सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 239, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २०५ आधळघासी डोळे । देते पागुळासी पाय । वांझा पुत्र फळे । नवस पुरविते विठाई ॥ ५ ॥ उगविलीं कोडों । मागें कित्येकाचीं बापुडीं । तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधीं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - साच-खरोखर, भारू-विश्वास, फुलबरा-फुलांचा गुच्छ, नासी-नाश, उगविलीं- सोडविली अर्थ - हा माझा देव्हारा खराच आहे तुम्ही तुमच्या नवमय वचनांचा विश्वास खरा धरून सत्व, रज तम या गुणांच्या फुलांचा गुच्छ घेऊन या अशी मी तुम्हास विनंती करीत आहे १ माझे हे प्रिय दैवत या वैष्णवांच्या समतीत रगत येऊन चालत आहे ते माझ्या हृदयात पूर्णपणे भरून असून प्रवृत्तिमिवृत्तींचा निवाडा करीत आहे २ तुझी हरवली आहे अशी वाटणारी वस्तु खर म्हणजे तुझ्यापाशीच असून तू मात्र शोधायची जागा चुकून व्यर्थ वणवण करीत हिंडत आहेस तुझ्या अंत:करणात निवास करणाऱ्या कामक्रोधादी विकारांनी तिचा नाश आरंभिला आहे ३ आता त्या वस्तूची नीट ओळख माझ्या एका बेतावाचून तुम्हास होणार नाही, यासाठी अंधाराचा नाश व्हावा म्हणून त्याचा शोध घेणे अगत्याचे आहे ४ ही आमची विठाई आंधळ्यांना दृष्टी देते, पांगळ्या लोकांना पाय देते, निपुत्रिकाला पुत्र देते भक्तांचे सब नवस ही परिपूर्ण करते ५ हिने याहीपूर्वी कित्येकांची रहस्ये पूर्णपणे सोडविली असून तुकाराम महाराज म्हणतात, हिला आधी तुम्ही नवस करा तुमची संकटे दूर करण्यासाठी एका क्षणाचाही वेळ लागणार नाही ६ ४१५ विनंति घातली अवधारी । मज देईं वो अभय करों । पीडिलों खेंचरों । आणीक वारी नावाची ॥ १ ॥ रगा येईं वो एकला रग वोडवला । हरिनामे उठिला गजर केला हाकारा ॥ २ ॥ देवां चे दैवते । तुज नमिले आदिनाथे । ये वो कृपावते । भोगा माझ्या धावति ॥ ३ ॥ न लवी आता वेळ । आइत सारिली सकळ । तुका म्हणे कुळ । आमुचिये दैवते ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - खेंचरी-कामक्रोधादा भुतांनी अर्थ - या कामक्रोधादी भुतांनी मी त्रस्त झालो आहे विठाई, तू आपल्या अभय हातानी मला आश्वासन दे इतर भूतांची भीतीही निवारण कर ही माझी विनंती तू ऐक १ हरिनामाचा पुकारा करून मी मोठा गजर केला आहे त्याच्या रगात तुझ्या कृपेचा रग चढू दे ना २ हे आदिनाथे, तू सर्व देवाची देव असून मी तुला मनोभावे नमस्कार करीत आहे तू कृपावंत होऊन मला माझ्या प्रारब्धकर्मापासून सोडिव आता तू उशीर लावू नकोस तुझ्या पूजेची ही सब सामग्री मी आयतीच तयार केली असून तुकाराम महाराज म्हणतात, तू आमची कुलस्वामिनी आहेस ४ ४१६ माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसाये ॥ १ ॥ या रे लोटांगणीं । काहीं करा विनवणी । करील झाडणी । मूळ काढी संसार ॥ २ ॥