भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 240, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 240

२०६ सार्थ तुकारामगाथा पडिले विषयाचे गोधळीं । ते त्रिगुण आफळी । हरिनाम आरोळी । कानीं पडतां ते उठी ॥ ३ ॥ घेतला अहंकारें । काम क्रोध या मत्सरे । पळती प्रेमभरें । अवघे ठाव सांडुनी ॥ ४ ॥ घेतलासे पुरा । माया ममता आसरा । अवघ्या एक सरा । पळती रग देखोनी ॥ ५ ॥ तुका म्हणे धावा भाव । फिटेल मनिचा संदेह । आणीक न लगे ठाव । काहीं कोठें हिंडावे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - झाडणी करणे-दूर करणे, आफळी-बाधून गेले, आसरा-जलदेवता अर्थ - हा माझा खरोखरचा देव्हारा आहे याप्रमाणे दुसऱ्या कुणाजवळच तो नाही याची कीर्ती साऱ्या त्रिभुवनात पसरत राहिली आहे याच्यासंबंधी कुणास विचारण्याचीही जरूरी नाही १ या माझ्या देवास नमस्कार करून सर्वजण लोटांगण घाला हो त्याला काही नम्र भावाने विनंती करा ना तुम्हास लागलेले विकारादींचे भूत हा देव काढून टाकेल संसाराचे भूत दूर करील २ जे नाना विषयाच्या जंजाळात सापडले ते त्रिगुणाच्या बंधनात गुरफटले गेले असून या परमेश्वराच्या नामाची आरोळी ऐकताच ही भुते उठून दूर जातील ३ काम, क्रोध, मत्सर अहंकार इत्यादी भुते याचे प्रेमळपणाने घेतलेले नाव ऐकताच उठून पळून जातील ४ माया, ममता या जलदेवतांनी जो ताप दिलेला आहे त्या याचा रग पाहून ताबडतोब दूर पळून जातील ५ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही फक्त तुमच्या मनातील एकचित्त असा भाव साधा मग तुमच्या मनाचा संदेह फिटून जाईल मग इतर ठिकाणी आश्रय घेण्यासाठी हिंडण्याचे कारणच पडणार नाही ६ ४१७ पुढें येते देवी । तिची जती¹ चालो द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥ १ ॥ एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा । माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावे करावी ॥ २ ॥ मेंढा मारावा लोवाळ । पूजा पावली सकळ । तुम्हीं केले बळ । मग मी ठायीं न पडें ॥ ३ ॥ तुका म्हणे मुळीं । लागली ते आली कुळीं । वंदुनी सकळीं । जीवे भावे ओवाळा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जती-जत्रा यात्रा लोवाळ-गले लठ्ठ अर्थ - पुढे येणाऱ्या देवीची यात्रा नेहमी चालू ठेवावी मायची आशा व मानाची भावना याचा त्याग करावा १ ही एकवीरा देवी अंगात आली असून ती तुमचा सब रोग दूर करील माझ्या भक्ताना एकनिष्ठत पूजा करण्यास सांगा असे ही सुचविते २ तिच्यासाठी चांगला गलेलेठ्ठ मनरूपी मेंढा मारून त्यायोगे तिला सर्व पूजा पोहोचेल असे पाहावे याशिवाय तुमच्या कुठल्याही बळान मी सापडणार नाही असे ही सुचविते ३ तुकाराम महाराज म्हणतात, ही देवी आमच्या कुळाचीच आहे या कुलस्वामिनीस सर्वांनी वंदन करावे व तिला जीवेभावे ओवाळावे ४ ४१८ अवघ्या जेष्ठादेवी कोण पूजनाचा ठाव । धरिताचि भाव कोठें नाहींसे जाले ॥ १ ॥ १ जगति