भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 24, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 24

तीस भाऊ पुंडलिक मुनि । चंद्रभागा आमुची वहिणी ॥ तुका जुनाट मिरासी । ठाय दिला पायापाशीं ' या पंढरपुरास केवढे सुख आहे ! हे भूवैकुंठच आहे येथे पाऊल ठेविले की, 'सोनियाचा दीन' उगवतो आनंदाचा गजर होतो संतसज्जनाची संगत मिळने. विठ्ठलास क्षेम, आलिंगन देता येते. सखा मायबाप प्रत्यक्ष भेटतो 'माउली वोळली प्रेमपान्हा' असा अनुभव येतो जे दोष इतर कोणत्याही तीर्थास गेल्याने जात नाहीत, ते पंढरपूर येथील वास्तव्याने दूर होतात, असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे कारण पंढरपूर हे 'सकळ तीर्थांचे माहेर । भूवैकुंठ निर्विकार । होतो नामाचा गजर । असुर काळ कापतो । नाहीं उपमा द्यावया । समतुल्य आणिक ठाया । धन्य धन्य जया । जे पंढरपूर देखती ' या क्षेत्राचे माहात्म्य मराठी संतांनी परोपरीने गाइले आहे ' ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे' असा या स्थानाचा महिमा आहे म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, 'तीर्थे केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥ जळो त्याचे जालेपण । न देखेचि समचरण ।' या पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाचे समचरण पाहून मन तृप्त होते 'शीतळ हा पंथ माहेरची वाट । जयळीच नीट सुखरूप ॥' हा पंढरपूरचा देव 'कृपावंत होय नामें एका' अशा थाटात तुकाराम महाराजांनी या क्षेत्राचे, विठ्ठलाचे, साधुसंताच्या संगतीचे, नामस्मरणाचे महत्त्व परोपरीने सांगितले आहे 'ते हे जोडी संतपाय' संतांची संगत तर तुकोबांना देवापेक्षाही प्रिय वाटते कारण संत हे देवाचेच रूप त्यांनी मानले आहे या संतांचे उपकार किती सांगावेत ? नित्य मनास जागृती देण्याचे कार्य ते करीत असतात त्यांच्यापायी जीव ठेविला तरी तो थोडा होईल धेनूच्या चित्तात जसे वत्स असते, तसे हे संत माझी काळजी घेतात, असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे संत हे त्यांना खरे सगेसोयरे वाटतात 'दसरा दिवाळी तोचि सण आम्हा । सखे संतजन भेटतील' असा आनंद संतभेटीमुळे त्यांना होत असतो या संतांच्या पादुका घेऊन मी नृत्य करीन, असे त्यांनी म्हटले आहे 'संत मार्गी चालती । त्याची लागे मज माती' अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे 'संताच्या घरांचा दास मी कामारी । दारीं परवरीं लोळतसे' अशी त्यांची भूमिका होती 'सर्व सुखें आजी एथेंचि वोळलीं । संतांची देखिलीं चरणार्वुजें' अशी त्यांची निष्ठा होती त्यांची संतांना नेहमी प्रार्थना असे की, 'तुमचिये दासीचा दास करुनी ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज । आता तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ॥ गोमटें तें करा माझें । भार ओझें तुम्हासी,' कारण आपले फार मोठे भाग्य म्हणून संतांचे हे पाय आपणास पाहावयास मिळाले, असे त्यांना वाटे 'भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय । येथूनिया तुटो माया । मरणापासुनि सर्वथा ॥ होई बळकट । माझ्या मना रे तू धीट ।' अशा शब्दात संतकृपेने आपल्या भाग्याचा उदय झाल्याचे तुकोबांनी सांगितले आहे कीर्तनातील ब्रह्मारस संतसहवासाप्रमाणेच नामस्मरणाची व कीर्तनाची, भजनाची महती तुकोबांनी वारंवार वर्णन केलेली आहे 'नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरींचीं' म्हणून त्यांनी या साधन- मार्गांची सुलभता स्पष्ट केली आहे कारण या मार्गात 'न लगती सायास जाये धनान्तरा । सुखें येतो घरा नारायण ॥ ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥ राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥ याविण असता आणिक साधन । वाहत्से आण विठोबाची ॥' याप्रमाणे तुकोबांनी सर्व लोकांना नामसंकीर्तनाचे एक सुलभ साधन उपलब्ध करून दिले 'नाम गोड नाम गोड । पुरे कोड सगळही' अशी या नामाची महती आहे या नामामुळे व भजनकीर्तनाच्यामुळे