?' या मळमळयाने तुकोबाचा जीव फुटून निघत असे कधी त 'पढरीची वाट पाहे निरंतर । निढळावरी कर ठेवूनिया' असे म्हणतात, तर बधी 'तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवा पाडुरंगा ?' म्हणून अधीरता दाखवितात 'डोळिया पाझर कठ माझा दाटी । येई वो येई भेटी पाडुरंगे । बहु दिस टाकिले निरास का केले । कोठे वो गुंतले चित्त तुझें ? । बहु घडा तुज नाहीं वो आठव । राहिलासे जीव माझा कंठीं ।' अशी अवस्था त्याच्या मनाची होऊन जात असे त्याचा जीव तृषाक्रान्त हात असे 'करावा वर्षाव । तृषाक्रान्त झाला जीव' असे त्यांनी म्हटले आहे प्रकाशाचा दिवस अशा तळमळीतून एखादा दिवस मग प्रकाशाचा उगव शुभ शकुनाची खूण पटे संताचा समागम होई श्रीविठ्ठलाचे चरण दिसताच सारी व्यथा दूर होऊन जाई 'शुभ झाल्या दिशा अवघाचि काळ । अशुभ मंगळ मंगळाचे अशी स्थिती होत असे 'ढवळले तदाकार । अंधार जो निरसला । रूपो जातां नाहीं ठाव । प्रकट आहे पसारा ।' असा अनुभव त्याना मध्येच येत असे. श्रीहरीच्या भेटीन मन तृप्त होऊन जाई सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे, अशी जाणीव दाटून येई 'आत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोष्टिले' अशी सर्वात्मकता अनुभवास येत असे 'जेथें जातों तेथें तू माझा सागाती । चालविसी हातीं धरूनिया । चालीं वाटे आम्हीं तुझाचि आधार । चालविसी भार सर्व माझा' अशी जवळीव पांडुरंगाची पटत असे 'सुखाचें ओतले । दिसे श्रीमुल चांगलें ।', 'मनें धरिला अभिलाष । मिठी घातली पायांस । होता दृष्टा-दृष्टी । ताप गेला उठाउठी ॥ तुका म्हणे झाला । लाभैं लाभ दुनावला' अशा भाषेत मग विठ्ठलभेंटीचा लाभ झाल्यावरची तृप्ती वर्णन केली जात असे 'देहभान पालटली काया । पडली छाया ब्रह्मची ॥ जोडिले हे न सरें धन । अविनाश आनंदघन ॥ अमूर्त मूर्ति मधुसूदन । सम- चरण देखियेले ॥' 'हिरा शोभला कोदणीं' या भेटीच्या आनंदात व संतसहवासात तुकोबाना आकाश ठेंगणे हाने त्याची दैन्याची अवस्था संपते सर्व संशय फिटतान शंका निवारल्या जातात 'दैन्य गेले हरली चिंता । सदैव आता यावरी' चिंतामुक्त अवस्थेचे वर्णनही तुकोबानी पुष्कळ अभंगात केलें आहे या आनंदाच व स्वसुखाचे चित्तवेधव वर्णन तुकाराम महाराजानी एका अभगात केले आहे