सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 23, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंएकोणतीस अभंग ईश्वराच्या साक्षात्काराच्या आधीचे असतील, अस निश्चयान म्हणता येत नाही कारण भक्तीच्या सुखासाठी, प्रेमाच्या भोगासाठी, नाना प्रकारचे भाव थोर भक्त पुन पुन व्यक्त करीत असतात 'मी भक्त तू देव ऐसे करी' आणि याचसाठी पुष्कळ ठिकाणी त्यानी मुक्तीची किंवा ब्रह्मज्ञानाची अथवा आत्मस्थितीची पर्वा केलेली नाही ' नसो ब्रह्मज्ञान आत्मस्थिति भाव । मी भक्त तू देव ऐसे करी ॥ दावी रूप मज गोपिकारमणा । ठेवू दे चरणावरी माथा । पाहीन श्रीमुख देईन आलिंगन । जीवें निंवलोण उतरेन । पुसता सांगेन हितगुज मात । बैसोनि एकान्त सुखगोष्टी' अशा प्रकारे सगुणाशी प्रेम वाढवावे, सगुणरूप डोळे भरून पाहावे, चरणावर माथा ठेवावा, आलिंगन द्यावे, जीव ओवाळून टाकावा, काही मनातील हितगुज करावे, एकान्तातील सुखगोष्टी कराव्यात व त्या प्रभूच्या नामस्मरणात आणि सत्सगात दग होऊन जावे, पण हे सुख आत्मस्थितीच्या भावात, ब्रह्मपदात अथवा मोक्षस्थितीत नसले म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, 'सांडुनि सुखाचा वाटा । मुक्ति मागे तो करटा।' भक्तिरसाच्या गोष्टीत मोक्षसुखास तुच्छ लेखिलेले असून 'अवघाचि ससार केला ब्रह्मरुप । विठ्ठल स्वरूप म्हणोनिया' हा अनुभव अधिक श्रेष्ठत्वाचा त्यानी मानला आहे मुक्त तरी कुणास म्हणायचे ? ज्याला बंधनच नाही त्याला कोण मुक्त करणार ? यासाठीच तुकाराम महाराज म्हणतात, 'देवा ऐक हे विनती । मज नको रे हे मुक्ती' मग काय हवे ? त्याचेही उत्तर असे की, 'आत्मस्थिती मज नसो हा विचार । देई निरंतर चरणसेवा' दया, तुझ्या पायाची सेवा, तुझ्या मुखाचे दर्शन, तुझ्या नामाचे भजन, मताचा सहवास, अखंड तुझे अनुसंधान, याखेरीज मुग दुसरे कुठले रे ? म्हणूनच तुकोबानी विनविले आहे, 'मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा । मज भक्तीची आवडी । नाहीं अत्तरी ते गोडी' मोक्ष, वैकुंठ, मुक्ती, ब्रह्मस्थिती याची थोरवी कोठवर आहे ? जोपर्यंत पंढरपूरचे वैभव पाहिले नाही तोपर्यंत, जोपर्यंत पांडुरंगाचे दर्शन झाले नाही तोपर्यंत या सत्ताचे सर्वसुख म्हणजे परपूराच्या विठ्ठलाचे पाय हेच होय. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, जववरी नाहीं देखिली पंढरी । तववरी थोरी वैकुंठांची ॥ मोक्षसिद्धी तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीन रूप ॥ वृंदावन सडे चोक रगमाळा । अभिनव सोहळा घरोघरीं ॥ नामघोष कथा पुराण कीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंगा ॥ सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रह्मा तें केवळ नांदतसे ॥ तुका म्हणे जें न साधे सायासें । तें हें प्रत्यक्ष दिसे विटेवरी ॥